रविवार, ४ मार्च, २०१२

शेतकऱ्यांची आत्महत्या

पुण्यातील एका हॉस्पिटलात गेलो होतो मी ICU च्या बाहेर बसलो माझ्या शेजारी एक व्यक्ती बसला होता ....मी त्यांना विचारले काका तुमचे कोण आहे हॉस्पिटल मध्ये त्यांनी सांगितले माझा मुलगा आहे .....त्यांनी विचारले तुझे हॉस्पिटल मध्ये कोण आहे मी सांगितले मित्राचे आजोबा आहेत .....त्यांनी नाव विचारले मी सांगितले भैया पाटील मुळचा नांदेड चा आहे ......ते काका प्रचंड दुखात होते सुरुवातीला त्यांनी मुलाला काय झाले हे सांगितले नाही पण त्यांना जेव्हा माझ्या बोलण्यावरून शेतकऱ्यां विषयी प्रेम आणि कणव दिसली तेव्हा त्यांनी आपले मन माझ्या सोबत मोकळे केले ....
ते काका सांगली जिल्ह्यातील एका खेडे गाव चे होते त्यांचा एकुलता एक मुलगा पुण्यात B.tech(Food मध्ये) करत आहे .त्यांनी सांगितले कि यावर्षी हळदी ने खूप घात केला गेल्यावर्षी २१ हजार क्विंटल ने जाणारी हळद या वर्षी ४ हजार नि जात आहे ...१७ हजार रुपये क्विंटल मागे कसे काय कमी होतात ???? मित्रानो मीडिया ५ रुपये ने कांदा महाग झाला कि आभाळ कोसळल्या गत बातम्या देते शेतकऱ्याच्या पिकाचा भाव १७ हजार रुपये क्विंटल मागे कमी होतो त्याची बातमी दिली जात नाही .....असो तो मीडिया चा प्रश्न आहे ......त्या नंतर त्यांनी सांगितले
गेल्यावर्षी मुलीचे लग्न झाले त्याला खूप खर्च झाला ....जमीन ४ एकर आहे १ एकर द्रांक्ष होते पण बाजारात मध्ये बेदाण्याला भाव खूप कमी आहे .....चार किलो द्राक्षांचे एक किलो बेदाणे होतात .......खरे पहिले तर बेदाण्याला भाव चारशे किलो च्यावर पाहिजे पण शेतकऱ्यांच्या अपेक्षा तेव्हढ्या हि नसतात त्यांना २५० रुपये किलो जरी भाव भेटला तरी खुप समाधानी भाव वाटतो ......
पण सांगली च्या मारवाड्यांनी गुजरात्यांनी बेदाण्याचा लिलाव ४० रुपये किलो करून भाव ४० रुपये किलो पाडला .......लाखो रुपये खर्च करून हातात काय उरणार शेतकऱ्याच्या ???? याने शेतकऱ्याना २ लाख च्यावर तोटा सहन करावा लागतो कसला नफा भेटतो शेतकर्‍याला ?? ........एका बोलीवर शेतकऱ्याचे जीवन समाप्त होते ........
त्यांनी सांगितले माझा मुलगा खुप हुशार आहे १० वी ला कोणतीही सुविधा नसताना त्याला ८४ टक्के मार्क पडले होते १२ वी ला ८८ टक्के पडले ...हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी येत होते .......त्यांचा मुलगा इचलकरंजी येथे इंजीनियरिंग करणार होता पण नंतर त्याने पुण्यात food मध्ये B.tech करावयाचे ठरवले ......त्याने पुण्यात प्रवेश घेतला .......
पुण्यातील कॉलेज साठी ७० हजार एवढी फी होती .....मुलांनी आणि त्याच्या वडिलांनी शैक्षणिक कर्ज काढण्याचा विचार केला त्यासाठी मुलाने सर्व माहिती काढली सर्व कागदपत्राची पूर्तता करून कर्जा साठी बँक मध्ये अर्ज केला ...........पण बँक मधून त्याला १ ते २ महिने फिरवण्यात आले ...........कॉलेज मध्ये परीक्षा जवळ आलेल्या तसेच कॉलेज ची फी भरण्याचे टेन्शन ......शेतीत हळद बेदाणा कांदा कशालाच नफा नाही सर्व पिके हातातून गेलेली ...........वडील आई शेतात रक्त सांडवत आहेत तरी हि कोणत्याही पिकाला भाव नसल्याने शेती तोट्यात बहिण्याच्या लग्नाला आणि द्राक्ष बागेला घेतलेले कर्ज वडिलाच्या डोक्यावर मुलाला घरी वडिलांना पैसे मागावे वाटले नाही कारण त्याला त्याच्या वडिलाची परिस्थिती समोर दिसत होती .............पुण्यात तो एक वेळ जेवण करून दिवस काढत होता .......कॉलेज मध्ये प्रशासनाने त्याला सांगितले अरे तुला आम्ही खुप सवलत दिली शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हळदी वर पैसे भरून टाकतो म्हणाला होता आता थोडी तरी फी भरून घे .......
