रविवार, ८ एप्रिल, २०१२

सांस्क्रुतिक दहशतवाद आणि प्रति-सांस्क्रुतिक दहशतवाद

मी अनिता पाटील यांचा ब्लोग नियमित वाचतो. या ब्लोगवरील रवींद्र तहकिक यांचा पु. ल. देशपांडे यांच्या वरील लेख मी वाचला. त्या बद्दल श्री. संजय सोनवणी यांनी शनिवारी ७ एप्रिलला आपल्या ब्लोगवर प्रतिक्रियात्मक लेख लिहिला आहे आणि अनिता पाटील यांनी त्यावर खाली प्रतिक्रिया दिली आहे. मी या ठिकाणी श्री. संजय सोनवणी यांचा लेख व अनिता पाटील यांची त्यावरील प्रतिक्रिया देत आहे. वाचकांनी जरूर वाचावे.
श्री. संजय सोनवणी यांचा लेख -

...तसेही अशा मुर्खांना कोण अडवू शकतो?

मी अपघाताने रवींद्र तहकीक नामक कोणा अनाम ग्रुहस्थाचे पु. ल. देशपांडे यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे लेख वाचले. मला आधी कोणीतरी माझ्या एका लेखावर प्रतिक्रिया देतांना पु.लं.वर टीका होत असल्याबद्दल लिहिले होते, पण मला विश्वास नव्हता...पण प्रत्यक्ष हे लेख वाचुन हादराच बसला. ही नुसती टीका नव्हे तर तालीबानी हल्लाच आहे याबाबत शंका नाही.

सर्वप्रथम, पु. ल. हे विनोदी लेखक होते पण त्याचवेळीस त्यांचे सामाजिक भान कधीही सुटलेले नव्हते. त्यांनी आपल्या द्न्यातीबांधवांवर अधिक व त्यांच्या शैलीत, पण कठोर टीका केलेली आहे. गांधीजींवर त्यांनी ज्या आत्मीयतेने लिहिले आहे त्याला तोड नाही. रा.स्व. प्रणित भावभावनांना कुटील विचारांना त्यांनी नेहमीच विरोध केला. सामाजिक वैगुण्यांकडे त्यांनी नेहमीच लक्ष वेधले.

साहित्त्यिक नेमका काय असतो हे या अद्न्य बांधवांना समजावुन सांगणे अत्यावश्यक आहे. मी आजवर ५८ कादंब-या आणि ९ नाटके लिहिली. साहित्यिकाचे स्रुजन हे अत्यंत व्यक्तिगत पातळीवर असते. माझ्या कादंब-या, नाटकांचे नायक ब्राह्मण आहेत तसेच क्षत्रीयही, महार आहेत तसेच मराठेही. क्लीओपात्रासारखी इजिप्तची सम्राद्न्यि आहे तसेच ग्रीक ओडिसियसही. शीबासारखीही नायिका आहे जिचा कोणता असा स्वतंत्र धर्मही नव्हता. नायक-नायिका लेखक निवडतो तो आपल्या विषयाला अनुसरुन. त्यातील भावनिकता लक्षात घेत. त्या भावनिकतेला आपल्या कथामाध्यमातुन विस्तार करत तो आपापल्या मगदुरानुसार पात्र, कथात्मकता व मनोविश्लेषनाद्वारे प्रक्षेपित करत असतो. लेखक लिहितो तेंव्हा जातीय नसतो. (अपवाद फारफारतर ऐतिहासिक कादंबरीकारांचा असू शकतो.)

पु.ल. मुळात कादंबरीकार नव्हते. पण त्यांनी "कान्होजी आंग्रे" ही मनोहर माळगांवकरांनी लिहिलेली, एक अत्यंत आदर्श नव्य शैलीतील कादंबरी, मराठीत आवर्जुन अनुवादित केली. आंग्रे काही केल्या ब्राह्मण नव्हते. माळगांवकरांनी घोडचुक केली असे हे बिनडोक लोक सहज म्हणु शकतात. त्यांनी हेमिंग्वेच्या "Old Man & The Sea" चा मुळ लेखकालाही लाजवेल असा अनुवाद केला. चुकच केली...मराठी माणसाला एका अद्भुत साहित्यिक प्रतिभेचे उदात्त रुप दाखवायची काही गरज नव्हती...असले येडचाप-मनोविक्रुत नंतर या महाराष्ट्रात जन्माला येतील याची त्यांना कल्पनाही नसावी, म्हणुन त्यांच्याकडुन असे क्रुत्य घडले असावे...असे खेदपुर्वक म्हणावे लागते.

