गुरुवार, ५ जुलै, २०१२

संत नामदेव - तुकोबांचा वारकरी आणि आजचा वारकरी

Add caption
वारकरी चळवळीचा समृद्ध आणि जाज्व्ल्व इतिहास पहात असतना संत नामदेव ते संत तुकाराम हा भरभराटीचा काळ डोळ्यासमोरून सहज सरकू लागतो. त्यांनी निर्माण केलेला भागवत धर्म आणि त्या धर्माचा अनुयायी म्हणजे" वारकरी "होय. भागवत ह्या पाली शब्दाचा अर्थ ,भाग,[हिस्सा, वाटणी.] वत [समान] अर्थात समान वाटणी किवा समान विभागणी असा होतो.
आणि वारकरी म्हणजे अन्याय,अत्याचार,रूढी,परंपरा,वैदिक व्यवस्था ,चमत्कार आणि ब्राम्हणी व्यवस्था यावर वार करणारे होय. याचा पुरावा तपासत असताना संत नामदेव महाराजांनी ३३ कोटी देवावर शाब्दिक वार करून एकच अवैदिक विठ्ठल उभा केला आणि तोच सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्धहि केले. [आजच्या वारकर्यांचे प्रमाणाशिवाय पण हलत नाही. ] म्हणून त्यांची कांही प्रमाणे :-
प्रमाण क्रमांक १.
" आमुचा विठ्ठल प्रचंड | इतर देवाचे न पाहू तोंड ||१|| एका विठ्ठलावाचून | न करू आणिक भजन ||२|| आम्हा एकविध भाव | कडा न म्हणू इतर देव ||३| नित्य करू अभ्यास |म्हणे नामा विष्णूदास ||४|| "
आणि तेव्हाचे खरे वारकरी विठ्ठलाशिवाय कोणालाही मानत नव्हते. सर्वांच्या मुखी एकच विठ्ठल असे. पण आजचा वारकरी हे सर्व विसरला आणि काशी,प्रयाग,गया,बालाजी,अर्थात चारीधाम,साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक, साईबाबा, सत्यसाईबाबा,अक्कलकोट स्वामी ,गजाननमहाराज आणि पुन्हा म्हातारपणात संत नामदेव - तुकोबारायांचे गोडवे गायचे.
अशा खोट्या वारकर्यांचा संत नामदेव महाराज प्रखर शब्दात वार करतात आणि सांगतात ..,,
प्रमाण क्रमांक २ .
" सांडूनी पंढरी जासी आणिका तीर्थ | लाज तुझ्या चित्ता कैशी न ये ||१||"
बरे हा सगळा खटाटोप करण्यामागे संत नामदेव महाराज यांचा काय उद्येश होता हे तरी आमचा भोळा वारकरी वर्ग जाणतो कि नाही ,त्याचे असे आहे ,वैदिक धर्मात अर्थात ब्राम्हण धर्माच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी संत नामदेव महाराजांनी नवा धर्म स्थापिला .ते म्हणतात ----
प्रमाण क्रमांक ३ :-
" आम्हा सापडले वर्म | करू भागवत धर्म ||२|| "
ब्राम्हणांना बोंबलून .... बोंबलून ... जे काही मिळाले नाही ते मुख्य वर्मच आम्हाला सापडले आहे. श्रुतीना नाही, नाही म्हणजे रिकाम्या हाताने परतावे लागले. पण ते सत्य आम्हा सहजरीत्या सापडले.
प्रमाण क्रमांक ४ :-
" परतल्या श्रुती म्हणती नेती नेती | आम्हा गाता गीती सापडले ||१||
नवा धर्म निर्माण केल्यावर संत नामदेव सर्वप्रथम जातीव्यवस्था नाकारतात. ते म्हणतात तुलस घाणेरड्या जागी उगवली म्हणून तिचे महत्व काही कमी होत नाही. कावळ्याने पिप्लाच्या झाडावर विष्ठा टाकल्याने पिंपळी अमंगल होत नाही. दासीच्या पुत्राला राज्यपद मिळाल्याने तो राजाच होतो . त्याला दासीपुत्र म्हणू नये. अगदी तसेच मी शिंपी झालो म्हणून मला हीन जातीची उपमा देण्याचे काही कारण नाही.
" कुश्चल भूमीवरी उगवली तुलसी | अपवित्र तियेसी म्हणू नये ||१|| काकविष्टेमाजी जन्मे तो पिपल | त्या अमंगल म्हणू नये ||२|| दासीचिया पुत्र राज्यपद आले | उपमा मागील देऊ नये ||३|| नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी | उपमा जातीची देऊ नये ||४||"

[अपूर्ण.]



