शुक्रवार, १८ मे, २०१२

हिंदू -मुसलमान भांडणे म्हणजे ....SC, ST, व OBC विरुद्ध धर्मांतरीत SC, ST, व OBC होय


या देशात  आमचे शत्रू मुस्लीम आहेत असा सतत प्रचारप्रसार ब्राह्मण  करत आहेत. आणि तरुण या गोष्टीला बळी पडतात. आपण तपासून पहिले पाहिजे कि काय खरच मुस्लीम आमचे शत्रू आहेत का? 
१) काय या देशाची न्याय पालिका, कार्यपालिका, प्रचार प्रसार माध्यमे  मुसलमानांच्या ताब्यात आहेत? 
२) काय या देशात इस्लाम येण्या अगोदर समस्याच नव्हत्या काय?
३) इस्लाम या देशात येण्या अगोदर  वर्ण व्यवस्था, जाती  व्यस्था, सती प्रथा, आदिवास्यांच्या समस्या,  अस्पृश्यता हे कोणी निर्माण केले? का याला देखील मुसलमान जबाबदार?
४) सम्राट बळी राजा, सम्राट  बृहद्रथ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकोबाराय, संत नामदेव, संत चोखोबाराय यांचा खून काय मुसलमानांनी केला?
५) छ.शिवराय यांच्या  राज्याभिषेकाला काय मुसलमानांनी विरोध केला, शिवरायांवर पहिला वार काय मुसलमानांनी केला?
६) संत तुकोबाराय यांचा गाथा पाण्यात बुडवणे, जनाबाईला सुळावर देणे असली कामे काय मुसलमानांनी केली? 
७) राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्यावर मारेकरी काय मुसलमानांनी पाठवले?
८) काय सावित्रीमाई फुलेवर शेन, गोटे मुसलमानांनी फेकले? 
९) शाहूजी महाराज यांचा बदनामीकारक प्रचार, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले, काय मुसलमानांनी केले?
मग मुस्लीम आमचे शत्रू कसे? बरे बाह्मण "हिंदू - इस्लाम अशी भांडणे आहेत" असे का म्हणत नाहीतते हिंदू- मुसलमान असे का म्हणतात?... कारण जगातील इतर इस्लामचे हे राष्ट्र भटांचा शंकराचार्य  उडवतील म्हणून ब्राह्मण मुसलमान म्हणतात इस्लाम नाही .
जगातील इस्लाम मध्ये जाती नाहीत. पण भारतीय इस्लाम मध्ये जाती आहेत का?
कारण आमचे जात भाई जेव्हा ह्या भटांना कंटाळले तेव्हा त्यांनी इस्लाम कबुल केला. कारण तिकडे समता होती.
मग इस्लाम मध्ये जाताना आमचे 
पाटील -पटेल झाले,
माळी-बागवान झाले,
शिंपी -बुनकर झाले,
खाटिक चे -कसाब झाले, तांबोळी, देशमुख, चोधरी दोन्हीकडे हि आहेत .
मग मुसलमान आमचे बांधव  नाहीतर कोण?
मग हिंदू -मुसलमान भांडणे म्हणजे ....SC, ST, व OBC विरुद्ध धर्मांतरीत SC, ST, व OBC होय.


Parbhani, Maharashtra, India
जिल्हा प्रवक्ता संभाजी ब्रिगेड ,परभणी  यांच्या ब्लॉगवरून 'शिवनीति' या ब्लॉगवरून साभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.