पु.लंचा पींड तसा विनोदी लेखनाचा. त्यांनी कमरेखालचे विनोदही केले असे या रवींद्र महोदयांचे जयश्री गडकरांच्या "पार्श्वभुमी" वर म्हणने आहे. असे अनेक काही पांचट विनोद अत्रेंच्या नांवावरही खपवले जातात...पण त्या इतरांच्या विक्रुत कल्पना आहेत...वास्तव नाही हे या मुढांना माहितही नसते. विनोदी लेखन म्हणजे नेमके काय असते, त्यातील पात्रे कोणीही असू शकतात...अगदी संत महात्मेही...त्याकडे मोकळ्या मनाने पहायची मनोव्रुत्ती लागते. पु.लं.नी रामदासांवरही कोट्या केलेल्या आहेत हे मात्र पाहिले जात नाही..."विट्ठल तो आला आला..." हे मुळात चरित्रप्रधान वा ऐतिहासिक नाटक नसुन एक विनोदी प्रहसन आहे व त्याकडे त्याच द्रुष्टीने पहात समीक्षा केली पाहिजे याचे भान या ग्रुहस्थाला नाही. असेच करायचे तर मग दादा कोंडके ते पार क्रुष्णालाही वेठीला धरत प्रहसने करणारी तमाशा मंडळे याच न्यायाने बरखास्त करायला हवीत.

मागे कोणी वेडपट राम गणेश गडकरींच्या नाटकावरही तुटुन पडत त्यांचा संभाजी उद्यानातील पुतळा तोडायच्या वार्ता करत होता. मी याच ब्लोगवर त्याला उत्तर दिले होते. माझ्या मते ज्यांना साहित्य म्हनजे नेमके काय हेच समजत नाही त्यांनी उगा आपल्या लंगड्या तंगड्या अडवत विखार माजवु नये. हो, त्यांचे लेखन वैचारिक वा इतिहास मांडणारे असते तर त्यावर टीका करण्याचा अधिकार आहे आणि असतोच. पण कलाक्रुतीवरची टीका ही कलाक्रुतीच्याच सामर्थ्य/वैगुण्ये याच आधारावर होवू शकते...जातीय नाही.

महाराष्ट्राला तसेही विनोदाचे वावडे आहे. काही जातीघटकांना तर अधिकच. अत्रे-पु.लंनी महाराष्ट्राला हसवायला शिकवले हे ऋण मान्य करायलाच हवे. उलट हे आताचे जातीय वीर मात्र दिसला ब्राह्मण कि झोड या कुव्रुत्तीचे बळी ठरत आहेत आणि त्यातच त्यांचा सांस्क्रुतिक -हास आहे.

उद्या कोणी जी. ए. कुलकर्णींवरही असलेच वाह्यात लिहू लागेल. ज्यांच्यामुळे सांस्क्रुतीक गोंधळ झाला अशांबद्दल लिहिले-बोलणे वेगळे आणि ज्यांनी संस्क्रुती व्रुद्धीत हातभारच लावला त्यांच्याबद्दल अधमपणे लिहिणे-वक्तव्य करणे वेगळे याचे भान असायला हवे. नाहीतर साहित्यिकांना आपल्या लेखण्या बाजुला ठेवुन मुक्त श्वास न घेता आल्यामुळे चक्क काढता पाय घ्यावा लागेल...आणि मग संस्क्रुती रसातळाला जायला वेळ लागणार नाही. आपापल्या जातीचे साहित्य आपणच निर्माण करायचे आणि आपणच वाचायचे असला नवा उद्योग सुरु होईल.

असेच करायचा विचार असेल तर करा...तसेही अशा मुर्खांना कोण अडवू शकतो?
अनिता पाटील यांची प्रतिक्रिया -
पु. ल. देशपांडे, साने गुरुजी, कुसुमाग्रज
ही मंडळी सर्व नियमांच्या वर आहे का?

तुम्ही म्हणता ते लिखाण माझ्या ब्लॉगवरचे आहे. श्री. तहकीक यांनी लेखात वापरलेली भाषा तिखट आहे. मी स्वत: अशा भाषेच्या विरोधात आहे. माझ्या ब्लॉगवर या घडीला २०० पानांचा मजकूर आहे. या संपूर्ण मजकुरात अशी भाषा तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तरीही मी श्री. तहकीक साहेबांचे लेख माझ्या ब्लॉगवर टाकले. त्यांना एडिqटग मंजूर नव्हते. मला सत्य लोकांसमोर आणायचे होते. सत्यासाठी थोडीशी किम्मत मोजावीच लागते. तहकीक यांचे लेख टाकून मी ती मोजली.

