संतोष पवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संतोष पवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ मे, २०१२

सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल भाग १


७)- सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल
ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा रामदासी प्रयत्न : - महाराजांना दादोजी कोंडदेवाने युद्धशास्त्र शिकवले नाही, रामदासाने तर नाहीच नाही. त्यांच्या अंगी ती पात्रता न्हवती. आणि राज्यारोहानापर्यंत रामदासाची व शिवछत्रपतींची गाठही पडली न्हवती.--------------
शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नाला हिंदूंचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे (प्रा. नरहरी कुरुंदकर)
-------------
किंकेड म्हणतो 
- शिवाजी हा अलौकिक असा दूरदृष्टी , सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी व राजकारण धुरंधर होता. राष्ट्रीय स्वातंत्र्य हे त्याचे एकमेव ध्येय होते.
---------------
केशव राव ठाकरे म्हणतात - शिवाजीला गोब्राह्मण प्रतिपालक ठरविण्याचा बूट ब्राह्मणांनी रचला. शिवाजीच्या पत्रव्यवहारात गाई आणि ब्राह्मण यांना स्थान न्हवते.
---------------
अर्जुनराव केळकर म्हणतात, ' स्वतःस राज्याभिषेक करून घेण्याचा निर्धार केल्यानंतर मगच मातुश्रींची संमती घेतली. नंतर महाराष्ट्रातील संतांना भेटले. रामदास हे त्यापकी एक होते. बापाची सल्लामसलत घेण्याचा प्रसंग त्यांना कधीच आला नाही. उलट बापाने विरोध केला असता त्यांनी तो मुळीच मानला नाही.
रामदास हा तर महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत केव्हाच भेटला न्हवता व त्यांची व महाराजांची गाठही पडली न्हवती. शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन करण्याची त्यांचा अंगी पात्रता न्हवती. त्यांच्या मार्गदर्शनाने समाजाची संघटनच करता आली नाही.
                ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व राखण्याचा अतिहीन प्रयत्न रामदासाने केला. ब्राह्मनाखेरीज इतर हिंदूंना रामदासाने अगदी हिनच लेखले.डोके वर काढणाऱ्यांना लाथा मारायच्या व त्याचे पुढारीपण प्रस्थापित झाले कि, त्याच्या पायावर डोके ठेवायचे !..........................
                त्यावेळी नांगरणीला ट्र्याकटर्स (tractors ) न्हवते, नांगरणीसाठी शेतकऱ्यांना बैलाची अत्यंत जरुरी होती. बैलांची पैदास गाई शिवाय होणे शक्य नाही. यादृष्टीने शिवाजी महाराज गोपालन, राष्ट्राला आवश्यक म्हणून पाहत. गोपालन झाले नसते, तर शेतकऱ्याला व त्यांच्या कुटुंबियांना जगणेच अशक्य झाले असते................
............... पण ब्राह्मण वर्ग गोपालानाकडे स्वार्थी दृष्टीने पाहत होता. शेतावर जाऊन नांगरणी - कुळवणी करणारा हा वर्ग न्हवे. स्वतःच्या जमिनी ब्राह्मणेतरांना लावून कष्टाशिवाय जगणारा हा वर्ग, गोपालानामुळे दुधदुभात्याची यांची चंगळ! गोपालानाबरोबर ब्राह्मंपालन होऊ शकत होते. म्हणून त्यांनीमहाराजांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' हा किताब देऊन टाकला.
महाराजांच्या व ब्राह्मणांच्या दृष्टीतला हा फरक होता. महाराजांची दृष्टी राष्ट्रीय होती, ब्राह्मणी जातीय होती. ती रामदासांच्या खालील श्लोकातून अगदी स्पष्टपणे दिसून येते -

..............गुरु तो सकलाशी ब्राह्मण | जरी तो झाला क्रियाहीन ||
..............तरी तयासीच शरण | अनन्य भावे असावे||
..............ब्राह्मण वेद मूर्तिमंत| ब्राह्मण तोची भगवंत||
..............पूर्ण होती मनोरथ| विप्र वाक्ये करुनी||
.............असो ब्राह्मणा सुरवर वंदिती | तेथे मानव बापुडे किती||
.............जरी ब्राह्मण मूढमती| तरी तो जगत्वान्द्या ||
.............अंत्यजे शब्द्ज्ञाता बरवा| परी तो घेऊन करावा||
.............ब्राह्मण संनिध पुजावा| हे तो न धडे कधी||

