गुरुवार, ८ मार्च, २०१२

संत तुकाराम महाराजांची आरती - डाँ. पंजाबराव देशमुख



ठेवून मस्तक तुकोबा-चरणी
करण्या अभंग सरसावलो !
महाकवि श्रेष्ठ ह्या सम हाच ,
तयांसम जगी अन्य नाही . ।। 1 ।।
...
त्यांची सह्रदयता , त्यांची शुध्द वाणी
ठाव अंतरीचा घेत राही .
हां हो लोककवि ज्ञान पाजी जनां ,
अहंकारा तेथे जागा नाही . ।। 2 ।।

दावा अन्य कोणी पतितोध्दारक ,
कुभांडा मारक बाण ज्याचे ,
गर्विष्ठांना गर्व , मुर्खाँची मूर्खता ,
सत्तेची अंधता हरियेली ।। 3 ।।

श्रध्देची श्रेष्ठता , धर्माचे पाविञ्य ,
सत्याचेहि मर्म पटविले .
बरे झाले देवा , कुणबीच झालो ,
नाहीतर असतो गर्वे मेलो ।। 4 ।।

दावा कोण अन्य कवि हे वदला ,
एवढी नम्रता कोणाअंगी ?
ढोंगियांचे ढोंग , असत्य प्रचार ,
दिखाऊ संता हानी निष्ठुर प्रहार ।। 5 ।।

म्हणोनी आदर्श तुका माझा
कारणे दाविली , तो कां माझा
अभंग या वृत्ती सोय मराठीची ,
भंग नच कधी माञा-प्रासां . ।। 6 ।।

-
डाँ.पंजाबराव देशमुख
(भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री, विदर्भातील शिक्षण चळवळीचे जनक)
हे  पण वाचा...त्यासाठी क्लिक करा..-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.