दुसरे असे की, आपला विरोध कशाला आहे, हे स्पष्ट होत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याची चिरफाड करताना त्यांनी पुल यांचा एकेरी उल्लेख केला त्याला आपला विरोध आहे का? की तहकीक यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्यांना आहे? की दोन्हींना आहे.

तहकीक यांनी जी भाषा वापरली, तिला आपला विरोध आहे, असे आपले म्हणणे असेल, तर ते मला मान्य आहे. तथापि, श्री. तहकीक यांनी मांडलेल्या मुद्यांना आपला विरोध असेल, तर मात्र मोठी समस्या आहे.

लेखन विनोदी आहे, म्हणून महापुरुषांचे चारित्र्य हनन खपवून घ्यायचे का? हा यातील सर्वांत मोठा प्रश्न आहे. बायकोच्या जाचाला कंटाळून तुकाराम देवध्यानी लागले, तुकारामांचे टाळकरी छंदी फंदी होते, असा स्पष्ट संदेश पु ल देशपांडे यांचे नाटक देते. याला विनोद नव्हे चारित्र्यहनन म्हणतात. चारित्र्य हनन करणारी व्यक्ती पुल देशपांडे आहे, म्हणून सहन करून घ्या, असा पवित्रा कोणालाही घेता येणार नाही. पुलंच्या या लिखाणाला कुणी विनोद म्हणणार असेल, तर त्यापेक्षा दुसरा मोठो विनोद असू शकत नाही.

माझ्या ब्लॉगवर साने गुरूजी, कुसुमाग्रज, विन्दा करंदीकर, वि. स. खांडेकर यांच्या साहित्याची समीक्षा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मण वर्गातून कडवट विरोध होत आहे. विशिष्ट व्यक्तींच्या साहित्याची योग्य समीक्षाच करायचीच नाही, ही मानसिकता केवळ मराठी भाषिकांमध्येच असू शकते. ही लेखक मंडळी मोठी आहेत qकवा जातीने ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांना हात लावायचा नाही, असे कोणी म्हणत असेल, तर आपल्याला ते मान्य आहे का?

अनेक ब्राह्मण लेखकांनी बहुजन महापुरुषांबद्दल कथा कादंबèया लिहिल्या आहेत, हे आपले म्हणणे अगदी योग्य आहे. अशा उत्तम लिखाणाबद्दल सर्वांनाच आदरही आहे. तथापि, या लिखानाच्या बदल्यात कोणी जर आमच्या महापुरुषांची बदनामी करण्याची परवानगी मागत असेल, तर ती आम्ही देऊ शकत नाही. जे वाईट आहे, त्याला वाईट म्हणण्याचा आमचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

आपण अत्र्यांचे नाव घेतले आहे. अत्र्यांनी जी भाषा वापरली आहे, ती तुम्हाला सांगण्याची गरज नाही. श्री. तहकीक यांची भाषा त्यापुढे अगदीच फिकी आहे. ज्या महात्मा फुल्यांचा वारसा तुम्ही आम्ही सांगतो, त्यांनीही यापेक्षा जहाल भाषा वापरली आहे. येथे मुद्दा भाषेचा नाहीच. मुद्दा आहे, चारित्र्य हननाचा. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही चारित्र्य हनन करण्याचा परवाना दिला जाऊ शकत नाही.

सोनवणी साहेब, मी आपला ब्लॉग नियममित वाचते. आपल्या काही मुद्यांबाबत माझे मतभेद असले तरी मला आपले लिखाण आवडते. असो. मी तुमचा ब्लॉग वाचते, म्हणून तुम्ही माझ्या लिखाणाला पाqठबा द्या, अशी माझी भूमिका नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, कोणतीही भूमिका घेताना ती न्याय्य आहे, हे पाहिले पाहिजे.

असो. लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल, याची खात्री आहे.

ता. क.
मला विकृत म्हणणाèयांनी माझ्या ब्लॉगला भेट द्यावी. मला शिव्या देणाèया ब्राह्मणांच्या कॉमेंटस मी ब्लॉगवर कायम ठेवल्या आहेत. त्या वाचाव्यात आणि मग भाषिक शूचितेबाबत बोलावे. (http://anita-patil.blogspot.in/)

आपलीच लहान बहीण
अनिता पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.