शनिवार, २८ जानेवारी, २०१२

-- आपला मिडिया --

मनुवादी वृत्तपत्रे,मासिके,दूरदर्शन & सर्व Channel वाले आपल्या लाखोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या जन्मोत्सवास प्रसिद्धी देतील ही अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे...अर्थात आपण प्रयत्न करत राहू ..आज ना उद्या तथाकथित भैताड दैनिके आपली दखल घेतील तेव्हा घेतील ...पण आज आपण स्वत:चा मिडिया बनवूया ...होय अजून आपण तालुक्यातील काही गावांपर्यंत पोहोचलेलो नाही ..हे सत्य आहे.. असा मिडिया की जो वापरतांना आपल्याला पैसे पण मिळतील आणि आपले विचार पण पोहचतील असा मिडिया आहे...आणि याचा प्रत्येक तालुक्यात प्रभावीपने वापर केल्यास निश्चित चळवळ घराघरात पोहचेल यात शंका नाही...बघा मग आपना समोर विषय मांडतो आहे...सच्चे जिजाऊप्रेमी -बहुजन महामानव प्रेमी असाल तर अंबलबजावणी कराल...
**--आपला मिडिया---**
@@ Bookstall @@
आम्ही सुरु केलेल्या "राष्ट्रनिर्माते बुक STALL"ला प्रचंड प्रतिसाद मिळाला..२ दिवसात ५००० रुपयाची पुस्तके विकली गेली...
नियोजन असे करा --
*१ किवा ४-५ मित्र मिळून stall सुरु करा.
*प्रत्येकी २ हजार रुपये जमा करून विविध प्रकाशनचि पुस्तके आना.
( उदा.जिजाई प्रकाशन,पुणे/.पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद/ शिवभारती प्रकाशन,नागपूर (प्रा.मा.म.देशमुख यांची पुस्तके) लोकायत प्रकाशन,सातारा.(डॉ.आ.ह.साळुंके यांची पुस्तके),बळीवंश प्रकाशन,औरंगाबाद.सत्यशोधक प्रकाशन,धुळे..शिवविचार प्रकाशन,जळगाव(मिलिंद विचारे सर यांची पोस्टर्स...मुलनिवासी प्रकाशन,पुणे...अशी विविध परिवर्तनवादी विचारांचे प्रकाशन ...त्याची सूची मिळवा...१०% ते ४० % पर्यंत सुट मिळवून ही पुस्तके ,पोस्टर्स,DVD-CD मिळवून आपले बुक STALL चे BANNER,शिक्का तयार करा.
*पुस्तके निवडतांना कमी किमतीची ५० रुपयाच्या आत पुस्तके घेण्यावर भर द्या.
*लहान पुस्तके जास्त विकले जातात उदा.देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे-प्रबोधनकार ठाकरे किमत -१० रुपये.
*तालुक्यातील ७ मोठे बाजारपेठ्ची गावे निवडा.
*प्रत्येक दिवसी ज्या ठिकाणी बाजार असेल तेथे stall लावा.
*त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या ठिकाणी stall लावा.
*आपल्याला अन्पेक्षित समाधान मिळेल.
* घराघरात पोस्टर्स,पुस्तके DVD जातील..
* शाळांना भेटी देऊन मुलांना चरित्र पुस्तके दाखवा..
* बहुजन महामानवांचे चित्र-चरित्र आणि विचार घरोघरी पोहोचवा.
* हाच आपला मिडिया आहे..
आपली चळवळ वाढेल...कार्यक्रमांना उपस्थिती वाढेल..
सध्यातरी हा आपला मिडिया हक्काचा आहे तो सुरु करा...
मग आपण आपल्या तालुक्यात सुरु करताय ना..!!
चला तर मग आपला मिडिया भक्कम बनवूया !!
आपला मिडिया --
आपला आवाज --BOOK STALL.
जय जिजाऊ !!
--आपला मित्र - सुनील चौधरी,जळगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.