२.संतामुळे मराठीला वाड्मयीन प्रतिष्टा :-
खालील मुद्धे आपण काळजीपूर्वक वाचावेत आणि खरच नेमके सत्य काय आहे हे आपण रोख-ठोकपणे सांगावे.
१] जो समाज मनुवादी ब्राम्हणाच्या तडाख्यात अद्याप सापडला नाही ते संत नामदेवाला आपला देव मानतात.असाच प्रकार भगवान गौतम बुद्धाच्या बाबतीत झाला आहे. तिबेट, भूतान, ब्रम्हदेश, श्रीलंका, इथे ब्राम्हणाचा प्रभाव पडला नाही. म्हणून तेथे बुद्धाचे देवत्व अबाधित राहिले. भारताला मनुवाद्यांचे खग्रास ग्रहण लागले अन आदर्श आचार सहिंता देणाऱ्या बुद्धाच्या धम्मा च्या खोट्या कर्मकांडाच्या व ब्राम्हणी कल्पनेतून निघालेल्या जातिभेदाचा विकृत धर्म तयार झाला. ज्याप्रमाणे बुद्धाच्या प्रभावाखालील लोक आपल्या अमलाखाली आणण्यासाठी देवाच्या नावाने अदभूत चमत्काराच्या पुराणकथा लिहून त्याचा लोकात प्रसार केला गेला तसाच प्रकार संताच्या प्रभावाखालील लोकांना आपल्या वर्ण वर्चस्वावादि धर्मात आणण्यासाठी मनुवाद्यांनी केला.
२] पुराणातील देवांना जसे चमत्कार करता येत असे तसे संताना देखील करता येत असे लोकांना वाटावे अशा गोष्टी मनुवाद्यांनी लिहून बहुजन लोकांचा बुद्धिभेद केला. संत नामदेवांनी धर्मजागृतीची मोहीम चालू केली होती. त्याचा परिणाम म्हणून पुढील काळात गुरु नानक, संत कबीर, या धर्मवेत्यांचा उदय झाला. या धर्मवेत्यांपैकी गुरु नानक देवांची स्न्घत्ना अभेद्य निघाली.
३] आता असे सांगण्यात येते कि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वराणे वारकर्यासाठी लिहिला. पण एक्नाथापुर्वी १०० वर्ष अगोदर होऊन गेलेल्या भानुदास नामक विठ्ठल भक्ताच्या अभंगात ज्ञानेश्वरी चे नाव नाही. एकनाथांचा गुरु जनादर्नस्वामी यांच्या अभंगात ज्ञानेश्वरी चे नाव नाही. आळंदीच्या वारीचे नाव नाही. आल्न्डीची वारी एक्नाथाने सुरु केली .जर ज्ञानेश्वरीकर्त्या ज्ञानदेवाचे समाधीस्थान आळंदी हे असते तर समाधी घेतलेल्या वर्षापासून आळंदीहून पंढरपूरला दिंडी काढण्यास सुरुवात झाली असती. पण समाधी व ज्ञानेश्वरी यांच्या बाबत एकनाथ काळापर्यंत अशी अवस्था होती कि आळंदीमध्ये ज्ञानेश्वराची समाधी आहे हे याची आळंदीकरणा कल्पना नव्हती. मग अन्य ठिकाणच्या लोकांना कशी असणार.

खालील मुद्धे आपण काळजीपूर्वक वाचावेत आणि खरच नेमके सत्य काय आहे हे आपण रोख-ठोकपणे सांगावे.

