मंगळवार, ३ जुलै, २०१२

१३) रामदासी शिष्यांचा अजून एक छुपा डाव...

 प्रतापगड युद्ध विषयीची एक बोगस ओवी

विवेकेकरावेकार्य साधन |
जाणार नरतनु हे जाणोन |
पुढील भाविष्यार्थी मन|
रहाटोंची  नये ||१||
चालों नये असन्मार्गी  |
सत्यता बाणल्या आंगी |
रघुवीर कृपा ते प्रसंगी |
दास महात्म वाढवी ||२||
रजनीनाथ आणि दिवाकर|
नित्यनेमे करिती संचार|
घालीताती येरझार |
लाविले भ्रमण जगदिशे ||३||
आदिमाया मूळ भवानी|
हेची जगताची स्वामिनी|
एकांती विवेके धरुनी |
इष्ट योजना करावी ||४||
                                (प्रतापगडचे युद्ध. पृ. ६७ )

अफजलखान विजापुराहून निघाल्यानंतर तिथल्या रामदास स्वामीच्या शिष्याने एका ओवीद्वारे त्याची माहिती शिवरायांना दिली अशी एक आधुनिक काळात तयार केलेली ओवी "प्रतापगडाचे युद्ध" या पुस्तकात प्रथम छापण्यात आली होती.
       या ओवीरूपी पत्राचा नेमका उगम कोठून झाला याविषयी माहिती मिळत नाही. प्रतापगडचे युद्ध या पुस्तकाचे लेखक मोडक यांनी हि ओवी रामदास व रामदासी या धुळे येथून प्रकाशित होणाऱ्या पाचव्या अंकातून घेतल्याचा संदर्भ दिलेला आहे. (मूळ संदर्भ -१). तर त्याच अंकाच्या सतराव्या भागात हि ओवी ज्ञानप्रकाश किंवा मिरजेतील शिवचरित्रात छापल्याचे लिहिलेले आहे. पण या ज्ञानप्रकाशाच्या अंकाचा किंवा मिरजेतील शिवचरित्राचा नेमका संदर्भ दिलेला नाही. या संदर्भातील लिखाण हे केवळ आठवणींच्या आधारे लिहिलेले आहे. (मूळ - संदर्भ - २)
      
या ओवीतील भाषा शिवकालीन नसून उत्तर पेशवाईतील  आहे. या सर्व गोष्टींमुळे हि ओवी बनावट आहे हे सिद्ध होते. शिवाय १६५९ च्या दरम्यान रामदास स्वामींच्या मठांचा आणि शिष्य संप्रदायाचा प्रसार आदिलशाहीच्या राजधानीपर्यंत पसरण्या येवढा मोठा झालेला न्हवता . शिवाजी महाराजांचा व रामदास स्वामींचा संबंध १६७२ नंतर आला होता. तोपर्यंत शिवरायांना समर्थ रामदास कोण हेच माहिती न्हवते. पण पेशवाईतील समर्थ भक्तांनी शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे संकल्पक आणि मार्गदर्शक रामदास स्वामी होते हे सिद्ध करण्यासाठी अशी अनेक बनावट पात्रे, ओव्या तयार केल्या होत्या. उत्तर पेशवाईत लिहिलेल्या हणमंत स्वामींची बखर नावाने प्रसिद्ध असलेल्या बखरीत तर शिवराय व रामदास यांच्या संबंधातील अनेक भाकड कथांचा भरणा केला आहे. या बखरीत रामदासांना दो अंगुले पुच्छ असल्याचे लिहिले आहे. यातून समर्थांचा आणि शिवरायांचा मोठेपणा सिद्ध होत नाही तर त्यांच्या महान कर्तुत्वाला , त्यांच्या चरित्र-चारित्र्याला आपण विकृत , खुजे करत आहोत याचे भानही अश्या ओव्या, कथा रचणाऱ्या, सांगणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांना राहत नाही.
        अशा पद्धतीने एका संन्याशाकडून  सूचना घ्याव्यात इतका भोंगळ कारभार शिवरायांचा न्हवता. स्वराज्याचे हेर खाते अत्यंत प्रगत - जलद आणि सबल होते. याचे दाखले शिवचरित्राच्या पाना- पानात आपणास दिसून येतात, अश्या पद्धतीचा काल्पनिक अभंग रचण्याचा व पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या छापणाऱ्या व्यक्ती शिवरायांना, त्यांच्या हेरखात्याला कमीपणा देतात., हे आपण समजून घेतले पाहिजे आणि म्हणूनच हा अभंग या परिशिष्टात देऊन हे स्पष्टीकरण करावे लागले आहे.