.......................... हे वाचल्यावर या गृहस्थाला कोणीही संत अगर साधू म्हणणार नाही. काय शिकवले रामदासाने?? अश्या प्रकारचे विचार, अज्ञ ब्राह्मनेतरांच्या डोक्यात ठासून घातल्यामुळे यांनी विनाश्रम दुध मिळण्याची सोय करून घेतली व शिवाजी महाराजांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' हे चिटकवून टाकले. पण कोणत्याही बखरीत महाराजांना हे विशेषण स्वतःला लावून घेतलेले नाही.

'गोब्राह्मण रक्षक' म्हणवीत नसत
    याच भटांनी राज्यारोहण होण्यापूर्वी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्यारोहानाला मान्यता दिली न्हवती. चढणाऱ्यास खाली ओढायचे. चढलेल्यांचे पायावर डोके ठेवायचे, हि त्यांची नीती. 
.............इतिहास संशोधक शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. पवार मुंबई युनिव्हर्सिटीत केलेल्या भाषणात म्हणतात,'पूर्वीच्या बखरीत अगर ऐतिहासिक कागदपत्रात महाराजांना मी 'ब्राह्मण प्रतिपालक' असे विशेषण लावलेले अगर त्यांनी लावून घेतलेले कोठेच आढळत नाही. उलट राजा जयसिन्हाला लिहिलेल्या पत्रात शिवाजीने घोड्याची शपथ घेऊन विश्वास पटवण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्ह्याच्या बाबतीत ब्राह्मणाचे पालन करण्याची हमी शिवाजीने दिली न्हवती. अशा खास सवलती पेशव्यांनी दिल्या होत्या. असा पक्षपात शिवाजीने आपल्या राज्यातप्रजाजनान्बद्दल केला न्हवता.
................. त्यांच्यात धर्माभिमान न्हवता असे म्हणणार नाही. पण तो धर्माभिमान मुसलमानांचा द्वेष करीत न्हवता. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता होता, पण याचा विचार ब्राहामनांनी केला नाही व त्यांच्या राज्यारोहानाला ते क्षुद्र मानून त्यांनी विरोध केला. पण गागा भटकडून मंत्रशुध राज्याभिषेक घेतल्यानंतर यांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' म्हणण्यास सुरुवात केली व राज्यारोहण झाल्यानंतर रामदासाला गुरुपद दिले.

बुधवार, १६ मे, २०१२

शिवरायांचे रामदास गुरु न्हवते... आणि रामदासांची शिकवण आणि महाराजांची वर्तणूक...


