गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

शिक्षक दिन म.फुले यांच्या पुण्यतिथी (२८ नोव्हेंबर) ला साजरा करावा


शिक्षक दिन म.फुले यांच्या पुण्यतिथी (२८ नोव्हेंबर) ला साजरा करावा ...................... डॉ.राधाकृष्णन यांनी पी.एच .डी. चा प्रबंध चोरून स्व: ताच्या नावावर प्रकाशित केला .त्या विरुद्ध १९३० साली कलकत्ता हायकोर्टात खटला चालला.त्यांच्यानावाने शिक्षक दिन साजरा करणे हा देशाचा , शिक्षण क्षेत्राचा अपमान आहे. डॉ.राधाकृष्णन यांनी वैदिक परंपरेचे उदात्तीकरण करणारे साहित्य लिहिले.डॉ.राधाकृष्णन यांनी पुस्तकातून मनुवाद जपला . म.फुले यांचे साहित्य बहुजन हिताचे आहे.समाज उपयोगाचे आहे. प्रथम मुलीसाठी शाळा काढणारे म.फुले होत. डॉ.राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी "राधाकृष्ण अ बायोग्राफी " या ग्रंथात डॉ.राधाकृष्णन हे कसे स्त्री शिक्षण विरोधी होते याचे विवेचन केले आहे. डॉ.राधाकृष्णन हे मुलीचा जन्म हा सेवेसाठी असतो या मताचे होते. म.फुले म्हणजे अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद खुला करणारे, स्त्री शिक्षणाचे कैवारी छ. शाहू महाराज म्हणजे अस्पृश्यांना संधी देणारे, रयतेचे राजे डॉ. आंबेडकर म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितांचे कैवारी या पलीकडे फुले, शाहू, आंबेडकरांची ओळख ख-या अर्थाने अभ्यासक्रमातून दिली जात नाही. शिक्षणातून नवा माणूस घडविला जातो. त्यामुळे भारतीय माणूस उच्चशिक्षित होऊनही समाज परिवर्तनाच्या आड येणा- या अंधश्रध्दा, जातीयवाद, विषमता या गोष्टी स्पष्टपणे नाकारू शकत नाही. मानसिक अस्पृश्यता जोपासण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होत असून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या मूल्याशीही प्रामाणिकपणाचा अभाव दिसून येत आहे. म. फुले यांनी सावित्रीबार्इंना घेऊन भविष्याचा अचूक वेध घेऊन दूरदृष्टिकोनातून प्रस्थापित समाजव्यवस्थेतीलआधारभूत असलेल्या स्मृती- श्रुतीप्रणीत विचारसरणीत आमूलाग्र बदल आणण्यासाठी बहुजनांना नाकारलेल्यांना, अस्पृश्यांना, स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे बंद असलेले दार सताड उघडे केले. हे आमूलाग्र परिवर्तन फुलेंच्या चळवळीनेच शक्य झाले. शेकडो वर्षे वर्ण वर्ग जातिव्यवस्थेच्या बेड्यात बंदिस्त असलेल्या शुद्रातीशुद्र समाजाला व स्त्रियांना स्वअस्तित्वाची जाणीव करून देणारा विद्रोही विचार फुले यांनी या भूमीत प्रथम रुजविला व स्त्रीमुक्ती तत्त्वज्ञानाचे ख-या अर्थाने दालन त्यांनी उघडले. बहुजनांना ज्ञानाची कवाडे सताड उघडून दिली व बहुजन समाजातील शिक्षणाची चळवळ यशस्वी होण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी या ऐतिहासिक कार्याला म. फुलेंनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी सावित्रीबाई अवघी १७ वर्षाची होती. म. फुलेंच्या सामाजिक क्रांतिवादीचा मुख्य आधार म्हणजे शिक्षण. शिक्षण नसल्यामुळे बहुजन समाज गतिहीन, मतिहीन, नीतिहीन आणि अर्थहीन झाला असे त्यांनी विलक्षण पोटतिडकीने