रविवार, २९ जानेवारी, २०१२

कलर्स वरील"वीर शिवाजी"हि मालिका बंद झालीच पाहिजे..!!

वीर शिवाजी या मालीकेकडून फक्त महाराष्ट्र लाच नाही तर संपूर्ण देशाला खूप
मोठी आशा होती . मात्र निर्मात्यांनी तिला वेगळेच रूप दिल्याने ती बंद करावीशी वाटते.

याचे कारण ...............
१) सुरुवात नावापासून ..... नावात नुसत शिवाजी आहे, महाराज किंवा छत्रपती हे
आदरार्थी शब्द नाहीत .
२) कलाकारांची निवड बरोबर नाही . पारस अरोरा मुख्य भूमिकेत शोभत नाही.
आणि तसेच

दाखविल्या गेलेल्या बर्याचश्या घटना धादांत खोट्या आहेत आणि त्यांचा इतिहासात
कुठेही उल्लेख नाही ............... ........
जसे--१) घोड्यावरून पडलेल्या माणसाला उचलून शर्यत
जिंकणे,लोखंडी गज चाकूने कापणे इ. हास्यास्पद आहेत .
२) तानाजी , येसाजी इ. बालसवंगड्यांचा उल्लेखही नाही .
३) पुणे चे जहागीरदार शिवाजी राजे भोसले यांच्याकडे ५-६ ची पण फौज नाही ...
४) जहागीरदार सामान्य चौकीदार ला हुकुम करण्या ऐवजी
धान्य चोरून नेतात आणि नंतर प्राण वाचवून पाळतात ..
५) राजेंनी चाबूक चे फटके मारून कधीच शिक्षा दिली नाही .
६) आदिलशहा खूप वयस्कर होता आणि तो खूपच तरुण दाखवला आहे .
७) राजेंची शहाजी राजेंशी पहिली भेट आणि भाऊ शंभू राजेंशी
एकमेव भेट वयाच्या ११ व्या वर्षी झाली १६ व्या नाही ...
तसेच दुसरी भेट अफजलखान आणि पावनखिंड प्रकरण नंतर जेजुरी येथे झाली .
८) राजे आणि शंभू राजे यांच्यात द्वंद्व कधीच झाले नव्हते ..
९) ज्या मासाहेबांनी प्रेरणा दिली तिथे त्याच मांसाहेब म्हणतात कि
"राजे लेकीन आप कर भी क्या सकते है ??????"आणि हतबल होतात .
( हे पाहिल्यावर मात्र रागच येतो )
१०)सोयराबाई चे पात्र आता पासूनच संकुचित वृत्तीचे दाखवले आहे .
.
आणि सर्वात मुख्य म्हणजे शिव पूर्वकालीन
महाराष्ट्र , बालपण , मान्साहेबांचे संस्कार , या देशाला राजेंची गरज का पडली ????????
हेही काहीच दाखवले नाही .
.
सर्वात कहर म्हणजे मालिका सुरु झाल्यावर
निर्लज्यपणे खाली येते कि"याती घटना सत्य न
आढळल्यास ते आम्ही मालिका रोचक करण्यासाठी केले आहे"!!!!!!!!
म्हणजे काहीही खोटारडे पणाचा राजेंचा इतिहास आम्ही दाखवू ....
.
माझे वैयक्तिक मत असे आहे कि .......
हि मालिका बंद करावी ......... आणि राजेंची मानहानी थांबवा .......
तुम्हाला काय वाटते ???????
जय शिवराय..!!                  By - Nilesh Nalawade

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.