मंगळवार, १ मे, २०१२

वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र


"क्रांती जगाचा नियम आहे. ती मानवाच्या प्रगतीचे रहस्य आहे. त्यामध्ये रक्तरंजित संघर्ष असतोच असे नाही. त्यात व्यक्तिगत प्रतीहीन्सेलाही काहीच स्थान नाही. तो बॉम्ब आणि पिस्तुलाचा संप्रदाय नाही. क्रांतीचा आमचा अर्थ अन्यायाच्या पायावर आधारलेली आजची राज्यव्यवस्था बदलणे हा आहे."  
शहीदे आलम वीर भगतसिंग यांनी वयाच्या २०-२१ व्या वर्षी क्रांतीची केलेली ही परिपक्व व्याख्या आहे. मराठा सेवा संघ प्रणीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची वाटचाल भगतसिंगांच्या याच क्रांतीमार्गावरून सुरु आहे. भिकाऱ्याला भीक देणे ही सेवा आहे. परंतु त्याच्यावर भीक मागण्याची वेळच येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणे म्हणजे परिवर्तन आहे आणि हेच परिवर्तन राज्याव्यापी राष्ट्रव्यापी करणे म्हणजे क्रांती आहे. या क्रांतीच्या प्रस्थापनेसाठीच मराठा सेवा संघाचा १९९० पासून विविध ३१ कक्षांच्या माध्यमातून निकराचा संघर्ष सुरु आहे. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP ) हा त्या ३१ कक्षांपैकी एक प्रभावी कक्ष आहे. (http://vbvpindia.blogspot.in/)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.