बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

राज ठाकरे नावाचा हरामखोर....

(एम. डी. रामटेके यांच्या ब्लॉगवरून साभार, कारण हा लेख मला आवडला. यात मनुवादी बामन कसा बहुजनांच्या आंदोलनाला स्वतःच्या फायद्यासाठी विरोध करतात याचे वर्णन आहे.)
राज ठाकरे नावाचा हरामखोर काल मुंबईतील एक सभेत म्हणतो की “इंदू मील मधे काय बंगला बांधायचा आहे का?” राज ठाकरेच्या या व्यक्तव्यानी आंबेडकरी समाजात मोठी संतापाची लाट उसळली. अनेकानी निषेध नोंदविला. चळवळीच्या सम्राटानी तरी मोठी बातमीच छापली. कित्येकानी पैसे खर्च करुन निषेधाच्या जाहिराती छापल्या... त्या सर्वाना मी सलाम करतो. त्या नंतर जरा शांतपणे विचार केल्यावर मला वरील वाक्यातील गमक समजल. ते काय आहे ना राज्या ठाक-या (या माणसाचं नाव आदराने घ्यावा त्याची ही लायकी नाही म्हणून त्याचं नाव जरा खास पद्धतीने मुद्दामच घेतोय) व्यवसायाने आहे बिल्डर. मग काय दिसली जमीन की बांध घरं... दिसली जमीन की बांध बंगला.... दिसली जमीन की बांध व्यापारी संकुल.  थोडक्यात काय तर या ठाक-याला जमीनीचा उपयोग फक्त वरील कारणासाठीच होतो हे माहित आहे. म्हणून जेंव्हा राज्याला कळलं की आंबेडकरी जनता इंदू मीलची जागा मागत आहेत जी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामूळे राज्या चरफडला असेल हे कळल्यावर राजला वाटलं की अरेच्च्या... म्हणजे हा आंबेडकरी समाज पण आता बांधकाम व्यवसायात उतरली की काय? अन पहिला वार माझ्याच (दादरला ते बालेकिल्ला बिल्ला काय म्हणतात ना... ते... ) दादरात घातला म्हणयाचा  आता ईथे नव्या बांधकाम व्यवसायीकांशी स्पर्धा होणार. अरे पण राज्या... ठाक-या... जमिनीचे अनेक उपयोग असतात. तु पेपर बिपर नीट वाचत नाही वाट्टे... अरे ती जागा बंगल्यासाठी मागत आहेत की आजूण कशासाठी किमान तुझ्या सेक्रेटरीकडे चौकशीतरी करायची ना. मला माहीत आहे राज्या... बांधकाम व्यवसायीक बनायला फार अभ्यास भिब्ब्यास लागत नाही. नुसती दादागिरी करता आली की झाला बांधकाम व्यवसायीक. तु तर नंबर एकचा चोट्टा व खूनी आहेस. तुझं नशीब बलवत्तर म्हणून किनी प्रकरणातून सुटलास. त्यामूळे दादरची जागा कशासाठी मागली जात आहे हे तुला नक्कीच माहित नसणार यावर माझा विश्वास आहे. कारण तू ठरलास गुंड व राडेबहाददुर तुला काय कळणार त्यातलं. पण तुझ्याकडे सचिव बिचव आहे म्हणे.... ते तर शिकलेले असतीलच. मग वरील वक्तव्य करताना जरा चौकशी नाही का राज्या करायची.
आता काय आहे  तू विचारलासच आहेस म्हणून तुला सांगणे माझे कर्तव्य समजून थोडक्यात ती जागा कशासाठी मागतोय ते सांगतोच आहे.
