बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

!...क्रांतिची फुले...!

काल 'महात्मा फुलेच्या'
'पुतळ्याला' फुले वाहत होतो,
मनात त्यांच्या विचाराच एक स्वप्न पाहत होतो.
...

विचार करता करता 'आश्चर्य' झाले,
अन 'पुतळ्यातुन' महात्मा मह्यासमोर आले.
अंगावरची 'धुळ' झटकत त्यानी
'फेटा' नीट केला,
अन् म्हणाले, 'नागा, लय दिवसांनी इकड आला ?'

म्या म्हणलो,
'आज तुमची 'पुण्यतिथी', म्हणल जावुन येवाव,
अन् 'समाजसेवेच्या' कार्यात सहभाग घ्यावाव'.

महात्मा म्हणाले,
'नागा, 'जयंत्या' करुन
समाजसेवा व्हणार नाय,
अन् 'मुलनिवाशी' यांच दुःख दुर जाणार नाय.'

म्या म्हणलो,
'मुलनिवाशीयांना असं दुःख तरी काय ?
अन् खरच हे दुर जाणार कस नाय ?

महात्मा म्हणाले,
'नागा, मी पण 'परांजपे' च्या लग्नात 'अपमान' सहन केला,
'सनातनी' ब्राम्हणाकडुन 'खुनाचा' प्रयत्न पण झाला,
'सावित्री' च्या अंगावर फेकला
'शेणा दगडाचा' घाला,
ही 'अस्पृशाची कैफियत' काय सांगु नागा तुला'.

मला आश्चर्य वाटल,
म्या म्हणल,
'एव्हढ तुम्हाला त्या काळी छळल,
अन् आम्हाला हे आतापर्यत नाही कळलं'.

महात्मा म्हणाले, 'नागा,
अरे मनुवाद्याने असे खुप 'कावे' केले,
शिवाजीचा 'अंत' पाहिला अन् संभाजीचे 'तुकडे' केले,
'कबीराला' संपवुन चलाखिने तुकारामास 'वैकुंठा' नेले,
'ईतिहास झाकुन' खरा, देवाची
'हाडे चघळाय' दिले'.

म्या म्हणल,
'आता ही परिस्थिती कदापि नाय,
एखादी असली तर मग सोबत
'कायदा' हाय'.

महात्मा म्हणाले,
'नागा, 'बिळाच्या' बाहेर येवुन तु कधी पाहणार,
स्वतःच्या 'संसारात' गुंतला तु समाजात काय राहणार,

आजही 'खैरलांजी' डोळ्या समोर घडतो,
आजही तो 'बाबरीच्या' एक एक
'विटा' पाडतो,
आजही 'बहुजन' तिरस्काराच्या नाल्यात सडतो,
आजही 'तो' डोक्यावर पाय देवुन तुमच्या वरे चढतो,
आजही हा 'मुलनिवासी' गटागटात लढतो,
अन् आजही 'रामदास' मनुवाद्याच्या पाया पडतो,
ईथे 'एकीच्या' लढाईला प्रत्येकाचा 'स्वार्थ' नडतो,
तेव्हात मुलनिवाशीयावर
'अन्याय' वाढतो,
भुक, गरीबी, अत्याचारात त्याचा पाय आडतो,
बघ नागा,
आजही तुझा समाज 'ढसा ढसा' लडतो,
आजही तुझा समाज 'ढसा ढसा' लडतो.

म्या डोळ्याच 'पाणी' पुसत म्हणालो,
'आता यावर तुम्ही उपाय सांगा,
नाही हटणार मी, आता झालोय जागा.'

महात्मा म्हणाले,
'नागा, 'ब्राम्हणाचे कसब' माहित आहे तुला,
मग घे 'आसुड' अन् तोडुन टाक
'गुलामगीरीला',
'शिवरायांच्या' विचारांचा मनी ध्यास घे,
कापत सुट 'अन्यायाला' मगच
'श्वास' घे,
भिमरायाची 'लेखनी' आत्मसात कर,
अन् मनुवाद्याचा 'एकजुटीने घात' कर
'विद्रोही तुकाराम' तुझ्या अंगात येवु दे,
अन् 'मनात बिरसा' असाच तळपत राहू दे,
अशीच तुझ्या विचारांना कायमची 'धार' राहिल,
तर एक दिवस,
नक्किच 'मनुवाद्याची हार' होईल,
नक्किच 'मनुवाद्याची हार' होईल...!'

.
.
.
.
पुतळ्यातला महात्मा 'शांत' झाला,
पण, माझ्या 'मनात आग' लावुन गेला.

आता,
ठरवलं 'विभागुन' जायायच नाही,
कदापि 'मागे वळुन' पाहायच नाही,
अन् मुलनिवाशी यातिल
'भेदभाव' मिटवुन
'क्रांति' घडवल्याशिवाय राहायच नाही....
'क्रांति' घडवल्याशिवाय राहायच नाही....

कवी: अभय भिमराव नागवंशी (नाग)
और आगे देखें

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.