गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

परशुरामाची ब्राह्मणी भाकडकथा

(भाग-१)

क्षत्रिय परशुरामाला पुरून उरले !


फेसबुकवरील माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
मी तुम्हाला काही लेख देण्याचे वचन मी याच आठवड्याच्या सुरूवातीला दिले होते. या लेख मालेतील पहिला लेख आज देत आहे. पुढील लेखही आपणास लवकरच वाचायला मिळतील.
...........................................
ब्राह्मणी धर्मात १० अवतार मानले जातात. अलिकडे मात्र ब्राह्मणांनी ९ अवतारांना घटस्फोट देऊन केवळ सहावा अवतार मानल्या जाणाèया परशुरामालाच आपला देव मानले आहे. ‘जय परशुराम' हा ब्राह्मणांचा परवलीचा शब्द झाला आहे. परशुराम क्षत्रियांचा द्वेष्टा होता. तसेच ब्राह्मण सोडून इतर जातींबद्दल त्याच्या मनात द्वेष भरलेला होता, म्हणून ब्राह्मणांना परशुरामाच्या प्रेमाचे भरते आले आहे. महाभारत, हरीवंश, भागवत पुराण आणि रामायण आदी अनेक पौराणिक ग्रंथांत परशुरामाची कथा आली आहे. ही कथा इतक्या विसंगतींनी आणि थोतांडांनी भरलेली आहे की, कोणाही सूज्ञ माणसाला हसू येईल. या कथेतील हा पाहा काही बोगसपणा :
१. परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली, असे पुराणे सांगतात. नि:क्षत्रिय करणे म्हणजे क्षत्रियांचा पूर्ण निर्वंश करणे. सर्व क्षत्रियांना ठार मारणे. आता कोणत्याही व्यक्तीला qकवा व्यक्ती समूहाला एकदाच ठार मारता येईल. २१ वेळा कसे काय मारता येईल?
२. पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केल्यानंतरही पृथ्वीवर क्षत्रिय शिल्लक होतेच. परशुमानंतरचे दोन अवतार राम आणि श्रीकृष्ण हेही क्षत्रियच होते. महाभारतातील युद्धात १८ आक्षौहिणी क्षत्रिय लढले. परशुरामाने क्षत्रिय शिल्लकच ठेवले नव्हते, तर हे सासरे क्षत्रिय आले कोठून?
२. अलीकडच्या काळात राजपूतांत क्षत्रियांचा इतिहास सापडतो. आजही स्वत:ला क्षत्रिय म्हणविणारे अनेक जातीसमूह भारतात आहेत.
३. याचा साधा अर्थ असा की, परशुरामाच्या पराक्रमाच्या कथा खोट्या आहेत. २१ वेळाचे राहू द्या, परशुरामाला एका वेळीही पृथ्वी नि:क्षत्रिय करता आली नाही. अतएव, ही कथा म्हणजे थोतांड ठरते. त्याचे पराक्रमही बोगस ठरतात.
३. परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार समजला जातो. त्या नतंरच्या राम आणि कृष्ण या दोन्ही अवतारांत तो पुन्हा उगवतो. तीन-तीन अवतारांत प्रकटणारा हा परशुराम जगला तरी किती वर्षे? फारच कमी धरले, तरी त्याचे आयुष्य हजार-दोन हजार वर्षे भरेल. एवढे आयुष्य डायनासोरांनाच लाभू शकते. ‘जीवेत शरद: शतम' या श्लोकार्धात मानवाचे आयुष्य १०० वर्षे सांगितले आहे.
४. परशुरामाच्या बोगस पराक्रमाच्या कथांचा पर्दाफाश रामायणातही होतो. सीता स्वयंवरात राम त्याचे शिवधनुष्य मोडतो. म्हणून संतप्त परशुराम आपली कुरहाड घेऊन रामावर हल्ला करतो. क्षत्रिय राम त्याचा पराभव करतो. अपमानित झालेला परशुराम मग महेंद्र पर्वतावर जाऊन तपश्चर्या करीत बसतो.
३. श्रीकृष्ण अवतारात परशुराम पुन्हा अवतरतो. ब्राह्मण वेशातील कर्णाला तो ब्रह्मास्त्र वगैरे देतो. पण कर्ण ब्राह्मण नाही, हे समजल्यावर त्याला शाप देतो. यातून परशुराम द्वेषाचा मूर्तीमंत पुतळा होता हेच सिद्ध होते. 