भाग-२ रा


[1] संत एकनाथांचा स्वप्न दृष्टांत :
संत एकनाथांच्या स्वप्नात संत ज्ञानेश्वर आले अन म्हणाले," माझ्या गळ्याला पिपलव्रुक्षाच्य मुळांचा फास लागला आहे, तेव्हा आळंदीला येऊन तो फास सोडव." हि हकीगत संत एकनाथांनी पुढील अभंगात सांगितली आहे.
ज्ञानदेवे येउनी स्वप्नात |
सांगितली मात मजलागी |
दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा |
परब्रम्ह केवल बोलतसे
अजानवुक्षाचि मुली कंठास लागली
येउनी आळंदी काढ वेगी |
ऐसे स्वप्न होतो आलो अलंकापुरी |
एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले |
श्रीगुरू भेटले ज्ञानदेव |
" प्राचीन मराठी संतकवी " या ग्रंथाचे लेखक ज,र.अजगावकर म्हणतात " पुढील ३०० वर्षाच्या काळात त्या ठिकाणी रान माजले होते. त्यास्थळी ज्ञानदेवाची समाधी आहे. हि गोष्ट लोक साफ विसरून गेले होते. पुष्कळ लोक बरोबर घेऊन नाथ आळंदीस गेले.व ज्ञानदेवाच्या समाधीचा शोध लाऊन तिचा जीर्णोद्धार केला. त्याच प्रमाणे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अनेक प्रती मिळून त्या ग्रंथाचे त्यांनी संशोधन केले.त्याची शुद्ध परत तयार केली.
संत एकनाथांच्या अभंगावरून आजगावकर यांनी हे भाष्य केले आहे. कि , आळंदीला ज्ञानोबाची समाधी आहे. हि गोष्ट पुढील ३०० वर्ष लोक साफ विसरले होते. यावर शंका अशी कि, प्धील ३०० वर्ष लोक या समाधीला विसरले होते असे कशावरून म्हणता येईल. तीन हजार वर्ष म्हणायला काय जाते ?
ज्या ज्ञानेश्वरीने वारकरी पंथाचा पाया घातला असा डंका गाजविला जातो त्या ज्ञानेश्वरीच्या लेखकाच्या समाधीला लोक विसरतात. असे घडणे शक्य नव्हते. समाधीचे बनावट अभंग नादेव गाथेत समाविष्ट करण्यात आले त्यावरून आजगावकर यांची समज अशी झाली कि जाती बहिष्कृत ज्ञानदेवने ज्ञानेश्वरी लिहिली. व त्यानेच आळंदीला समाधी घेतली. या बनावट अभंगाला पुष्टी मिळावी म्हणून संत एकनाथला स्वप्न दृष्टांत झाला अन त्या दृष्टातानुसार आळंदीच्या त्या समाधी खड्ड्यात एकनाथाच्या सुक्ष्म देहास समाधी अवस्थेतील ज्ञानेश्वर भेटले. समाधी नंतर ३०० वर्षे ज्ञानेश्वर ज्या अर्थी जिवंत होते त्या अर्थी अध्याप ते ह्यात असावयास हवेत. समाधी घेतल्यावर ज्ञानेश्वरा सारखे शरीर अस्तीत्वात राहिल्याची अन्य घटना दुसर्या कोण्या योग्याच्या बाबतीत घडल्याची कथा पुराणात सुद्धा नाही. ज्या ज्ञानदेवाचा अमानुष असा छळ ब्राम्हणांनी केला त्या ज्ञानदेवाचे नाव वापरून बहुजन समाजाला ब्राम्हणी वर्चस्वाच्या मगरमिठीत अधिक घट्ट पकडण्यासाठी हि कथा रचली आहे. ज्ञानदेवाचा छळ करणारे लोक नंतर त्यांच्या हयातीतच त्याने भक्त बनले होते, असे भासविण्याचा हा संत एकनाथी डाव आहे. 