मुलगा त्या दिवशी कॉलेज मधून लवकर घरी आला त्याने वडिलासाठी बहिणी साठी एक पत्र लिहिले ..........मेडीकल वर गेला झोपेच्या गोळ्या मागितल्या पण तिथे त्याला झोप्याच्या गोळ्या दिल्या नाही त्याने घरी येवून मच्छर मारायची गुड नाईट ची बॉटल पिली त्याला आपण याने मारणार नाही असे वाटले ....... त्याला विश्वास नसल्याले त्याने हाताची शीर कापून टाकली अर्ध्या तासात शेतकऱ्याचा मुलगा बेशुद्ध झाला तेव्हा त्याचे मित्र आले दरवाजा वाजवला मधून काहीच आवाज येत नव्हता झोपला का म्हणून त्यांनी खिडकी मधून डोकावून पहिले तर तोंडातून फेस हात रक्ताने माखलेला पहिला हे पहिला कि त्यांनी दरवाजा तोडून त्याला हॉस्पिटल मध्ये आणले ........
डॉक्टर ४८ तास धोक्याचे आहेत म्हणून सांगत आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाचे आत्महत्या करण्याअगोदर लिहलेले पत्र मला दाखवले...
मुलाने लिहिले होते "बाबा मला माफ करा तुमचे स्वप्न मी अपूर्ण ठेवून जात आहे मला वाटले होते कि मी शिकून तुम्हाला आरामाचे जीवन देईल पण बाबा शिक्षणासाठी लागणारा खर्च आपल्याला परवडणारा नाही .....बँक लोन साठी अनेक चकरा मारल्या दलाला मार्फत कर्ज मिळते म्हणून मी आपल्या गावातील XXXX XXX या व्यक्तीला ५ हजार रुपये कर्ज काढून देण्यासाठी दिले पण तो हि अजून कर्ज काढून देत नाही .कर्जासाठी चकरा मारून दमलोय ..कॉलेज मध्ये मी ३ महिन्यात सर्व पैशे भरतो म्हटले होते पण आता कोणताही मार्ग नाही.......मी समजूतदार आणि हुशार आहे असी स्तुती तुम्ही नेहमी गावात नातेवाईकात करता पण तुमचा समजूतदार मुलगा आपले जीवन संपवत आहे बाबा मला माफ करा ........पण दुसरा कोणताही पर्याय नाही ...........आज पर्यंत तुम्ही माझ्या साठी खुप कष्ट घेतलेत चोवीस तास शेतात राबून तुम्ही माझ्या शिक्षणासाठी खर्च केलात ........मी तुमच्या साठी काहीच करू शकलो नाही ......याचे मला खुप दुख वाटत आहे ..........ताईच्या लग्नासाठी काढलेले कर्ज अजून आपल्यावर आहे त्याचे तुम्ही टेन्शन घेऊ नका .....आता कोणताही खर्च तुम्हाला करावा लागणार नाही हळू हळू कर्ज फेडा ........पुढील जीवनात बाबा मी तुमचा मुलगा म्हणूनच जन्म घेईल "
पत्र खुप भावनिक ४ पानाचे होते मी वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले त्याने आपल्या आत्महत्ये साठी कुणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले होते........
त्या काकाना धीर देण्यासाठी माझ्या कडे शब्द नव्हते त्यांना मी म्हटले काका लवकर बरा होईल चिंता करू नका ........
त्या नंतर घरी आल्यानंतरहि मला तो शेतकरी आणि त्याचा मुलगा जो मृत्युशी झुंज देतोय हे दिसत होते ते चित्र माझ्या डोळ्यावरून जात नव्हते ...........
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुले जर आत्महत्या करत असतील तर मराठवाडा विदर्भात किती भयंकर स्तीती असेल कशा स्तीती मध्ये मुलाच्या शिक्षणाचा खर्च शेतकरी बांधवाना परवडणार ?
निसर्गाने आणि समाजाने सरकार ने शेतकऱ्याचे शोषण करणे सुरु केले आहे ........या शोषणात शेतकरी कसा तग धरेल कांद्याला ५ रुपये जास्त द्यावे लागले तर आपण आकाश पातळ एक करतो ........दिवसभर मीडिया कांद्याने रडविले .......बाजारात जाऊन ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात .........मी दोन वर्षापूर्वी कांदा १ रुपये किलो नी घेत होतो आता तो २० रुपये किलो झालाय ........खुप महाग झाला कांदा हीच प्रतिक्रिया दिवसभर दाखवण्यात येते ...............अरे पण हळद क्विंटल मागे १७ हजारांनी कमी झाली शेतकरी कसा पचवत असेल हे कापूस गेल्यावर्षी ६ हजार होता यावर्षी ३ हजारांनी कमी झाला प्रत्येक पिकात लाखो चा तोटा होतोय त्याने आपली लेकरे शिकवायची कि नाही??????? ...........
त्याला क्विंटल मागे १७ हजाराचा तोटा सहन होईल हो पण मुलांना वाढवून शिकवून मुले आत्महत्या जर करत असतील तर त्याला हे पचवता येणार नाही .............त्याला हे सहन होणार नाही .....................
माझ्या शेतकऱ्याच्या पोरानो आत्महत्या हा पर्याय नाही ........आपल्या आईवडिला साठी आपण काही तरी करायचे आहे ............आपण जर हार मानून आत्महत्या केली तर या समाजाला रक्ताची चटक लागेल ..............या समाजाच्या मीडियाच्या व्यापाऱ्यांच्या शोषणाला आपल्याला उत्तर द्यायचे आहे कोणत्याही परिस्थिती मध्ये तुम्ही हार मानू नका ................आपण हि शेतकऱ्यांची परिस्थिती बदलू शेतकऱ्याचे शोषण थांबवू जीवन पुन्हा भेटत नाही भावनो ................आपण या क्रूर व्यवस्थे समोर झुकलो तर येणाऱ्या काळात शेतकरी दुर्मिळ होऊन जाईल .........http://www.facebook.com/bhaiya.patil2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.