4,. असे व्यक्तिमत्व कोणत्याही सुसंस्कृत समाजाने आपले प्र्रतिक म्हणून स्वीकारावे का?
......................................................................................................................
विशेष सूचना
महात्मा फुले यांनी परशुरामावर अत्यंत घणाघाती टीका केलेली आहे. परशुराम हा इराणी होता. असे संशोधन फुल्यांनी केले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे. समग्र फुले वाङ्मयात हे लिखाण आहे.

भाग-२ :

अर्धा क्षत्रिय, अर्धा ब्राह्मण परशुराम

आज मी तुम्हाला परशुरामाने स्वत:च्या मातेची हत्या कशी केली,  तसेच तो कसा अर्धा क्षत्रिय आहे. याची कहाणी सांगणार आहे.
...................................................................

परशुरामपूर्ण ब्राह्मण नाही. तो अर्धाच ब्राह्मण आहे. त्याची आई रेणुका ही क्षत्रिय होती. रेणुक राजाची ती कन्या. रेणुक राजाने एक यज्ञ केला. त्याचे फळ म्हणून त्याला कन्या रत्नाची प्राप्ती झाली. तीच रेणुका. पित्याच्या नावावरून तिला रेणुका हे नाव मिळाले. आपल्या माहूरची रेणुका ती हीच. 

अगस्त्य ब्राह्मणाने फसविले
ब्राह्मण हे क्षत्रियांना प्राचीन काळापासून फसवित आले आहेत. रेणुकाचीही अशीच फसवणूक झाली. राजा रेणुकाचा गुरु अगस्त्य याने राजा आणि कन्या दोघांनाही फूस लावली. रेणुकाचा विवाह ब्राह्मण जमदग्नीशी लावण्यास त्याने भाग पाडले. जमदग्नी हा भृगू ॠषीचा 39  वा वंशज होता. भृगूची पत्नी ख्याती ही सुद्धा क्षत्रियच होती. ती दक्ष प्रजापतीची मुलगी होती. महादेवाची पहिली पत्नी सती हिचा पिता म्हणून प्रसिद्ध असलेला दक्ष तो हाच. म्हणजेच सती आणि ख्याती या सख्या बहिणी होत. अशा प्रकारे परशुराम हा आईकडून क्षत्रिय होता. भारतातील सर्वच वर्ण आणि जातींमध्ये अशी सरमिसळ आढळून येते. त्यामुळे आजच्या घडीला कोणतीही जात शुद्ध वंशाचा दावा करू शकत नाही. ब्राह्मणही त्यात आले. भालचंद्र नेमाडे यांच्या कोसलामध्ये हा विषय छान आला आहे. एक भाऊ फॉरेनर  शोभावा असा गोरा असतो, तर दुसरा निग्रोंसारखा काळाकुट्ट निघतो. वांशिक मिश्रणामुळे हे घडून आले.

आईचा हत्यारा परशुराम
रेणुका ही सत्य पतिव्रता होती. एकदा नदीवर पाणी आणायला जात असताना आकाशमार्गे जाणाèया एका देखण्या गंधर्वाकडे ती पाहते. केवळ या पाहण्याने जमदग्नी संतप्त होतो. रेणुकाचे मुंडके उडविण्याची आज्ञा तो आपल्या मुलांना देतो. पण त्याची मोठी मुले त्याचे ऐकत नाहीत. सर्वांत धाकटा परशुराम आज्ञेचे पालन करून कुèहाडीचा घाव घालून आपल्या आईच शीर धडा वेगळे करतो. असा हा मातृघातकी परशुराम ब्राह्मणांनी आपले प्रतिक म्हणून स्वीकारावे का?

