गुरुवार, ३ मे, २०१२

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे नाव आपण एकले असेल पण यांच्या बद्दल कुणी जास्त माहिती घेताना दिसत नाही .......महर्षी शिंदे यांनी जे कार्य केले आहे ते महान कार्य आहे पण त्यांना जाती मुळे दुर्लक्षित ठेवले आहे ....

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये अस्पृश्यतेसारखा माणुसकीला कलंकित असणारा प्रश्न अस्तित्वात आहे याची कुणाला जाणीवसुद्धा नव्हती, अशा काळात सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी व अस्पृश्यावर्गाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी १९०६ साली 'dispred classes mission' हि अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी संस्था स्थापन करण्याचा दृष्टेपणा आणि कर्तेपणा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दाखवला..
महर्षी शिंदे यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक शाखा स्थापन करून अस्पृश्यता निवारणाचे संपूर्ण देशभरात कार्य केले ....
त्यांच्या प्रयत्नामुळे १९१७ मध्ये कोंग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर करावा लागला होता ....
विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्यतानिवारण कार्याच्या जागृती पर्वाचे प्रणेते व या कार्याचे अग्रदूत होते ...
महर्षी शिंदे हे संशोधन करणारे संशोधक ,समाज जागृती करणारे विचारवंत,वकील ,आणि समाजसुधारक होते ........

आज त्यांच्या कार्याला लोक विसरले आहेत....
महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी महान कार्य केले पण आज त्यांना SC आणि ST समाज पूर्ण विसरून गेला आहे ......
मी सध्या महर्षी शिंदे यांचा अभ्यास करत आहे त्यांचे महाराष्ट्र सरकार ने प्रसिद्ध केलेले सर्व ग्रंथ घेऊन सध्या वाचन चालू आहे ....
मराठा समाजातील पुरोगामी चळवळी मधील लोकांना आपला हि महर्षी शिंदे होईल असी भीती असते मला मराठा महासंघा चे एक पदाधिकारी म्हणाले भैया पाटील तुम्हा लोकांचा महर्षी शिंदे होईल रे तेव्हा जमिनीला सोडून सामाजिक कामात उतरू नको ....महर्षी शिंदे यांनी मराठा जात सोडून महारवाड्यात राहून अस्पृश्यता निवारणाचे काम केले पण त्यांना त्याकाळी मराठ्यांनी आपले मानले नाही आणि SC & ST या वर्गाने पण आपले मानले नाही .....ज्यांनी आयुष्यभर बहिष्कृतांच्या साठी काम केले पण आज हि महर्षी शिंदे यांना दोन्ही बाजूने बहिष्कृत केले आहे ......
मित्रानो महर्षी शिंदे वरील बहिष्कार मागे घेऊया त्यांचे कार्य जनमानसात घेऊन जाऊया ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.