शुक्रवार, १ जून, २०१२

12) रामदाशी शिष्यांचे प्रयत्न.. आणि भगव्या रंगाचा वाद.....भास्करराव जाधवांनी केलेले खंडन..


""श्रीयुत सरवटे  हनुमद्भक्तीवरील प्रवचन अपूर्व आहे. हनुभक्त स्वार्थाला पारखा असतो व इतर देवांचा भक्त स्वार्थी असतोअसा त्यांच्या प्रतीपादनांतून आशय निघतो. यासंबंधाने रा. सरवटे म्हणतात :- 
     "हनुमंताच्या रामचन्द्राशी जडलेल्या संबंधाला गुणानवरील अनुरक्ती हे कारण असूनत्यापासून हिंदुस्थानातील लोकांनी घेतलेला धडा भगवत्भक्तीचा आहे. त्या संबंधाला देशद्रोहाचा रंग श्री. जाधवांच्या दृष्टीने दिला आहे. हनुमंताचे शिष्य होण्याने महाराष्ट्राची स्वधर्मावरील भक्ती दुणावलीस्फूर्ती प्रदीप्त झाली. त्याचीच फलश्रुती स्वराज्यप्राप्तीत झाली. मोगलांना मिळालेलेइंग्रजांना फितूर झालेलेकिंवा त्यांच्या सैन्यात सामील झालेले लोकया  हनुमद्भक्तीला पारखे असल्यामुळेच तिकडे गेले होते. या भक्तांचे त्यांच्याठायी असलेले धर्माविषयीचे औदासिन्य  हे त्यांचे शत्रूला मिळण्याचे कारण होते. स्वार्थ किंवा लोभ त्यांना शत्रुत्व मिळण्यास लावीत होता. तो स्वार्थ व लोभ हनुमद्भक्तीने इतरांमधून नाहीसा केला होता;" इत्यादी.
                 समर्थ रामदासांनी  हनुमद्भक्तीचा प्रसार केला व शिवाजीमहाराजांच्या हस्ते स्वराज्याची स्थापना केली अशी श्री सरवटे यांची समजूत दिसते. त्यांचे मते शहाजीराजापासून  पूर्वीचे देवगिरीच्या यादवांपर्यंत सर्व लोक  हनुमद्भक्तीस पारखे होते. पण शिवाजीनंतरचे मराठे हनुमद्भक्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान संचारून स्वराज्याची स्थापना झाली. याला पुरावा म्हणून प्रत्येक गावी मारुतीची स्थापनाश्रीरामदासांनी केली असा जोसमज पसरवून देण्यात येत आहेत्याचा आधार देण्यात येईल असे वाटते.
                 हनुमंत हा पूर्वीपासून द्रविडांचा एक प्रख्यात देव आहेव त्याची देवळे पूर्वीपासूनची होती. श्रीरामदासांच्या पूर्वीपासूनची होती. श्रीरामदासांच्या शिष्य वर्गापैकी कोणीतरी आपल्या परमगुरुचे महत्ववाढविण्यासाठी रामदासांनी हि देवळे स्थापिली असा समज पसरवून दिला आहे. इ.स.१६७२ पर्यंत श्री शिवाजी व श्री रामदास यांची भेटच झाली न्हवतीहे आत्ता सिद्ध झालेले आहे. त्यावरून स्वराज्य स्थापण्याच्या कामी श्री रामदास व हनुमद्भक्ती यांचा संबंध न्हवता व त्या स्थापण्याचे श्रेय हनुमद्भाक्तीकडे देणे केवळ अंधश्रद्धेचे होईल. भोसल्यांचे घराणे रामभक्त झाले नाही. शिवभक्तच राहिले. शिखर शिंगणापूरचा महादेव हा त्यांचाकुलदेव आहे. व त्या देवांचे भगवे निशाण श्रीशहाजीने आपला झेंडा केला व श्रीशिवाजीने तोच चालू ठेवला. म्हणूनच तंजावरच्या राजवाड्यावर तो आजही फडकत आहे. श्रीरामदासास शिवाजीने राज्य अर्पण केले व राज्य दिल्याची चिठी  झोळीत टाकली व आपली छाटी म्हणून निशाण भगवे करण्यास समर्थांनी आज्ञा दिली,असा समाज रामदासी पंथाने पसरविला आहे. पण हे राज्यदान कल्पित आहे. भगवे निशाण करण्यास रामदासाने सांगितले हि गोष्ट बनावट आहे. श्रीरामदास हे ब्रह्मचारी असल्याने त्यांची कफनी व  छाटी हुरमुजी रंगाची असेभगव्या रंगाची नसे. मराठ्यांचे निशाण भगव्या रंगाचे आहेहुरमुजी नाही. यावरून त्या निशाणाचा संबंध श्रीरामदासांशी लावणे म्हणजे वडाची साल पिंपळास  लावण्यासारखेच आहे.
               श्रीयुत सरवटे यांचे हे प्रवचन उत्कृष्ट गद्याचा मसाला म्हणता येईल. पण त्यातील विचार फोल आहेत. त्या विचारांचा आधार डळमळीत आहे. मराठ्यांच्या उत्कर्षाचे सर्व श्रेय हनुमद्भक्तीला देणे म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे. ""

संदर्भ  --- रामायणावर नवा प्रकाश - "रामभक्त हनुमंत व धर्मात्मा बिभीषण" ह्या प्रकरणात वरील उल्लेख आलेला आहे.... लेखक -- श्री भास्करराव जाधव


माझे मत ---
वरील लिखाणाची पार्श्वभूमी --- भास्करराव जाधव यांनी जेव्हा त्यांच्या लेखनातून रामायणावर.. काही प्रश्न उपस्थित केल्यावर.. श्री सरवटे यांनी त्यांना भाषणातून दिलेले उत्तर.. आणि परत मग भास्करराव जाधवांनी त्यावर केलेली टिप्पणी... अश्या प्रकारचे वरील लिखाण आहे... वरील लिखाण ज्ञान मंदिर १-५-३५ मध्ये आलेले आहे....  १९३५चे लिखाण आहे...
त्या काळातही रामदासांनाच स्वराज्याचे सर्व श्रेय देण्याचे प्रयत्न झालेत....(आजकाल हि ते चालूच आहेत...) ....विषय होता रामायणाचा.. सरवटेंनी तो -- राम -- मग हनुमान --- मग रामदास.--- मग स्वराज्य आणि शिवाजी महाराज असा वळवला.. त्याकाळीही असे प्रयत्न झालेले आहेत.. त्याला भास्करराव जाधवांनी चोख उत्तर दिलेले दिसून येते....
रामदासांचे शिष्य वर्ग रामदासांना कित्येक प्रकारे महान सिद्ध करण्याच्या नादात.. शिवाजी महाराजांचे कर्तुत्व.. कुठे तरी झाकोळायचा प्रयत्न करतात..... त्याचेच हे एक उदाहरण म्हणून दिलंय..... तसेच भास्कररावांनी मांडलेला भगव्या रंगा बाबतची आणि रामदासांच्या कफनी व छाटी यांच्या रंगा बाबत जो सवाल उपस्थित केला आहे तो योग्य वाटतो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.