५) रामदास हे छ. शिवरायांचे अध्यात्मिक किंवा राजकीय गुरु न्हवते याचे आणखी काही पुरावे देता येतील.                       
              एका पत्रावरून छ. शिवरायांच्या मनात रामादासंविषयी कोणती भावना होती, छ. शिवरायांचे काय स्थान होते. ते स्पष्ट होते. दि. ९/८/१६७६ रोजी छ. शिवरायांनी दत्ताजीपंत व गणेश गोजदाऊ यांना लिहिलेल्या आज्ञापत्रात म्हटले आहे. ' रामदास गोसावी व देवाकरिता ब्राह्मण तेथे येऊन राहतात , त्यांचा परामर्ष घ्यावा' -- (शिवरायांची आज्ञापत्रे.) या आज्ञापत्रावरून काही गोष्टी स्पष्ट होतात. छ. शिवराय रामदासांचा उल्लेख आदरपूर्वक करीत नाहीत. जर गुरु असते तर आज्ञेत 'श्री रामदास स्वामी' असे म्हटले असते. इतर सामान्य साधू, गोसाव्याप्रमाणे रामदासांना दान- दक्षिणा द्यावी असा छ. शिवरायांचा सूर आहे. रामदास गुरु असते तर छ. शिवरायांनी त्यांना अशी वागणूक देण्याविषयी फर्मावले असते काय???? पुढे १६७८ मध्ये छ. शिवरायांनी चाफळच्या मठास इनाम दिल्याचा पुरावा आहे. पण याचा अर्थ छ. शिवरायांचे रामदास गुरु होते असा होत नाही. छ. शिवरायांनी अनेक साधू संतांना जमिनी इनाम दिल्या. मग ते सर्वच छ.शिवरायांचे गुरु होतात काय??
               रामदास हे छ. शिवरायांचे गुरु होते असे क्षणभर मान्य केले , तरी काही प्रश्न उद्भवतात. त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा छ. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मणांनी विरोध केला, तेव्हा ब्राह्मण असणाऱ्या रामदासांनी छ. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी कोणतेच प्रयत्न का केले नाहीत?? समजा प्रयत्न करायचे बाजूस ठेवले तरी ६ जून, १६७४ रोजी जेव्हा राज्याभिषेक झाला, तेव्हा राज्याभिषेकास काशीहून (उत्तर भारत) गागाभट्ट आला. तर परदेशातून हेन्री औक्जिडेन्त उपस्थित राहिला. मग महाराष्ट्रात भटकणाऱ्या रामदासांना आपल्या महान शिष्याला आशीर्वाद देण्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहावे असे का वाटले नाही? यातून हेच स्पष्ट होते कि रामदास हे छ. शिवरायाचे गुरु न्हवते. रामदास राजकीय दृष्टीकोनातून छ. शिवरायांचे गुरु न्हवतेच, कारण राज्याभिषेकापर्यंत छ. शिवरायांची रामदासांशी भेट झाल्याचा कोणताच पुरावा नाही.


रामदासांची शिकवण आणि महाराजांची वर्तणूक...

६) रामदास महाराजांचे अध्यात्मिक दृष्ट्याही गुरु न्हवते. कारण रामदासांचे विचार हे ब्राह्मणी वर्चस्व भावनेतून ब्राह्मण धर्म  रक्षण करणारे होते. उदा. दाखल त्यांचे काही श्लोक घेता येतील  
अंतर तो एक खरे, परी संगती घेऊ नये महारे|
 पंडित आणि चाटी पोरे | एक कैशी ||
 
(वरील श्लोक विरोधी शिवरायांची भूमिका ---- वाई परगण्यातील नागनवाडी गावाची पाटीलकी छ. शिवरायांनी नागनाक महाराला दिली. अनेक महार , मांग किल्लेदार होते. तर रामोशी हेर खात्यात होते...)  
गुरु तो सकालांशी ब्राह्मण | जरी तो झाला क्रियाहीन,
तरी तयासीच शरण | अनन्यभाव असावे ||
 
(वरील श्लोक विरोधी शिवरायांची भूमिका -- संत तुकाराम महाराज, याकूत बाबा अशा ब्राह्मणेतर संतांना हि शिवराय मानत...) 
असो ब्राह्मण, सुरवर वंदिती| तेथे मानव बापुडे किती|
जरी ब्राह्मण मूढमती | तरी तो जगदवंद्य ||
 
अर्थ -- मूढमती म्हणजे मूर्ख. ब्रह्मण मूर्ख असला तरी तो जगाला वंदनीय असतो, असे रामदास म्हणतात. 
देवा ब्राह्मणा राज्य करी | तो एक मूर्ख || 
रामदासांनी सांगितलेले मूर्खाचे एक लक्षण.
महाराजांचे विरोधी तत्व --- छ. शिवरायांनी ब्राह्मणांवर फक्त राज्यच केले नाही तर वेळ पडल्यास त्यांना कठोर शासनही केले. अशा छ. शिवरायांना रामदासांचे शिष्य मानाने योग्य वाटत नाही...कारण दोघांच्या विचारात बराच विरोधाभास आढळतो.... 
संदर्भ ---- शिवचरित्र मिथक आणि वास्तव. - ---श्यामसुंदर मिरजकर.