ते काय आहे ना बाबासाहेब नावाचा आमचा(समस्त बहुजनांचा) एक बाप होता. आमचा बाप आमच्यासाठी खूप खूप झिझला, खूप लढला व शेवटी आमच्यासाठी लढता लढताच निसर्गात विलीन झाला. हा आमचा बाप जिथे राहात होता ना ती जागा म्हणजे दादर होय. म्हणून आम्ही सगळे त्या बापाची लेकरी त्या दादरला आमच्या बापाची जागीर समजतो... कळलं का? हो दादरला आम्ही आमच्या बापाची जागीर समजतो. मला एक सांग राज्या तुझ्याकए जागीर आहे का रे? छे छे... कुठली आहे जागीर तुझ्यासारख्या भिकारड्याकडे. हां पण काका आहे... हंम्म... अन त्या काकाच्या जागीरीवर नजर ठेवुण होतास, मला माहित आहे. ती मिळणार नाही हे कळल्यावर बाहेर पडलास. तूला काय कळणार बापाची जागीर काय असते ते. मग तिथे कुणाची मील असो की बील(बिल्डिंग) असो त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. आमच्या बापाची जागीर असल्यामूळे ती आमची...च... आहे. मग तुझ्या सारख्या कुत्र्यानी कितीही भुंकलं तरी आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आम्ही आमच्या बापाच्या प्रती अत्यंत निष्ठावान आहोत तु तुझ्या बापाच्या.... अर्र.र्र.र्र... काकाच्या प्रति.... जाऊ दे राज्या....  मग काय आमच्या बापाच्या नावाचा आंतरराष्ट्रिय दर्जाचा स्मारक तिथे बांधण्याचा आम्ही सर्व लेकरानी संकल्प सोडला आहे. ज्याला तु बंगला समजत आहेस ना राज्या... अरे तो बंगला नव्हे... तो स्मारक होय स्मारक. त्याच काय ना... तु तुझ्या बाप जन्मी...  अर्र.र्र.र्र... काका जन्मी कधी स्मारक बांधलास का? नाही! हम्म... म्हणूनच.... म्हणूनच तुला माहित नाही.  तर काय आहे आम्ही तिथे बंगला नाही, तर आमच्या बापाचा स्मारक बांधणार आहोत. अन नुसतं स्मारक नाही बर का राज्या, तर जागतीक दर्जाचं स्मारक बांधणार आहोत. आता काय आहे ना... ते असणार आहे विटा-सिमेंटचच पण ती वास्तू राहण्यासाठी नसून तिथे बाबासाहेबांच्या आठवणी, कार्य व इतिहास याची माहिती देणार अनेक विभाग असतील. त्याला स्मारक म्हणतात.  तुझं काय तू राहतोस कृष्ण कुंजात...अरे रे... म्हणजे काय काय कृष्ण लिला चालत असतील तिथे तुच जाणे  म्हणून तुझा थोडासा गैरसमज झाला की असच काही तरी तिकडे इंदू मील मधे होणार. पण तस नाही राज्या ती आमच्या बापाच्या नावाने बांधली जाणारी एक पवित्र वास्तू असले.
काय आहे तुला कृष्ण कुंजातील ...लिलातून  कधी वेळ मिळालाच तर तिकडे एक चक्कर टाक म्हणजे तुला कळेल की सगळी लोकं तुझ्यासारखी लिला   बहाद्दुर नसून बापाच्या प्रती ईमानी व निष्टावानही असतात हे बघता व अनूभवता येईल. त्याचा तुला झालाच तर फायदाच होईल बरं का राज्या.... नुकसान अजिबात होणार नाही. आमच्या चैत्यभीमीत आलाच्या थोडाजरी तुझ्यावर परिणाम झाला ना तर तुझा काका आता मरायला टेकला आहे तो तरी किमान सुखानी मरेल शेवटच्या काही दिवसात तरी त्याला जरा बरे दिवस पाहायला मिळतील.
एका वाक्यात तुला एवढच सांगेन राज्या..... आपल्यासाठी जे झिजतात त्यांच्या प्रति निष्ठावान कसे असावे हे जर पहायचे असेल तर तू एकदा चैत्यभूमीत नक्की ये. अन जमल्यास त्या पवित्र कार्यावर मदत बिदत तुझ्यासार्ख्या बदमाशाकडुन नकोच आहे पण  किमान टिका तरी करु नकोस. आता हे समजेल ईतकी तुला अक्कल असेल या बाबत मी शासंकच आहे पण एक बौद्ध व्यक्ती म्हणून चांगल्या मनाने दोन शब्द सांगितले. बघ तुला कळतं का.

जयभीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.