बुधवार, १८ एप्रिल, २०१२

संतोष भाऊसाहेब काळे - जीवन परिचयश्री. संतोष भाऊसाहेब काळे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते अहमदनगर जिल्ह्यातील "देहेरे" या गावचे आहेत. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९७९ रोजी आजोळी बेलवंडी येथे झाला आहे. लहानपणी त्यांचा स्वभाव खूप शांत होता. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राहुरी येथील कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दहावी (१९९६) पर्यंत झाले. नंतर बारावीचे (१९९८) शिक्षण त्यांनी नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पूर्ण केले. पुढे शिक्षणातील रस कमी झाल्याने शिक्षण पूर्ण करू शकले नाही. सन २००१ पासून ते काहीतरी कामधंदा करु लागले. सन २००२ पर्यंत त्यांचे कुटुंब वडिलांच्या विद्यापीठातील नोकरीमुळे राहुरीला होते. अशातच संतोष यांना समाजसेवेची गोडी लागली. सन २००२ पासून त्यांचे कुटुंब गावी देहरे येथे आल्यानंतर ते गावातच पतसंस्थेमध्ये काम करू लागले. त्यांचा सन २००४ साली विवाह झाला. जबाबदारी वाढली, पण अपूरे शिक्षण व पगार कमी असल्याने गाव सोडून शहरात कामधंदा पाहावा असे त्यांना वाटू लागले. शेवटी जानेवारी २००७ ला गाव सोडून पुण्याला गेले. एक छोटे काम करून नोकरीच्या शोधात असताना फेब्रुवारी २००७ ला बांधकाम क्षेत्रातल्या खासगी कंपनीत काम मिळाले. त्याचवेळी त्यांना पहिला मुलगा झाला. पण जास्त पगाराच्या अपेक्षेने त्यांनी कधीच एके ठिकाणी काम केले नाही, सतत नोकऱ्या व कंपन्या बदलत राहिले. त्यामुळे कुटुंबाची नेहमीच फरफट होत राहिली. परंतु अशा अवस्थेत ही त्यांनी समाजसेवा सोडली नाही. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी ते सतत झटत राहिले.
          बहुजन चळवळीतील इतिहासाचार्य  प्रा. मा. म. देशमुख यांची "राष्ट्र जागृती लेखमाला" या पुस्तकांच्या वाचनाने विचारात फार मोठी क्रांती झालेली होती आणि बहुजन विचारांचे व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी काही तरी कार्य करावे, असे त्यांना वाटले. त्यामुळे एकीकडे कुटुंबाची अशी दयनीय अवस्था असताना ही ते आजही सक्रियपणे बहुजन विचारांच्या प्रसाराचे काम करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.