५) रामदास हे छ. शिवरायांचे अध्यात्मिक किंवा राजकीय गुरु न्हवते याचे आणखी काही पुरावे देता येतील.
एका पत्रावरून छ. शिवरायांच्या मनात रामादासंविषयी कोणती भावना होती, छ. शिवरायांचे काय स्थान होते. ते स्पष्ट होते. दि. ९/८/१६७६ रोजी छ. शिवरायांनी दत्ताजीपंत व गणेश गोजदाऊ यांना लिहिलेल्या आज्ञापत्रात म्हटले आहे. ' रामदास गोसावी व देवाकरिता ब्राह्मण तेथे येऊन राहतात , त्यांचा परामर्ष घ्यावा' -- (शिवरायांची आज्ञापत्रे.) या आज्ञापत्रावरून काही गोष्टी स्पष्ट होतात. छ. शिवराय रामदासांचा उल्लेख आदरपूर्वक करीत नाहीत. जर गुरु असते तर आज्ञेत 'श्री रामदास स्वामी' असे म्हटले असते. इतर सामान्य साधू, गोसाव्याप्रमाणे रामदासांना दान- दक्षिणा द्यावी असा छ. शिवरायांचा सूर आहे. रामदास गुरु असते तर छ. शिवरायांनी त्यांना अशी वागणूक देण्याविषयी फर्मावले असते काय???? पुढे १६७८ मध्ये छ. शिवरायांनी चाफळच्या मठास इनाम दिल्याचा पुरावा आहे. पण याचा अर्थ छ. शिवरायांचे रामदास गुरु होते असा होत नाही. छ. शिवरायांनी अनेक साधू संतांना जमिनी इनाम दिल्या. मग ते सर्वच छ.शिवरायांचे गुरु होतात काय??
रामदास हे छ. शिवरायांचे गुरु होते असे क्षणभर मान्य केले , तरी काही प्रश्न उद्भवतात. त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा छ. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मणांनी विरोध केला, तेव्हा ब्राह्मण असणाऱ्या रामदासांनी छ. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी कोणतेच प्रयत्न का केले नाहीत?? समजा प्रयत्न करायचे बाजूस ठेवले तरी ६ जून, १६७४ रोजी जेव्हा राज्याभिषेक झाला, तेव्हा राज्याभिषेकास काशीहून (उत्तर भारत) गागाभट्ट आला. तर परदेशातून हेन्री औक्जिडेन्त उपस्थित राहिला. मग महाराष्ट्रात भटकणाऱ्या रामदासांना आपल्या महान शिष्याला आशीर्वाद देण्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहावे असे का वाटले नाही? यातून हेच स्पष्ट होते कि रामदास हे छ. शिवरायाचे गुरु न्हवते. रामदास राजकीय दृष्टीकोनातून छ. शिवरायांचे गुरु न्हवतेच, कारण राज्याभिषेकापर्यंत छ. शिवरायांची रामदासांशी भेट झाल्याचा कोणताच पुरावा नाही.
रामदासांची शिकवण आणि महाराजांची वर्तणूक...
६) रामदास महाराजांचे अध्यात्मिक दृष्ट्याही गुरु न्हवते. कारण रामदासांचे विचार हे ब्राह्मणी वर्चस्व भावनेतून ब्राह्मण धर्म रक्षण करणारे होते. उदा. दाखल त्यांचे काही श्लोक घेता येतील
अंतर तो एक खरे, परी संगती घेऊ नये महारे|
पंडित आणि चाटी पोरे | एक कैशी ||
पंडित आणि चाटी पोरे | एक कैशी ||
(वरील श्लोक विरोधी शिवरायांची भूमिका ---- वाई परगण्यातील नागनवाडी गावाची पाटीलकी छ. शिवरायांनी नागनाक महाराला दिली. अनेक महार , मांग किल्लेदार होते. तर रामोशी हेर खात्यात होते...)
गुरु तो सकालांशी ब्राह्मण | जरी तो झाला क्रियाहीन,
तरी तयासीच शरण | अनन्यभाव असावे ||
तरी तयासीच शरण | अनन्यभाव असावे ||
(वरील श्लोक विरोधी शिवरायांची भूमिका -- संत तुकाराम महाराज, याकूत बाबा अशा ब्राह्मणेतर संतांना हि शिवराय मानत...)
असो ब्राह्मण, सुरवर वंदिती| तेथे मानव बापुडे किती|
जरी ब्राह्मण मूढमती | तरी तो जगदवंद्य ||
जरी ब्राह्मण मूढमती | तरी तो जगदवंद्य ||
अर्थ -- मूढमती म्हणजे मूर्ख. ब्रह्मण मूर्ख असला तरी तो जगाला वंदनीय असतो, असे रामदास म्हणतात.
देवा ब्राह्मणा राज्य करी | तो एक मूर्ख ||
रामदासांनी सांगितलेले मूर्खाचे एक लक्षण.
महाराजांचे विरोधी तत्व --- छ. शिवरायांनी ब्राह्मणांवर फक्त राज्यच केले नाही तर वेळ पडल्यास त्यांना कठोर शासनही केले. अशा छ. शिवरायांना रामदासांचे शिष्य मानाने योग्य वाटत नाही...कारण दोघांच्या विचारात बराच विरोधाभास आढळतो....
महाराजांचे विरोधी तत्व --- छ. शिवरायांनी ब्राह्मणांवर फक्त राज्यच केले नाही तर वेळ पडल्यास त्यांना कठोर शासनही केले. अशा छ. शिवरायांना रामदासांचे शिष्य मानाने योग्य वाटत नाही...कारण दोघांच्या विचारात बराच विरोधाभास आढळतो....
संदर्भ ---- शिवचरित्र मिथक आणि वास्तव. - ---श्यामसुंदर मिरजकर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा