बुधवार, ३० मे, २०१२

11) महात्मा फुलेंच्या दृष्टीतील रामदास आणि त्यांचे तत्व


सुख.....
यशवंत जोतीराव फुले :  प्रश्न - मानवप्राणी एकंदर सर्व जगात कशाने सुखी होईल?
जोतीराव गोविंदराव फुले : उत्तर-  सत्य वर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही. याविषयी प्रमाण देतो.
***************************************************
यशवंत प्र.  - यावरून देशस्थ आर्य रामदास भट्टजीबुवाचा  श्लोक असा आहे की , " जगी सर्व सुखी असा कोण आहेविचारी मना तूच शोधूनी पाहे," याविषयी तुमचे काय म्हणणे आहे??
ज्योतीराव . उ . - देशस्थ आर्य रामदास भट्टजीबुवांनी या श्लोकावरून निर्मिकाने निर्माण केलेल्या पवित्र जगाविषयी व संसाराविषयी अज्ञानी शुद्रादी अतिशुद्रांचे मनात वीट भारावून तो सर्व व्यर्थ आहेम्हणून त्यांनी निरीच्छ   व निरभ्रम होवूनपरित्याग केल्याबरोबर धूर्त आर्य भटांनी त्यावर झोड उडवावी यास्तव हा श्लोक बुद्धया केला असावा. कारण आर्य रामदासास सत्य कशाला म्हणावेहे केवळ आपल्या जातीमतलबासाठीचकळले न्हवतेअसे मला वाटते. याविषयी मी तुम्हास एक प्रश्न करितो. त्याचे उत्तर देतांना आर्य रामदासाचा श्लोक कितपत खरा आहेयाविषयी तुम्हास सहज निर्णय करिता येईल..
यशवंत प्र.  - असा तुमचा प्रश्न काय आहेतो आम्हास सांगाल तर बरे  होईल.
ज्योतीराव. उ . - असे कोणते शुल्लक सार्वजनिक सत्य आहे कित्याचे आचरण केल्याने मानवप्राणी दु:खी होतो.??
यशवंत प्र. - सत्यास स्मरून एकंदर सर्व सार्वजनिक सत्यमग ते शुल्लक का असेनापण त्याचे आचरण केल्याने कोणताही मानव प्राणी दुखी होणार नाहीअसे शोधांती समजून आलेतथापि आर्य रामदासाने कोणच्या आधाराच्या जोरावर हा श्लोक कल्पिला असावा
जोतीराव . उ . - याला जोर मूढ शुद्रादी अतिशुद्रांचे अज्ञानव त्यांचा मतलबीपणा व धूर्तपणा होय. याविषयी धूर्त आर्य रामदासाने आपले ग्रंथात जे काही लिहिले आहेत्यावरनिपक्षपाताने विचार करावायास्तव ते पुढे देतो.
***********************************************
यशवंत. प्र.  - रामदास हा अस्सल आर्य ब्राह्मण कुळातील असतात्याने आपल्यास रामशर्मा पद न जोडिता अतिशूद्र सुरदासाचे पद आपलेनावास का जोडून घेतलेयातील इंगित काय असावेहे तुम्ही सांगू शकाल काय?
जोतीराव. उ. - शिवाजी हा शुद्र जातीमध्ये मोठा योद्ध असून अक्षरशुन्य  असल्यामुळे व  रामदास अट्टल धूर्त आर्य जातीतील साधू बनल्यामुळेत्याने आपल्या नावास शर्मा असे पद जोडून न घेताअतिशूद्र सुरदासासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊ लागला. यातील मुख्य इंगित अज्ञानी शुद्र शिवाजीस खुश करणे होय. तात्पर्यनिर्मिकाच्या नावांवर धर्मासंबंधी दरवडे घातल्याने मात्र सुख होतेव बंडखोरापासून अज्ञानी व पंगु मानवास सोडविल्यापासून अथवा निराश्रित अंधपंगु व पोरक्या मुलीमुलास व इतर सर्व प्रकारच्या संकटात पडलेल्या मानव बांधवास साह्य देण्यापासूनमात्र सुख होत नाहीम्हणून म्हणणे केवळ एखाद्या नास्तीकाने जग निर्माणकर्त्यांचे  अस्तित्व नष्ट करण्याप्रमाणे होय.
                               (ह्या मध्ये जोतीरावांनी शिवाजी महाराजांना अक्षर शून्य अथवा अज्ञानी असे म्हटलेले आहे..ते रामदासांच्या दृष्टीकोनातून शिवाजी महाराज अक्षर शून्य अथवा अज्ञानी असे असावेत..म्हणूनच जसे..काही शिकले सवरलेले लोक..जे स्वतःला जास्त शिकलेले समजतात..ते गावाकडे गेल्यावर...गावच्या लोकांशी जवळीक साधण्यासाठी थोडे गावंढळ  भाषेत बोलतात..अर्थात ह्यात त्या शहरातील लोकांना गावातील लोक अज्ञानी आणि अक्षर शून्य वाटत असतात....त्या प्रमाणेच महात्मा जोतीरावांना इथे रामदासांचा दृष्टीकोनअभिप्रेत असावे...---माझे मत )
(********* - याचा अर्थ तिथे महात्मा जोतीराव फुल्यांनी श्लोक/ ओव्या  दिलेले आहेत...जागे अभावी आणि वेळे अभावी ते टाकलेले नाहीत....)
       (वरील जोतीरावांनी मांडलेल्या विचारावरून असे वाटते..की रामदासांनी शिवाजी महाराजांना खुश करण्यासाठी काही कृत्य केलेल्या आढळतात...तसेच..जोतीरावांना रामदासांनी मांडलेली सुखाची संकल्पना पटलेली दिसत नाही..उलट रामदासांनी केलेली सुखाची व्याख्या हि शुद्रादी अतिशुद्रांना फसवण्याच्या दृष्टीने ती तशी  लिहिलेली  आहे ..आणि तसे ते लिहिण्यामागील..अजून एक भक्कम कारण म्हणजे शुद्रादी अतिशूद्र लोकांचे अज्ञानव रामदासांचा मतलबीपणा व धूर्तपणा होय....अश्या प्रकारचे मत जोतीरावांचे रामदास आणि त्यांच्या तत्वज्ञाना बद्दल होते...----  माझे मत..)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.