शनिवार, २ जून, २०१२

शिवराज्याभिषेक सोहळा - ६ जून



उधळुन कौतुकाची फुले करू विजयी उत्सव साजरा
मराठ्यांचा खरा हाच दिवाळी दसरा....
गनिम आहे नजर रोखुन आता तरी हेवे देवे विसरा....
ज्या छत्रपतिंचा आम्हाला अभिमान आहे ....
तोच जगाचा सर्वशक्तीमान आहे....
ज्याचे हे भगवे निशाण आहे....
तो ३३ कोटी देवाचा एकटाच प्राण आहे....
जिजाऊंच्या संस्कारची शिवबाला जान आहे....
स्वराज्य ज्याचे खरी शान आहे....
असा तो रयतेचा जाणता राजा एकमेव महान आहे....
आपल्या सर्वांचे हेच खरे मानधन आहे....
तुमचा जर जिवंत आजही स्वाभिमान आहे....
तर तुम्हाला या स्वातंत्र्याची आन आहे....
आपल्या मोठ्या धन्याच्या राज्याभिषेक सोहळ्याला येण्याचे हे आमंत्रण आहे....
शिवराज्याभिषेक सोहळा    जून रायगडावर साजरा होणार !! उठा शिवछत्रपतीभक्तानो.....रायगड कडे कूच करा..........दाखवा...मराठ्याचे रक्त............शासनाचा "बाप" शिवरायांचा भक्त !!
चला रायगडाला !! चला रायगडाला !! चला रायगडाला !! चला रायगडाला !!

शिवराज्याभिषेक सोहळा २०१२ निमित्त रायगडावर होणारे कार्यक्रम !!!
दि. ५ जून सायं. ४:३० वा. गडपूजन आणि शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके. (स्थळ: नगारखाना, राजसभा)
सायं. ५:३० वा. शाहिरी कार्यक्रम. (स्थळ: राजसदर, रायगड.)
सायं. ६:३० वा. शिवदुर्गांची गाथा आणि व्यथा. (लघुपट)
सायं. ७:०० वा. शिव छत्रपतींच्या जीवनावरील विविध पुस्तकांचा प्रकाशन सोहळा
सायं. ७:३० वा. "महाराष्ट्राची लोकधारा" (महाराष्ट्राचे संपूर्ण सांस्कृतिक लोकदर्शन)
सायं. ८:०० वा. अन्नछ्त्राचे उदघाटन. (स्थळ: जिल्हा परिषद शेड, रायगड.)
सायं. ८:३० वा. गड देवता शिरकाई देवी व तुळजाभवानी देवीच्या गोंधळाचा पारंपारिक कार्यक्रम. (स्थळ: शिरकाई मंदिर)
रात्री ९ ते १२ वा. शाहिरी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम. (स्थळ: राजसदर, रायगड.)

दि. ६ जून सकाळी ५:३० वा. गडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगव्या ध्वजाचे आरोहण
सकाळी ६:०० वा. राजसदरेवरील कार्यक्रमास सुरुवात.
सकाळी ८:०० वा. राजसदर येथे शाहिरी मुजर्याचा कार्यक्रम.
सकाळी ९:३० वा. पारंपारिक वाघांच्या गजरात छत्रपती संभाजीराजे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे राजसदरेवर  आगमन .
सकाळी १०:०० वा. शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात छत्रपती संभाजीराजे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे यांचे हस्ते अभिषेक.
सकाळी १०:२० वा. मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत शिवरायांच्या मूर्तीस छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण सोहळा
सकाळी १०:३०  वा. प्रास्ताविक : इंद्रजित सावंत. छत्रपती संभाजीराजे यांचे उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन  आणि प्रमुख पाहुण्यांची भाषणे.
सकाळी ११:००  वा. पालखी मिरवणूक. (राजसदरेवरून जगदिश्वर मंदिराकडे)
दुपारी १२:००  वा. कार्यक्रमाची सांगता. (जगदिश्वर मंदिर, शिवछत्रपती समाधी येथे) 
|| छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा || उठा शिवछत्रपतीभक्तानो.....रायगड कडे कूच    करा ..........दाखवा...मराठ्याचे रक्त............शासनाचा "बाप" शिवरायांचा भक्त !! चला रायगड !!चला रायगड !! चला रायगड !!चला रायगड !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.