जमदग्नीला शिक्षा
रेणुका क्षत्रिय असते. तिच्या हत्येमुळे क्षत्रिय खवळतात. त्या काळातील सर्वांत बलशाली राजा कार्तवीर्य उर्फ सहस्त्रार्जुन हा जमदग्नीचे शीर उडवून त्याला ठार मारतो. हैहय कुलोत्पन्न कार्तवीर्य नर्मदेच्या तीरावरील महिष्मतीचा (आताचे माहेश्वर) राजा असतो. पित्याची हत्या केली म्हणून परशुराम २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा करतो. परंतु ती पूर्ण करण्यात अपयशी ठरतो. 

अशा प्रकारे अर्धाच ब्राह्मण असलेला, मातृघातकी, केलेली प्रतिज्ञाही पूर्ण न करू शकलेला अपयशी असा हां परशुराम.  

असा हा परशुराम कोणत्याही समाजाने आपले प्रतिक म्हणून वापरणे योग्य आहे का? आपण मुलांना काय संस्कार देणार आहोत? बापाने आज्ञा केली तर खुशाल आईचे मुंडके उडवा, हा आदर्श देणार आहोत का? बाईला कवडीची किम्मत  न देणारया या संस्कृतीचा उदो उदो करायचा की ही संस्कृती त्याज्य ठरवायची याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. 

वरील सर्व कथा महाभारत, हरीवंश, रामायण आणि अन्य इतर पुराणांतील आहेत. जिज्ञासूंनी ही पुराणे अवश्य वाचावीत. 

भाग -३


 रेणुका, यल्लमा आणि मातंगी


पुराणांमध्ये जशी रेणुकाची कथा आली आहे. तशीच ती लोककथांतही आहे. सीतेनंतर सर्वाधिक लोकप्रिय पौराणिक स्त्री म्हणून रेणुकाकडे पाहावे लागेल. दक्षिण भारतात रेणुका ही यल्लमा म्हणून ओळखली जाते. एका कथेनुसार, परशुरामाने माता रेणुकाला ठार मारण्यासाठी कुèहाड काढताच रेणुका पळू लागली. पळपळत ती कनिष्ठ मातंग वस्तीत शिरली. तिला वाचविण्यासाठी एक मातंग स्त्री पुढे आली. निर्दयी परशुरामाने दोघींची डोकी उडविली. काम फत्ते केल्याबद्दल जमदग्नी परशुरामावर खुश झाला. त्याने त्याला वर मागायला सांगितले. तेव्हा परशुरामाने आईला जिवंत करण्याची मागणी केली. ती जमदग्नीने मान्य केली. मात्र घटनास्थळी दोन महिला मृत्युमुखी पडलेल्या होत्या. त्यातली रेणुका कोणती हे दोघांनाही ओळखता येईना. मग त्यांनी दोघींनाही जिवंत करायचे ठरविले. हे करीत असताना रेणुकाचे डोके मातंग स्त्री देहावर तर, मातंग स्त्रीचे डोके रेणुकाच्या देहावर लागले. दोघी जिवंत झाल्या. पण मोठ घोळ झाला.  म्हणून ब्राह्मण स्त्रिया डोक्यावरून पदर घेत नाहीत. असे मानले जाते. ही लोककथा प्रसिद्ध आहे. 