भाग-३ रा 

संतामुळे मराठीला वाड्मयीन प्रतिष्टा :-
खालील मुद्धे आपण काळजीपूर्वक वाचावेत आणि खरच नेमके सत्य काय आहे हे आपण रोख-ठोकपणे सांगावे.
[१] संत एकनाथ समाधी दुरुस्त करीपर्यंत तिथे ज्ञानेश्वरी कर्त्या ज्ञानेदेवाची समाधी आहे हि गोष्ट कुणाला माहित नव्हती. त्या ठिकाणी झाडे-झुडुपे वाढली होती. समाधी ढासळत होती. म्हणजे त्या समाधीची व्यवस्था ठेवली जात नव्हती. तिची नित्य पूजा होत नव्हती कि तिथे नित्य झाडू मारला जात नव्हता. कुणी दर्शनाला जात नव्हते. जर ज्ञानेश्वराने अनेक चमत्कार करून आपले अलोकीक्त्व जगजाहीर केले होते अन वारकरी पंथाचा पाया घातला होता. तर त्यांनी समाधी घेतल्याच्या दिवसापासून तिथे धार्मिक कार्यक्रम चालू रहावयास हवे होते. आपला वारकरी संप्रदाय स्थापन करणाऱ्या ज्ञानदेवाच्या समाधीला विसरून जाण्याचा कृतघ्नपना कुणाही वारकर्यांनी केला नसता. असे असता आळंदीची हि समाधी उपेक्षित का राहिली ?
[२] याचे उत्तर हेच, कि ती समाधी जाती बहिष्कृत ज्ञानदेवाची नाही. अन समजा ती ज्ञानेश्वरीकर्त्या संत ज्ञानेश्वर यांची असती तर तर त्याचा अर्थ असा होतो कि,- हे ज्ञानेश्वर व त्यांची ज्ञानेश्वरीचे यांचे वारकरी मन्डळत काडीचे स्थान नव्हते . त्यांची समाधी फुटून गेली काय, किवा त्यांची ज्ञानेश्वरीने अपपाठाने विकृत बनली काय , वारकर्यांना त्याचे सोयरसुतक वाटत नव्हते.
[३] पौराणिक घाटनीचे समाधीचे अभंग -
ज्ञानदेवाच्या समाधीचे अभंग संत नामदेवांनी लिहिले असा समज करून देण्यात आला आहे. या अभंगाचे अंतरंग बघितले तर कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. या अभंगात कोणते चमत्कार नाहीत ? पुराण कथेतील चमत्कार झक मारतात असे चमत्कार या समाधीच्या अभंगात आहेत. ज्ञानेश्वर समाधी घेतो म्हणून साक्षात परब्रम्ह विठोबा गहिवरतो, आणि त्याच वेळेला पेशवाई थाटात मेजवान्या झडत असतात. पंचपक्क्वन्नाचे भोजन साक्षात रुक्मिणी देवी उपस्थित स्वतः मंडलीना वाढत असते. नारद तुंबर गायन करीत असतात. यक्षकिन्नर नृत्य करीत असतात. असा सगळा आनंदाचा जल्लोष असतो.मग नामदेवाचे पुत्र नारायण आणि गोदा समाधी स्थानी झाडलोट करतात. सारवण घालतात .मग त्या खड्ड्यात संत ज्ञानेश्वर बसतात. मग वर शीला ठेऊन समाधीचे तोंड बंद करतात. 



भाग -४ था  

खालील मुद्धे आपण काळजीपूर्वक वाचावेत आणि खरच नेमके सत्य काय आहे हे आपण रोख-ठोकपणे सांगावे.
[१] सगळ्यांचा समज असा करून देण्यात आला आहे कि-संत परंपरा अनेक शतके चालू होती. तिच्यामध्ये कधीतरी संत नामदेव होऊन गेलेत. पण वस्तूस्थिती तशी नाही. नामदेवापुर्वी कुणीही संत झाला नव्हता. नामदेव हेच वारकरी धर्माचे आद्य संत ! त्यांनी अभंग रचना केली.
[२] ज्ञानेश्वरीकरता संत ज्ञानेश्वर याने वारकरी पंथ स्थापन केला नाही. वारकर्यांचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा . ज्ञानेश्वरीमध्ये विठोबाचा साधा उल्लेख नाही. आणि पंढरपूरचा सुद्धा ठावठिकाणा नाही. तरी सांगण्यात येते कि ज्ञानेश्वराने वारकरी पंथाची स्थापना केली. आणि या पंथासाठी ज्ञानेश्वरी लिहिली.
[३] ज्ञानेश्वरी अशा ब्राम्हणासाठी लिहिली कि ज्यांना चार वेदांची माहिती आहे, षडदर्शनाची माहिती आहे, ब्राम्हणे,अरण्यके,उपनिशिदे ,स्मुर्तीग्रंथ ,धर्मसूत्रग्रंथ, याची माहिती आहे .शांकरभाष्य माहित आहे, व्यास्सुत्रे माहित आहेत.
वरील ग्रंथापैकी कुठल्याही ग्रंथाला वारकर्यांनी भिक घातली नाही. तरी अश्या ग्रंथाची तरफदारी करणाऱ्या ज्ञानेश्वरीला संत एकनाथ यांनी वारकरी पंथाला प्रमाणभूत ग्रंथ म्हणून प्रस्तापित केला.
[४] शिखांचा पवित्र धर्मग्रंथ ग्रंथसाहेब यांत संत नामदेवाचे अभंग आहेत. सेना नाव्ही, संत रविदास चे अभंग आहेत. पण सगळ्या महाराष्ट्राची माउली म्हणून जे संत ज्ञानेश्वर यांचे नाव सुद्धा या पवित्र धर्मग्रंथात नाही.
महाराष्ट्रातील संत एकनाथी मंडली भासवितात तेव्हढे जर संत ज्ञानेश्वर महान आहेत तर त्याचे पसायदान तरी या धर्मग्रंथात नक्कीच समाविष्ट करण्यात आले असते.
[५] भारत देशात शंकराचार्याची किती देवळे आहेत हा संशोधनाचा विषय ठरेल. परंतु संत नामदेवाची शेकडो देवळे आहेत. संत नामदेव हे संत ज्ञानेश्वर पेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ होते. पण शंकराचार्याला सुद्धा नामदेवाच्या शताशानेही लोकप्रियता मिळाली नाही कारण संत नामदेव हे बहुजन समाजाचे होते, तर शंकराचार्य ब्राम्हण समाजाचे स्वार्थ साधणाऱ्या धर्माचा आचार्य होता. 