सांगितले. शिक्षणावर विलक्षण प्रेम करणा-या फुले यांनी आपल्या लिखाणातून १९व्या शतकामध्ये एक क्रांतिकारक संदेश दिला तो म्हणजे, ‘विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले... या महान संदेशाने १९ व्या शतकात क्रांती झाली आणि हजारो वर्षे स्त्री जातीचा आक्रोश गगनी भिडविला तो म. फुलेंच्या संदेशामुळेच. आज २१व्या शतकाची पहाट उगवत असताना शिक्षणाचे व्यापारीकरण, बाजारीकरण झाल्याचे निदर्शनास येत आहे. फुले, शाहू, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे व्यापारीकरण, बाजारीकरण या आधुनिक समस्येची कधीच कल्पना केली नसेल. शिक्षणाचे व्यापारीकरण या आधुनिक समस्येमध्ये आपल्या देशाचे भवितव्य दडले आहे. आज आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शिक्षणावर तरतूद, बजेट इतर देशांच्या तुलनेने फारच अल्प असते. यावरून भारत सरकारची उदासीनता दिसून येते. डोनेशन, वर्गणी, अवाजवी फी इ. आर्थिक समस्येमुळे विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीत व उच्च शिक्षणापासून वंचित राहिला जात आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण हा प्रश्न महत्त्वाचा म्हणावा लागेल. हे ज्या दिवशी आमच्या नेत्यांना समजेल तो सुदिन म्हणावा लागेल. पण आज आपण मात्र फुले-शाहू आंबेडकरांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात धन्यता मानतो. मात्र म. फुले यांनी १८८२ मध्ये हंटर कमिशनपुढे जो अहवाल सादर केला, त्या अहवालामध्ये शिक्षणाचा मुद्दा त्यांनी मांडला. स्वत: फुले व सावित्रीबाई या दोघांनी पुढाकार घेऊन शिक्षण देण्यास सुरुवात केली नसती तर आज आपण कोठे असतो? या प्रश्नाची आपण कधीच गांभीर्याने दखल घेतली नाही. म्हणून फुले यांना इंग्रज सरकारचे शिक्षणविषयक धोरण त्यांना प्रतिगामी स्वरूपाचे वाटत होते. वरच्या वर्गाकडून खालच्या वर्गाकडे शिक्षण आपोआप झिरपत येईल. या विचाराशी ते मुळीच सहमत नव्हते. उच्चवर्णीय व उच्चवर्गीय लोक आपल्या उच्च शिक्षणाची काळजी घेण्यास समर्थ असल्याने त्याकडील लक्ष जरासे कमी करून सरकारने जनतेच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. शिक्षणाच्या अभावामुळे शेतकरी दरिद्री बनला अशी खंत फुलेंनी व्यक्त केली. निदान वयाच्या १२व्या वर्षापर्यंत सर्व मुलामुलींसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची मागणी त्यांनी केली. शुद्र शेतक-यांची, मजुराची बहुजनांची मुले शिकून मोठी झाली पाहिजेत. सरकारी हुद्यावर मोठमोठ्या जागा दाव्यात. शिक्षणाची पध्दती व राखीव जागा याबाबत घेतलेल्या भूमिका त्या काळात तर योग्य होत्याच परंतु आजही त्या मार्गदर्शक आहेत. १८८२ मध्ये हंटर कमिशनपुढे पुण्यातून आठ निवेदने सादर करण्यात आली. स्त्री शिक्षणावर भर देणारे एकटे म. फुले होते. इतर शास्त्री पंडितांनी संस्कृत, विद्या व जुन्या शाळा यांच्याच पुनरुज्जीवनाची मागणी केल्याचे आढळते. म. फुले यांचा संघर्ष हा केवळ शूद्रातिशुद्रां च्या हक्कासाठी होता असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. त्यांचा संघर्ष हा