शनिवार, १२ मे, २०१२

विश्वसनीय साधन सामुग्री


संतोष पवार यांच्या ब्लोगवर छोटे छोटे लेख आहेत. तर मी माझ्या ब्लोगवर दोन लेख एकत्र टाकत आहे. हे लेख माझ्या ब्लोगवर टाकण्यासाठी मी श्री. संतोष पवार यांची परवानगी घेतलेली आहे.

३) शिवाजीच्या चरित्रविषयक साधनात रामदासी पंथांच्या बखरी या सर्वात जास्त अविश्वसनीय आहेत. मेरुस्वामी व दिनकर हे दोनच शिष्य असे आहेत कि , जे समर्थ वारले, त्या वेळी वयाने प्रौढ होते. इतर सर्वांचे ज्ञान ऐकीव व विपर्यस्त आहे. -- नरहर कुरुंदकर... 
     रामदासाची सर्वात जुनी चरित्रे मेरुस्वामी, दिनकर स्वामींची . त्यात शिवाजीचा उल्लेख नाही. शिवाजीचे सर्वात जुने चरित्र सभासदाचे. तिथेही रामदासाचा उल्लेख नाही. ज्यांनी रामदास चरित्र जवळून पहिले व रामदास- निधना समयी जे प्रौढ होते, व ज्यांनी शिवाजी जवळून पहिला, त्यांनी रामदास उल्लेखलेला नाही.
" जिजाबाईंच्या निधनसमयी रामदास तिथे होते, हि माहिती बखरीची आहे, आणि उत्तरकालीन बखरीची आहे. शिवाजीला समर्थांचा मंत्रोपदेश नाही. " -- नरहर कुरुंदकर...
संदर्भ -- श्रीमान योगी कादंबरीच्या निमित्ताने रणजीत देसाई यांना लिहिलेले नरहर कुरुंदकर यांचे पत्र जे प्रस्तावने खातीर त्या पुस्तकाच्या सुरवातीस  छापलेले आहे 



संतोष पवार यांच्या http://www.ramadasswami.blogspot.in या ब्लॉगवरून साभार


रामदासांना गुरु बनवण्याचा राजवाड्यांचा प्रयत्न हाणून पाडला..
४) रामदासांनी लिहिलेल्या कोणत्याही ग्रंथात 'मी शिवरायांचा गुरु आहे ' किंवा ' शिवराय माझे शिष्य आहेत' असे प्रत्यक्षपणे देखील म्हटलेले नाही. छ. शिवरायांच्या समकालीन बखरीत किंवा ग्रंथात छ. शिवराय व रामदास यांच्या गुरु- शिष्यत्वाचा उल्लेख नाही. इतकेच काय छ. शिवराय व रामदासांच्या भेटीचाही उल्लेख नाही. सभासदांची बखर , ९१ कलमी बखर, स्वानुभव दिनकर, शिवभारत, जेधे शकावली अशा १७ व्या शतकातील समकालीन अनेक ग्रंथात वरील प्रकारचा उल्लेख नाही. परंतु छ. शिवराय व रामदासांचा संबंध १८ व्या शतकाच्या शेवटी (१७९०) हनुमान स्वामीच्या बखरीत चीटनिसांनी प्रथम केला. मग रामादासभक्तानी अशा अनेक कथा रचून छ. शिवरायांचे गुरु रामदास म्हणून सांगण्यास सुरवात केली. या पार्श्वभूमीवर म. फुलेंनी प्रथम खऱ्या इतिहासाची मांडणी केली. नंतर कृ.अ.केलुस्कारांनी शास्त्रीय चिकित्सा करून छ. शिवरायांचे ऐतिहासिक चरित्र लिहिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत १९०२ साली इतिहासाचार्य म्हटल्या जाणाऱ्या वी. का. राजवाड्यांनी खोट्या पुराव्यांच्या आधारे 'राष्ट्रगुरू रामदास ' हा लेख 'ग्रंथ माला' मासिकात लिहिला. मग या विचारला मोठीच चालना मिळाली.  
    राजवाड्यांनी पुढे केलेले सर्व पुरावे निराधार आहेत, असे पुढे संत साहित्याचे अभ्यासक म.व.धोंडांनी सिद्ध केले. जुलै १९२९ च्या विविधज्ञानविस्तार या अंकात न.रा.फाटकांनी 'रामदास आणि शिवाजी' हा दीर्घ लेख लिहून वी.का.राजवाड्यांना चोख उत्तर दिले. पुढे शेजवलकर, व.सी.बेंद्रे., अप्पासाहेब पवार आदी अनेक इतिहास अभ्यासकांनी रामदासांना छ. शिवरायांचे गुरु ठरवण्याचे कारस्थान मोडून काढले.  
    'रामदासांचे लेखन व शिवरायांचे कार्य यांचे कोणतेच नाते नाही. मग गुरु-शिष्याचा संबंध कसा जोडायचा ?' असा प्रश्न म.व. धोंडांनी उपस्थित केला आहे.