भाग  -५



" सांडूनी सुखाचा वाट | मुक्ती मागे तो करंटा ||"
किंवा
" न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्जता | सुख वाटे घेता जन्म ऐसे ||"
म्हणजे थोडक्यात काय ,संत नामदेव -तुकोबाराय जे करू नका म्हणाले, तेच आज सुरु आहे. हा तर त्यांचा घोर अपमान आहे. यालासुद्धा काय कारण आहे. संत मंडलीच्या मुक्तीच्या,स्वातंत्र्याच्या आंदोलनात भट मंडली घुसली. आणि मग त्यांनी भक्तीचे आंदोलन सुरु केले. आणि त्यामुळे वारकरी एवढा गुलाम,चेतनाहीन झाला कि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गोपालकृष्ण बडवा मुतला तरी एकही वारकरी रस्त्यावर उतरला नाही. " नाठाळाच्या माथी काठी हाणायला " आम्ही आमचा लाडका विठ्ठल बडव्यांच्या कैदेतच आहे. जोपर्यंत विठ्ठल आणि वारकरी - धर्म भटमुक्त होत नाही तोपर्यंत या देशात संत नामदेव आणि संत तुकोबारायांचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून मला संत नामदेव-संत तुकोबारायांना म्हणावेसे वाटते कि, महाराज तुम्ही गेलात आणि इथला वार-करी पुन्हा अभद्र ब्राम्हणाच्या ताब्यात गेला आणि गुलाम बनून वारीकरी झाला. महाराज तुमची कीर्तन ऐकणारी सर्वसामान्य जनता तशीच आहे. गरिबीत पण कीर्तन सांगणारे भट-ब्राम्हण मात्र मालामाल झाले. तुम्ही ज्या ओट्यावर उभे राहून कीर्तन करायचे तो ओटा आता अभद्रपीठ झाला. आणि ओट्यावर उभे राहणारे तर विचारूच नका. कंबरेला रुमाल बांधूनही त्यांच्या ढेर्या समाजच खाऊन खाऊन फुग्ल्यात. त्या रुमालाला सुद्धा जुमानत नाहीत. सारख्या लोंबतात. तुमच्या कीर्तनाच्या अभंगातून खंडनी गोळा करण्याच काम सुरु झाल आहे. तुमचा विठ्ठल दररोज विकला जातो आहे. कीर्तनात स्टेजवर चक्क ध्वनीफिती ,माळी,दिनदर्शिका बोलायला लागतात. आजच्या कीर्तनात विठ्ठल नसून पैसाच नाचतो. विनाही पहिल्यासारखा बोलत नाही. सूर धरत नाही. किलो-किलोचे टाळ वाजून वाजून छ्टाकावर आलेत तरीही त्या टाळाचा उद्धार झाला नाही. टाळ वाजवणाराचे दाभाड बसले.मृदुंगाचा पार तबला होऊन गेलाय .आज सगळ हे पाहवत नाही हो. जो तो हवा तसा नाचतोय . तुकोबाराय या तुम्ही एकदा परत. नाठाळाच्या माथी काठी हाणायला. [पूर्ण.]
 
लेखक ;-  शि.भ.प.नितीन महाराज बोरीकर. परभणी. मो:. ९९७०७४४१४२.
--संकलन -भास्करराव नरसाळे,अ'नगर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.