मंगळवार, १० एप्रिल, २०१२

संजय सोनवणी यांना पत्र

sanjay sonavani yana patra


माननीय संजय सोनवणी
रवींद्र तहकिक चा आपणास सप्रेम नमस्कार
हें माझे आपणास पहिले वाहिले पत्र. ही काही आपण लिहिलेल्या
लेखाची प्रतिक्रिया किंवा उत्तर नाही. प्रतुत्तर तर अजिबात नाही.
अनिता पाटील यांच्या ब्लॉग वरून प्रसिद्ध झालेल्या माझ्या
लेखा बद्दल आपण आपल्या ब्लॉग वर " तसेही अशा मूर्खाना
कोण अडवू शकतो " असा लेख लिहिला आहे. त्यात पहिल्याच वाक्यात
नव्हे लेखाच्या टायटल मधेच आपण मला उद्देशून "मूर्ख" असे संबोधन 
वापरले.त्याच बरोबर आपण हें लिखाण तालिबानी  आहे .असेही आपण म्हटले .  हा माझा गौरव निश्चितच नाही. आपण माझ्या लेखनाचा निषेध 
केला आहे असेही दिसत नाही. होय , आपण ज्या शब्दात आणि ज्या शैलीत 
हा लेख लिहिला आहे त्याला " पाणउतारा " किंवा "तेजोभंग " असे मात्र 
म्हणता  येयील . 
मला येथे वानरांच्या टोळ्यातील "म्हाल्ल्या" चे उदाहरण देण्याचा मोह होतो आहे आणि मी तो आवरू शकत नाही . वानराच्या टोळीतील बलदंड नर वानर इतर कमकुवत वानरांना मारझोड करून टोळीतून पिटाळून लावतो आणि मग नंतर
एकटाच टोळीतील सर्वा माद्या भोगत राहतो. त्याची म्हाळे पानाची लालसा इतकी तीव्र आणि निर्दयी असते की स्वतः पासून झालेल्या नर अपत्यांना देखील तो जगू देत नाही किंवा पिटाळून लावतो.
    मा . सोनवणी साहेब मी तुमच्यावर थेट असा काही आरोप करत नाही. परंतु
प्रबोधन आणि क्रांतीच्या चळवळीत देखील सुरुवातीला स्वकर्तुत्वाने इतिहास घडवणारे,
चळवळीला योग्य दिशा निश्चित उद्दिष्ट आणि यश मिळवून देणारे ,प्रसंगी जीवाची बाजी लावणारे. सर्वस्वाचा त्यागही करणारे नेतृत्व एका टप्प्यावर  मात्र हेकेखोर आणि आत्मकेंद्रित होताना दिसते. ही  आपल्या देशातल्याच नाहीतर जगाच्या इतिहासातील सर्वच चळवळीची अपरिहार्य शोकांतिका आहे . म्हणजे  माकडाचा माणूस झाला तरी
" म्हाळे" पणाचे " जीन्स " मात्र आपल्यात आजूनही कायम आहेत .  
त्यातूनच मग हें म्हाळे मी म्हणजेच संघटना. मी म्हणजेच विचार. मी म्हणजेच
चळवळ आणि मी करतो तेच खरे प्रबोधन अशी दुराग्रही व अडेलतट्टू भूमिका घेवून
नावे नेतृत्व एक तर जल्मालाच घालत नाहीत किंवा मग त्यांचा डोळा चुकवून
असे नवे नेतृत्व जल्माला आलेच तर हें "म्हाळे" पाळण्यातच त्यांच्या नरडीला
नख लाऊन संपवून टाकतात. त्यांना हव्या असतात फक्त माद्या...ज्या म्हाळ्या चे
डसणे-ओरबरडने शृंगारक्रीडा म्हणून सहन करतात. पाहजे तेंव्हा त्याच्या वासना विरेचनाचे साधन बनतात आणि त्याच्या अपत्यांना जल्माला घालतात. अपत्या
पैकी मादी जातीच्या आपल्या मुली म्हाळ्याने भोगण्यास त्यांची हरकत नसते आणि
नरबच्चाच्या नरडीचा घोट घेतल्यास त्यालाही त्यांची हरकत नसते.