संतोष पवार यांच्या http://www.ramadasswami.blogspot.in या ब्लॉगवरून साभार

मंगळवार, ८ मे, २०१२

अनुग्रह?????

२) दासबोध मी वाचलेला आहे. एम .ए. ला शिकवलेला हि आहे . त्यात राजकारण फारसे नाही. सगळा भक्तीमार्गच आहे. फक्त राजकारण हा शब्द आहे. त्या नावाचे समास आहेत. पण त्यातही राजकारण नाही. रामदासी पंथ आदिलशाहीच्यात स्थापिला गेला व चाफळ देवस्थानाचे पहिले विश्वस्थ शिवाजीचे शत्रू आहेत. याचा अर्थ १६४९ ला रामादासासमोर शिवाजी न्हवता, असा आहे.आणि ते स्वाभाविक आहे. कारण हा वेळपावतो शिवाजीचा फारसा उपक्रम कुणाला दिसलेलाच न्हवता. पण एकानाथांप्रमाणे रामादासही हिंदूंच्या पुनर्जीवनाची स्वप्ने पाहत होता. हिंदुधर्माचा अभिमान म्हणून मुसलमानांचा राग त्यांचा मनात होताच. औरंगजेब -- शिवाजी व रामदास -- दोघेही मेल्यावर २७ वर्षे जिवंत होता. पण औरंग्या पापी बुडाल्याची स्वप्ने एकानाथानुसरण करीत रामदास आधीच पाहत होता.
समोरचा पुरावा पाहून अनुमान करायचे, तर रामदासाचे शिवाजीकडे उत्कटतेने लक्ष १६५९ नंतर गेले असावे .'तुमचे देशी वास्तव केले. परंतु वर्तमान नाही घेतले' असा रामदासाचा दावा या अनुमानाला पोषक आहे.
                           शिवाजीला साधुसंतांविषयी आदर व आत्मीयता होती. साधुसंत तृप्त करणे, धर्म बिनधोक करणे तो स्वतःचे कर्तव्याच समजत होता. हिंदू राज्य जन्मते आहे, हे पाहून रामदास स्वाभाविकच हर्शोत्फुल झाला असावा. 'शिवाजीचा विजय, हा माझा विजय' व शिवाजीवर संकट, हे माझे संकट' असे रामदासला वाटले आश्चर्य नाही. (शिवाजी महाराज रयतेचे राजे होते त्या मूळे रयतेला शिवाजी महाराजांबद्दल अश्या प्रकारची आपुलकी असणे साहजिक वाटते..--- माझे मत) शिवाजीचे काही हेर रामदासी म्हणून हिंडत असणे अगर रामदासी मंडळींनी काही समजले, तर लगेच कळविणे असेही घडत असावे.(रयतेला शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी होती..त्या मूळे त्यांच्या पर्यंत पोहचणारी बातमी ते आपल्या राजापर्यंत पोहोचावी ज्याने करून त्याला आपल्या कडून थोडी मदत व्हावी हि इच्छा असणे साहजिक वाटते...तसेच रामदासी मठ सर्वप्रथम आदिलशाहीत स्थापन झाला...त्या मूळे आदिलशाहीशी रामदासांचे चांगले संबंध असल्यासारखे वाटते...अथवा आदिलशाही चे रामदासंबद्दल चांगले मत असावे म्हणून त्यांना आदिलशाहीत मज्जाव नसावा..त्याचाच फायदा शिवाजी महाराजांच्या हेरखात्याने आदिलशाहीत हेरगिरी कार्यासाठी घेतला असावा...अथवा रामदास हे हिंदू प्रेमी होते त्यामुळे त्यांनी स्वतः आपल्या भक्तांद्वारे आदिलशाहीतील गोपनीय माहिती शिवाजी महाराजांच्या हेरखात्या कडे पोहचवण्याची तरतूद केलेली असावी असे वाटते...----- माझे मत) पण हा इतिहास १६६० नंतरचा. प्रत्यक्ष राजकारणाशी रामदासांचा संबंध न्हवे . ------------------- नरहर कुरुंदकर....