पूर्वीपर्यंत ब्राह्मण स्त्रिया वगळता भारतातील सर्व जातींच्या स्त्रिया डोक्यावरून पदर घेत असत. पदर घेण्याची पद्धती मात्र वेगवेगळी होती. गुजरातेत तसेच उत्तर भारतातील काही जातींत उलटा पदर घेण्याची पद्धती आहे. चित्रपटांतही या परंपरेचे प्रतिबींब पाहायला मिळते. सोनाक्षी सिन्हाची एक छबी त्या साठीच वर दिली आहे.  आता डोक्यावर पदर न घेण्याची फॅशनच आली आहे. त्यामुळे सगळ्याच जातीतील शिकलेल्या स्त्रिया डोक्यावर पदर घेत नाहीत. खेड्यांत अजूनही डोक्यावर पदर घेण्याची प्रथा कायम आहे. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या डोक्यावरचा पदर कधीही ढळत नाही. 

या विषयी अधिक माहिती हवी असल्यास जिज्ञासूंनी विकिपिडियाच्या खालील लींकवर भेट द्यावी : http://en.wikipedia.org/wiki/Renuka


निर्णय घेण्याचा अधिकार स्त्रियांचा!

ता. क. :  डोक्यावर पदर न घेतल्याने स्त्रिया पुढारलेल्या वाटतात असे नाही. तसेच डोक्यावर पदर घेतला म्हणूनच शालिनता येते असेही नव्हे. माझा व्यक्तीश: दोन्ही गोष्टींना विरोध qकवा समर्थन नाही. पदर घ्यायचा की नाही, हे ठरविण्याचा व्यक्तिगत अधिकार प्रत्येक स्त्रीला असला पाहिजे. असे माझे मत आहे.

भाग- ४

फुल्यांनी केलेली परशुरामाची हजामत


क्षत्रियांना पराभूत न करू शकलेला परंतु तरीही २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याचा दावा करणारा. ब्राह्मण सोडून इतर कोणालाही विद्या न देण्याचे पाप करणारा आणि स्वत:च्या आईचे मुंडके उडवून क्रूरतेचा शिरोमणी ठरलेला परशुराम चिरंजीव आहे, असा दावा सनातनी ब्राह्मण करीत असतात. अशा कथा महाभारत, हरीवंशम आणि श्रीमद्भागवत पुराणात आहेत. परशुरासम जर चिरंजीव असेल, तर तो कोणाला तरी कुठे तरी नजरेस पडायला हवा. तसा तो आजपर्यंत कोणाच्याही नजरेस पडलेला नाही. मग हा चिरंजीव म्हणजे कधीही न मरणारा परशुराम कुठे आहे? हा प्रश्न माझा एकट्याचा नाही. महात्मा फुले यांनाही हाच प्रश्न पडला होता.
परशुरामाचा पर्दाफाश करणारे लिखाण फुल्यांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यावेळी पुण्यातल्या ब्राह्मणांनी त्यांच्या विरुद्ध आकांडतांडव केले. परंतु त्याला अजिबात भिक न घालता फुल्यांनी परशुरामाला उद्देशून एक जाहीर प्रकटनच त्यावेळच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध केले होते. १ ऑगस्ट १८७२ रोजी हे प्रकटन प्रसिद्ध झाले.
आज आपण हरवलेल्या व्यक्तींविषयी ज्या प्रकारचे जाहीर प्रकटन वृत्तपत्रात वाचतो, तसेच हे प्रकटन फुल्यांनी दिले होते. त्याचा हा मजकूर (समग्रस फुले वाङ्मयातील या पत्राच्या पानाचा फोटो सोबत जोडला आहे.) फुले म्हणतात :
..................................................................
चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यास--
  मुक्काम सर्वत्र ठायी,
अरे दादा परशुरामा, तूं ब्राह्मणांच्या ग्रंथांवरून चिरंजीव आहेस. तूं कडू कां होईना, परंतु विधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस. तुला पहिल्यासारखे कोळ्यांच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण हल्ली येथे तू जे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण (आहेत) त्यांपैकी कित्येक ब्राह्मण ‘विविधज्ञानी' बनून बसले आहेत. त्यांना कांही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरूरी पडणार नाही. फक्त तूं येथे ये आणि त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यांस चांद्रायण प्रायश्चित्त देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्रजादूच्या सामथ्र्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वगैरे लोकांस करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको. पण एकंदर सर्व जगांतील लोक तू सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील. व तू तसे न केल्यास येथील महारमांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविधज्ञानी म्हणविणाèया ब्राह्मण बच्चांस ओढून आणून त्यांची फटफजीती करण्यास कधी कमी करणार नाहीत. आणि तेणेंकरून त्यांच्या तुणतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळींत दगड पडल्याने त्यांस विश्वामित्रासारिखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको.
आपला खरेपणा पहाणारा,
जोतीराव गोqवदराव फुले,
तारीख १ ली, माहे आगस्ट
सन १८७२ इसवी, पुणे,
जुना गंज, घर नं. ५२७
 