   पण एक दिवस असाही एतो की या म्हाळ्याला सवाई म्हाळ्या भेटतो.
आणि पहिल्या म्हाळ्याचे अनभिषिक्त साम्राज्य नष्ट होते........एक तर म्हाळ्या
मारला जातो किंवा टोळीतून पिटाळला जातो. आणि आश्चर्य म्हणजे ज्या माद्या च्या जीवावरहा म्हाळ्या दांडगाई करत असतो त्या माद्या एका क्षणात नव्या म्हाळ्याशी
रत होतात. आर्थात नवा बलिष्ट म्हाळ्या मिळे पर्यंत.
सोनवणी साहेब कोणत्याही चळवळीचा इतिहास हा आणि  असाच असतो.
आपण असे करता आहात असे मला म्हणायचे नाही तर असे करून नये हें
आपल्या लक्षात आणून द्यायचे आहे .
   आपण एक थोर आणि साक्षेपी लेखक /विचारवंत /समीक्षक / प्रबोधक /
आहात , आपण लिखाण करताना एक विशिष्ट नियमांची आपण आखलेली 
चौकट पाळता . भाषा /लेखन विषय / शैली/ व्यक्ती / इत्यादी बाबतही 
आपण स्वतःला काही नियम आणि मर्यादा  घातल्या आहेत .असे तुम्ही
सांगितले. ही एक चांगली आणि अनुकरणीय गोष्ट आहे .
परंतु प्रत्येकाने आपण ज्या वाटेवरून चालत आहात त्याच वाटेवरून चालावे .
जो असा आपल्याला योग्य वाटणाऱ्या आवडणाऱ्या /भावणाऱ्या/ मार्गाने
चालतो तो योग्य आणि जो वेगळी वाट काढून त्यावर चालू पाहतो
तो मूर्ख ......हें निसर्गदत्त न्यायाला धरून नाही असे आपणास वाटत नाही का ?
संत ज्ञानेश्वारानी असे म्हटले होते की " हंस चांगला चालतो म्हणून इतरांनी
चालूच नाही काय ? कोकिला गोड गाते म्हणून इतरांनी गाउच नये काय ?
मला देखील आपला पूर्ण आदर ठेवून असे म्हणायचे आहे की
" सोनवणी असे लिहितात म्हणून आम्हीही तसेच लिहावे काय ? "
लेखन ही देखील एक लढाई असेल तर त्यात फक्त मनात एक आणि कागदावर वेगळेच असणारे तह आणि करारनामे
किंवा ओढून ताणून अति सभ्य भाषेत खरडलेले कारकुनी कलाम असावेत असे तर आपले म्हणणे नाही ना ?
छापील लिखाणात आणि व्यासपीठावर बोलताना सभ्यता आणि शब्द शुचिता पाळणारा मनुष्य खाजगीत जर
ती पाळत नसेल तर त्याच्या त्या ढोंगी पणाला तुम्ही काय म्हणाल ? त्या पेक्षा आम्ही जर सार्वजनिकरित्या
जरा असभ्य भाषेत बोलत असू तर ( तो आमचा मूर्ख पणा)  त्या ढोंगीपणा पेक्षा अधिक पारदर्शक नाही काय ?
दुसरे महत्वाचे असे की एखादी लढाई लढत असताना आपला शत्रू तोच आमचा असावा हा आग्रह कशासाठी ?
( शत्रू हा शब्द टीका-विषय या अर्थाने घ्यावा मग तो व्यक्ती असेल किंवा विचार असेल )
आपण तर अमुक अमुक ( येथे पु ल देशपांडे ) हें अवध्य ( खून या अर्थाने नव्हे तर टीका या अर्थाने ) आहेत
असे सांगता आहात. किंवा त्या पुढे जाऊन मारायला हरकत नव्हती परंतु हत्यारे फारच धारदार वापरली ( भाषा )
आणि विनोदी लेखकाला काय मारता ? विचारवंताना मारा की असा सल्ला देता....
