सोमवार, १९ मार्च, २०१२

गुढीपाडवा हा मनुस्मृतिचेच प्रतिक!!

आम्हाला आमचे घरचे सांगतात कि गुढीपाडवा हा आपला नव वर्षदिन आहे. याच दिवशी श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने गुढ्या उभारल्या. त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढ्या उभारतो. ही माहिती घरच्यांना कोणी सांगितलेली असते? यात खरे किती खोटे किती? त्यातल्या त्यात देवधर्माची बाब असेल तर विचार करणे सुद्धा पाप. राम अयोध्येत परत आले म्हणून सर्वांनी गुढ्या उभ्या करायला हव्या होत्या. मग फ़क्त महाराष्ट्रातच हा सण साजरा का करतात?
मला काही प्रश्न पडतात ते असे की....
१) राम परत आले म्हणून अयोध्येत गुढ्या उभ्या का नाहीत करत? (अरे,अयोध्येतील लोकांना गुढ्या म्हणजे काय हे सुधा माहित नाही तर उभ्या करण्याचा प्रश्नच येत नाही.)
२)आपल्या धर्मात तांब्या शुभ कोणता? सरळ की पालथा? (तर सरळ त्यात पाने लावलेली, श्रीफळ वर ठेवलेले, चारी बाजुने पाच गंधाचे पट्टे ओढलेले.)
३)सरळ तांब्या शुभ तर गुढी पाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुढीला पालथा तांब्या ही शुभ कसा?
४)पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या ही शुभ कसा?
५)हे मनुवादी लोक आम्हांला गुडीपाढवा सण साजरा करण्यास का लावतात?
६) आम्ही मराठा बहुजन त्या दिवशी कडुलिंबाचा पाल तोंडात घेऊन कचाकचा का चावतो?(कारण आमचा राजा या दिवशी मारला गेला होता. आणि असा कडू दिवस मराठ्यांसाठी कडूच असणार ना?)
या मध्ये ही एक षडयंत्र आहे याच दिवशी छत्रपती वीर संभाजीराजे यांची मानुस्मुर्ती कायद्यानुसार ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली. त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबुला खोवले. मराठ्यांची इज्जत बांबूवर अड़कवुन त्याला साडीचोळी बांधून गळ्यात खेटरांची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणुक काढण्यात आली. ब्राम्हणांना आनंद झाला कारण हा मराठा बहुजनांचा पहिला राजा जो स्वत:पंडीत होता .त्याचबरोबर जगातील पहिला लेखक ज्याने वयाच्या चौदाव्या वर्षी चार ग्रंथ लिहिले नख शिक ,नायिकाभेद ,सातसटकहिन्दी मधे व बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृक मधे लिहला होता. ब्राम्हणांच्या नाकावर टिचून ज्ञान आणि लिखाण करणारा हाच तो राजा ज्याने, ब्राम्हण मंत्र्यांना मनुस्मृतिप्रमाणे हत्या करून हत्तीच्या पायाखाली दिले. बरे झाले मारला म्हणून ब्राम्हनानि आनंदाने गुढ्या उभ्या केल्या.
किती मोठे षड्यंत्र त्या दिवशी आमच्या घरावर गुढ्या? आमचा शोकदिन आमचा सण कसा? आमचे लाडके शम्भूराजे मारले तो दिन आमचा सण कसा?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.