भाग - ५

तुझ्या पोटी महाभयंकर पूत्र जन्मेल


भावांनो आणि बहिणींनो,
मी परशुरामावर लिहिलेल्या लेखांमुळे सनातनी ब्राह्मण खवळले आहेत. तुम्ही खोटे लिहिता, असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. अलिकडे ब्राह्मण सत्यनारायाणापलिकडे कोणताही ग्रंथ वाचित नाहीत, त्यातून असे आरोप होतात. त्यामुळे आज मी ब्राह्मणी धर्मग्रंथांतील पुराव्यांसह तुमच्यासमोर येत आहे.
......................................................

परशुराम हा कसा अर्धा क्षत्रिय आहे, हे मी या पूर्वीच्या एका लेखात लिहिले होते. त्याविषयी थोडीसी अधिक आपण घेऊ या. परशुरामाच्या वंशाचा क्षत्रियांच्या चंद्रवंशाशी संबंध आहे. त्याची कहाणी श्रीमद्भागवतात आली आहे. भागवताच्या नवव्या स्कंदात चंद्रवंशाची आणि परशुरामाची कथा येते. मी येथे भागवताची परमहंस संहिता पुराव्यासाठी घेतली आहे. ब्राह्मणी ग्रंथांचे या देशातील सर्वांत मोठे प्रकाशक 'गीता प्रेस गोरखपूर'नेही हीच संहिता वापरली आहे. यावरून तिच्या खरेपणाबद्दल ब्राह्मणांनी शंका घेऊ नये.
बृहस्पतीची बायको पळविली जाते तेव्हा
बृहस्पती हा ब्राह्मण पुराणांत अतिशय प्रसिद्ध आहे. तो देवांचा गुरू समजला जातो. त्याची पत्नी तारा. ती अत्यंत रूपवान होती. या तारेला एकदा चंद्राने पळवून नेले. इतकेच नव्हे, तर तिला गर्भवतीही केले. यावरून देवदानवांत युद्ध झाले. पण चंद्राकडून तारा परत मिळविणे कोणालाही शक्य झाले नाही. त्यामुळे बृहस्पती ब्रह्मदेवाकडे रडत गेला. ब्रह्मदेवाने मांडवळी करून चंद्राचे मन वळवले. शेवटी चंद्राने तारा परत केली. तारेला घरी आणल्यानंतर बृहस्पतीला कळले की, तिच्या पोटात चंद्राचा गर्भ आहे. त्याने तिला गर्भपात करायला सांगितले. मात्र, तारेने स्पष्ट नकार दिला. बिचारा बृहस्पती चरफडत राहिला. तारेला मुलगा झाला. त्याचे नाव बुध. बुधाचा विवाह इलेशी झाला. इलेला बुधापासून मुलगा झाला. त्याचे नाव पुरूरवा. इंद्राच्या दरबारातील अप्सरा उर्वशी पुरूरवाच्या प्रेमात पडली. ही आपल्याकडील पहिली प्रेमकथा समजली जाते.