म्हणजे असे तर नाही ना की राजा ने लढाईत फक्त शत्रू वरच हत्यार चालवायचे. दरबारातल्या विदुषकाने
राणी साहेबांच्या ढुंगणावर लाथ मारली तरी  त्यातल्या विनोदी (कलंदर ) वृत्तीची कदर करून दाद द्यायची !  
आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. जो असे न करता त्या विदूषकाच्या मुस्कटात भडकावून त्याला लाथे खाली
तुडवत-बडवत त्याची रवानगी कोठडीत करील तो अरसिक ...असभ्य ...इतकेच काय मूर्ख सुध्धा !
नाही काय सोनवणी साहेब !
माननीय सोनवणी साहेब, आपण  आमचे  शत्रू  निवडण्याचे
आणि त्याला कसे जेरबंद किंवा नामोहरम करायचे याचे व युद्ध तंत्र निवडण्याचे स्वातंत्र्य अबाधित
राहूद्या. त्यासाठी कोणती हत्यारे वापरायची. कसे डावपेच आखायचे. तह -करार -मदार कसे केव्हा
करायचे याचे देखील स्वातंत्र्य अबाधित राहूद्या. आमच्या तंत्र आणि पद्धतीवर आपण आक्षेप/निषेध /
टीका /टिप्पणी /सूचना /सल्ला /काहीही देवू शकता ....परंतु हें तंत्रच मुळात चुकीचे किंवा अनैतिक
सदोष अथवा अवैध आहे आणि ते वापरणारे मूर्ख आहेत असे मात्र आपण म्हणणे बरोबर नाही .
अपझल खानाला कसा निपटायचा ? हें शिवाजीला ठरवू दया ना ? कारण त्याला तिथे  शामियान्यात 
जायचे आहे .  हें नैतिक हें अनैतिक ..हें शास्राला धरून हें नियमाला सोडून ,,,,असा विचार केला असता
तर अफजलखानाचे सोडाच ..कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने ही शिवाजीचे मुंडके उडवले असते.....
नव्हे ती वेळच आली होती.....एक क्षण ...एक क्षण जरी शिवाजी महाराजांच्या मनात
ब्रम्ह हत्येची पाल चुकचुकली असती ना ......सोनवणी साहेब !   कार्यभाग बुडाला असता !!
असो आपण जेष्ठ आहात .......प्रबोधन चळवळीत आहात . अनिता प्रमाणे मी देखील आपला वाचक
आहे. मी आपला आदर करतो तो आपल्या परखड -तर्कशुद्ध आणि पुरावे व मुद्द्यावर आधारित लेखना मुळे .
परंतू याचा अर्थ असाही नव्हे की आम्ही ही आपल्याच पद्धतीचे अनुकरण करावे....
स्वतःची पध्धत वापरली म्हणून आम्ही जर मूर्ख ठरत असू तर तेही स्वीकारावे लागेल. आम्ही तुकोबा
एवढे मोठे नाही परंतु त्यांनी ही उकळते पाणी / उसाचा मार / चोरीचा आळ/ घरादाराची लिलाव बोली /
गाथेची बुडवणूक / आणि अखेर वैकुंठ गमन ( ? ) स्वीकारले ....तिथे कोणी आम्हाला मूर्ख संबोधित
असेल तर ती सुरुवात आहे.असेच म्हणावे लागेल.
..............................................आपला उपमर्द किंवा अवमान करणे हा या पत्राचा उद्देश नाही
तथापि अनावधाने असे घडले असल्यास आपली विनम्रता पूर्वक माफी मागतो ----------------------------------
                                                       
                                                                     धन्यवाद ! 
                                                                                                                       आपला
                                                                                                    प्रा. रवींद्र तहकिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.