सोमवार, ७ मे, २०१२

स्वराज्याची सुरवात

या पुढे मी छ. शिवराय आणि रामदास या विषयावर ही लेखमाला देत आहे.
१) रामदास हे लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेले...हे सगळ्यांना  माहीतच असेल...
जन्म - १६०८ ... १२ वर्षाचे म्हणजे १६२० ला ते लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेले...असो त्यानंतर म्हणे त्यांनी १२ वर्षे नाशिकला राम भक्तीत घालवली....आणि त्या नंतर १२ वर्षे भारत भ्रमंतीला गेले....

(१२ -१२ -१२ वर्षांचा similarity हा बहुतेक योगायोगच असावा..रामदासांनी बऱ्याच गोष्टी १२ -१२ -१२ वर्षांनी केलेल्या दिसतात..) असो म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी ते भारत भ्रमंतीला गेले.. १६३४ .... नंतर १२ वर्षांनी परत आले १६४६-१६४७ ला ......
        शिवाजी महाराजांनी स्वराज्य साठी १६४५ ला त्यांनी दादोजी नरसप्रभू देशपांडे यास एक पत्र लिहिले. तसेच १६४६ ला न्यायनिवाडाविषयक एका पत्रात शिरोभागी शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते...
तसेच शिवरायांनी १६४७ मध्ये तोरणा आणि राजगड हे दोन किल्ले घेतले....
१६४७ च्या दिवाळीत पुरंदर किल्लाही मोठ्या कौशल्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला...
स्वराज्य प्राप्तीची जमवाजमव १६४५ साली सुरु करण्यात आली....त्या मूळे इथे रामदासांचा काडीचा संबंध नाही हे सिद्ध होते...
          कारण रामदास हे १६४६ ला परिसरात आले.....असो.. ते जेव्हा आले त्या नंतर त्यांचे खरे काम चालू झाले त्या मूळे त्या आधी ते प्रसिद्ध असणे हे पटण्यासारखे नाही....काही जणांच्या मते रामदास १६४४ ला चाफळ इथे आले व त्यांनी तिथे कामास सुरवात केली.....त्यांनी प्रथम रामाची मूर्ती स्थापन करून रामजन्मोत्सव चालू केला..अश्या पद्धतीने त्यांनी कार्यास सुरवात केली....पुढे त्यांनी रामाला अनुसरून हनुमान भक्ती प्रचलित आणायला चालू केली.....रामदास पंथाची स्थापना १६४९ ला झाली....
        काही जन १६४९ ला रामदासांचा अनुग्रह महाराजांनी घेतला असे खोटे दावे करतात......रामदास शिवाजी महाराजांच्या शत्रूच्या आश्रयी ( बाजी घोरपडे यांचे कडे) असतांना शिवाजी महाराज रामदासांचा अनुग्रह घेतात हे पटण्यासारखेच नाही....बाजी घोरपडेंनी व आदिलशाहने रामदासांच्या चाफळ देवस्थानाला काही जमिनी इनाम दिल्या. त्यामुळे बाजी घोरपडे आणि मुरार जगदेव हे आदिलशहाचे सरदार चाफळ देवस्थानाचे विश्वस्त होते.
 
 
संतोष पवार यांच्या http://www.ramadasswami.blogspot.in या ब्लॉगवरून साभार
Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.