परशुरामाची आजी आणि आई दोघी क्षत्रियच
पुरुरवा-उर्वशीपासून पृथ्वीवरील चंद्रवंशी क्षत्रियांच्या वंशाची खरया अर्थाने सुरूवात झाली. त्यांच्याच वंशात पुढे महापराक्रमी राजा गाधीचा जन्म झाला. गाधीची एक कन्या सत्यवती. सत्यवतीचा विवाह ऋचिक नावाच्या ब्राह्मणाशी झाला. ऋचिकाचा पूत्र जमदग्नी. जमदग्नीची बायको रेणुका हीसुद्धा क्षत्रियाची कन्या होती. रेणुकेची कथा याच ब्लॉगवर आधी दिलेली आहे. जमदग्नी आणि रेणुकेचा सर्वांत धाकला मुलगा म्हणजे परशुराम. अशा प्रकारे परशुराम हा मिश्रवंशीय होता. ब्राह्मण महासंघ आणि इतर ब्राह्मण संघटना त्याला पूर्ण ब्राह्मण म्हणून प्रोजेक्ट करतात, ते अशा प्रकारे खोटे आहे.
घोरो दण्डधर: पुत्रो
परशुरामाच्या जन्माची कथा मोठीच चमत्कारिक आहे. ऋचिक ऋषिने पत्नी सत्यवती आणि तिच्या आईसाठी दोन चरू शिजविले. हे चरू दोघींना दिले. मात्र या दोघींनी चरूंची अदलाबदल केली. हे जेव्हा ऋचिकाला कळले. त्याने पत्नी सत्यवतीला शाप दिला. त्यासंबंधीचा परमहंस संहितेतील मूळ संस्कृत श्लोक असा :
तद विज्ञाय मुनि: प्राह पत्नीं कष्टमयकारषी: ।
घोरो दण्डधर: पुत्रो भ्राता ते ब्रह्मवेत्तम: ।।१६।।
श्रीमद्भागवत. स्कंध : ९.  अध्याय : १५.
‘घोरो दण्डधर: पुत्रोङ्क याचा अर्थ- ‘तुला घोर म्हणजेच महाभयंकर आणि लोकांना दंड देणारा म्हणजेच त्रास देणारा पूत्र होईल.'  भ्राता ते ब्रह्मवेत्तम: याचा अर्थ - तुझा भाऊ मात्र ब्रह्मज्ञानी होईल.
ऋचिकाची शापवाणी ऐकून सत्यवती घाबरली. तिने क्षमायाचना केली. त्यावर ऋचिकाने उ:शाप दिला की, तुझ्या मुलाऐवजी नातू ‘घोर दण्डधर'  निपजेल. सत्यवतीला जमदग्नी झाला. व जमदग्नीला परशुराम. ऋचिकाच्या शापानुसार तो खरोखर घोर म्हणजेच महाभयंकर व लोकांना त्रास देणारा निघाला.
 