मानवी प्रतिष्ठेसाठी होता. मानवी जीवनात जे जे रोगट, कुरूप, विषम असेल त्या सर्वांविरुद्ध त्यांनी आसूड उगारला आहे. आज महाराष्ट्रामध्ये दररोज शेतक-यांच्या आत्महत्या पाहतो. परंतु फुले यांनी ‘शेतक-यांचा आसूड’ या ग्रंथामध्ये शेतीच्या प्रश्नाबाबत शेतकरी, शेतमजूर यांच्याबाबत, सावकारीबाबत, पाणी व जनावरांच्या चा- यांच्या नियोजनाबाबत, शेतक-यांच्या शोषणाबाबत गांभीर्याने लिखाण केले आहे. फुले हे एकमेव समाजचिंतक आहेत की, त्यांनी प्रथमतः:च शेतक- यांचे शोषणाबाबत फार बारकाईने विवेचन केले आहे. शेती सुधारण्यासाठी अत्याधुनिक ज्ञान, त्यासंबंधीच्या ग्रंथाची उपलब्धता, नांगरणीसाठी उत्तम जनावरे, बैल, जनावरांना चरण्यासाठी मोकळी जंगले, वाहणा- या पाण्याला अडवून पोलीस व सैन्यामार्फत बंधारे बांधणे, पाण्याचा शोध, पिकांचे संशोधन, संरक्षण व त्यासाठी सुरक्षा इ. अनेकविध उपाय व सूचना फुले यांनी सुचविल्या आहेत. शेतक-यांच्या विपन्न अवस्थेबाबत सखोल चर्चा ‘शेतक-यांचा आसूड’ या महान ग्रंथातून केली आहे. परंतु दुर्दैवाने त्यांच्या ग्रंथांची कोणी दखल घेतल्याचे जाणवत नाही. आमच्या नेत्यांनी फुलेंचे लेखन वाचले असते तर शेतकरी व मजुरांचे असंख्य प्रश्न सुटले असते हे इथे धाडसाने नमूद करावे लागते. शेतक-यांचा आसूड व छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा, गुलामगिरी या पुस्तकातून चिंतन करण्याची आज गरज आहे. म्हणून त्यांच्या विचाराने शेतकरी शिक्षित व जागृत होणे गरजेचे आहे पण त्यापेक्षा शेतक-यांच्या हिताचा निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेणे हे त्यांना अभिप्रेत होते. अन्यथा सरकारने कितीही आर्थिक पॅकेजच्या घोषणा केल्या, किती ही शेतकरी अधिवेशने घेतली तर त्याचा काडीमात्र उपयोग होणार नाही म्हणून त्यांनी राष्ट्रीय सभेमध्ये शेतक- यांना सामावून घेणे, शेतक-यांचा कर्जपुरवठा, सावकारी पाशातून मुक्तता व सवलती व त्यांच्या हिताचे निर्णय याविषयी त्यांनी आग्रह धरला. परंतु राष्ट्रीय सभेने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि आजही शेतकरी, शेतमजूर यांच्याबाबत सरकारी धोरणेबाबत उदासीनता दिसून येते. हे निर्विवाद सत्य म्हणावे लागेल. व्यापा-यांच्या, सावका-यांच्या शोषणातून शेतकरी मुक्त झाला पाहिजे. तसेच त्यांच्या नव्या जाणिवा पचविलेला नवा शेतकरी फुले यांना निर्माण करायचा होता. कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल व महाराष्ट्राची शेतकरी हा जागतिक क्षितिजावर ताठ मानेने उभा असावा हे त्यांचे स्वप्न होते. फुले यांनी विचारच सांगितले नाहीत तर उक्तीप्रमाणे कृती केली, सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाज परिवर्तनाच्या, चळवळीचे ते एक हत्यार बनविले. शोषित पिडीत समाजामध्ये जाऊन प्रत्यक्ष कृतीवर त्यांनी आंदोलन उभारले. शेतकरी वर्गावर होणा- या अन्यायाविरुध्द दंड थोपटून उभे राहणारे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिले समाजचिंतक शेतक-यांचे कैवारी म. फुलेच आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.