भाग - 6

परशुरामाला पित्यानेच म्हटले महापापी


परशुरामाचा पिता जमदग्नीसुद्धा परम संतापी होता. अतिशय रागीट माणसाला जमदग्नीचा अवतार म्हणण्याची पद्धत मराठीत आजही रुढ आहे. जमदग्नीकडे कामधेनू गाय होती. त्याकाळातील भारतातला सर्वश्रेष्ठ क्षत्रिय राजा सहस्त्रार्जुन याने ही गाय जमदग्नीच्या आश्रमातून बळाचा वापर करून नेली. ही गोष्ट परशुरामाला समजताच तो संतापला. त्याने सहस्त्रार्जुनाचा खून केला. गायीच्या हरणासाठी थेट मृत्युदंडाची शिक्षा हे अतीच झाले. परशुरामाचे हे घोर कृत्य जेव्हा त्याचा बाप जमदग्नीला कळाले, तेव्हा तो दु:खी झाला. संतप्तही झाला. त्याने परशुरामाची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच शास्त्राचे बोधामृतही त्याला पाजले. जमदग्नीच्या मुखातून बाहेर पडलेले परमहंस संहितेतेतील हे पाहा काही श्लोक :
राम राम महाबाहो भवान पापमकारषीत ।
अवधीन्नरदेवं यत सर्वदेवमयं वृथा ।।३८।।
अर्थ : हाय हाय परशुरामा, तू महाभयंकर पाप केले आहेस. राम! राम!! तू मोठा वीर असलास तरी नरदेवाच्या म्हणजेच राजाच्या शरीरात सर्व देव असतात. तू अशा सर्वदेवमय नरदेवाचा अकारण वध केला आहेस.
वयं हि ब्राह्मणास्तान क्षमयार्हणतां गता ।
यया लोकगुरुर्देव: पारमेष्ठ्यमंगात् पदम् ।।३९।।
अर्थ : आपण लोक ब्राह्मण आहोत. आपण क्षमाशील असले पाहिजे. क्षमेमुळेच आपण पुजनीय ठरतो. सर्वांचे पितामह ब्रह्मदेवही केवळ क्षमेमुळेच ब्रह्मपदावर पोहोचले आहेत.
जमदग्नीचा या पुढचा श्लोक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. ब्रह्महत्या हे सर्वांत मोठे पाप आहे, असे उत्तरकालीन ब्राह्मण ग्रंथांत म्हटले आहे, ते कसे खोटे आहे, हे या श्लोकातून स्पष्ट होते. हा श्लोक असा : 
राजो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरू: ।।
तीर्थसंसेवया चांहो जह्यङ्गच्युतचेतन: ।।४१।।
अर्थ : सार्वभौम राजाचा वध करणे हे ब्राह्मणाचा वध करण्यापेक्षाही मोठे पाप आहे. (या श्लोकातील पहिल्या ओळीच्या शेवटी आलेल्या गुरू या शब्दाचा अर्थ मोठा, अधिक जास्त असा आहे.) हे महापाप धुवून काढण्यासाठी आता भगवंताचे स्मरण करीत तीर्थयात्रा कर. 
राजाचा अकारण वध करून परशुरामाने ब्रह्महत्येपेक्षाही महाभयंकर पाप केले होते, हे खुद्द त्याचा पिता जमदग्नीनेच म्हटले होते. त्यासाठी त्याला नामस्मरण करीत तीर्थयात्रा करण्याचे प्रायश्चित्तही सांगितले होते. हे आजच्या सनातनी ब्राह्मणांना मान्य नाही असे दिसते. त्यांच्याच पूर्वजांनी लिहिलेल्या पोथ्या गुंडाळून ठेवून ब्राह्मण घोर पापी परशुरामाला आपला पूर्वज ठरवू पाहत आहेत. 

(या लेखात वापरलेले सर्व संस्कृत श्लोक श्रीमद्भागवतातील ९ व्या स्कंधातील तसेच १५ व्या अध्यायातील आहेत.)


      - अनिता पाटील, औरंगाबाद.

२ टिप्पण्या:

  1. भागवत धर्मात १० अवतार मानले जातात. आणि भागवतधर्माचे संस्थापक श्रीकृष्ण

    मग ब्राह्मणांच्या नावाने का भूकता

    उत्तर द्याहटवा
  2. मुर्खानो जेव्हा विवाहाची प्रथा navhati tevhaa mule aayila zavayachi aani tilaa mule vhaayachi kutryanchaa aani manasancha laingik sambandhancha ekach prakar hotaa mag konata vaunsh shuddha ?

    daksha rajaa honyaa agodar kon hota ? brahmanach hota na ?

    रेणुकाचे डोके मातंग स्त्री देहावर तर, मातंग स्त्रीचे डोके रेणुकाच्या देहावर लागले. maatang aani brahmn srichi sadi /kapade nesanyaachi padhat bhinn aahe tasech shariryashti katadicha varn yatil farak parashuraam aani jamadagnila kalat nvhataa kaa ?


    tumachyt dam asel tar he prakashit karaa

    आपण लोक ब्राह्मण आहोत. आपण क्षमाशील असले पाहिजे

    renukelaa thar mar ase mhanatana jamadagnine kay doke gahan takale hote ?

    उत्तर द्याहटवा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.