लेखातील मूळ संदर्भ -- १) प्रतापगडाचे युद्ध पृ- ६७
                                   २) रामदास व रामदासी भाग सतरावा, १८४२ चैत्र सुद्धा , पृ. १८५



--लेखाचा संदर्भ - परिशिष्ट - १
   प्रतापगड युद्धाविशायीची एक बोगस ओवी --
   प्रताप गडाची जीवन गाथा - पृ. ३ - लेखक इंद्रजीत सावंत..


..(माझे मत -- रामदासी शिष्य कसे छुप्या पद्धतीने हळूच खोटे असलेले संदर्भ देखील खपवतात ह्याचा उलघडा इंद्रजीत  सावंतांनी त्यांच्या पुस्तकातून केलेला आहे...
              इंद्रजीत सावंतांनी त्या खोट्या ओवीचा संदर्भ ज्या वेळेस तपासून बघितला तेव्हा.. त्या पुस्तक कर्त्याने रामदासी अंकाचा संदर्भ दिला.. पण मुळात रामदासी अंकात मात्र ह्या ओव्यांचा स्पष्ट असा नेमका संदर्भ दिलेला नाही..आणि त्या संदर्भातील लिखाण आठवणींच्या आधारे लिहिलेले आहेत..
ह्यावरून हे रामदासी शिष्य हळूच एखादा बनावट पुरावा आणतात. कुठल्यातरी मासिकात..नाहीतरी पुस्तकात छापतात.. मग काही वर्षे उलटून गेलीत कि दुसरे पुस्तक लिहितांना तेच पुस्तक आपल्याला संदर्भ म्हणून दाखवतात...आणि अश्या अनेक पुस्तकांचे संचय त्यांच्या कडे झालेले असणार.. त्या मूळे मित्रांनो रामदासी शिष्यांच्या ह्या असल्या ओव्यान पासून सावध राहा..
       ... मुळात एकदा मनात स्पष्ट झाले कि ह्या वरील ओव्या बनावट आहेत... मग पुढे विचार करायचा तो असा ....की.. असल्या बनावट ओव्यांच्या निर्मिती मागे काय बरं कारण असावे...????  रामदासांचे स्वराज्यातील योगदान ह्या न त्या स्वरुपात दाखवण्यासाठी हे सगळे खटाटोप...
इंद्रजीत सावंतांसारख्या इतिहास संशोधकांनी ओव्यांचे संदर्भ तपासायचे खटाटोप केले.. अन्यथा सर्व सामान्यांनी ते केले नसते..आणि त्या ओव्या सत्यच आहेत असे प्रमाण मानून.. रामदासांचे गोडवे चुकीच्या कारणांसाठी गायला आपली मंडळी सज्ज झाली असती...रामदासी शिष्यांच्या भूल थापांना आपली लोक लगेच फसतात...वेळीच जागृत व्हा.. नाही तर.. उद्या तुमच्या पूर्वजांचे नाव देखील तुमच्या वंशाजांकडे पोहोचणाऱ्या इतिहासातून हळूच वगळले जाऊ शकेल.. त्या मूळे ह्या हळूच होणाऱ्या कारवायांकडे लक्ष द्या.. तुमच्या आजूबाजूला चुकीचा इतिहास पसरवनाऱ्यान वर लक्ष ठेवा...
पेशवाई काळात हळूच घुसवलेल्या इतिहासाचे
फलीतच म्हणजे रामदास स्वामी आणि दादोजीचे गुरुत्व आहे.. ते आपण कित्येक वर्षे डोक्यावर घेऊन मिरवत होतो...आपल्यातील काही शहाण्या लोकांनी बंडाळी उठवली म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कळल्या.. नाही तर आपणही रामदास आणि दादोजींना शिवरायांच्या गुरुपदी बसवून शिवराय राहिले बाजूला रामदास आणि दादोजिंचेच गोडवे गात बसलो असतो...आजही आपल्यातील काही मंडळी तेच करत आहेत,...आजूबाजूला त्याची उदाहरणे दिसून येतीलच...त्या मूळे निदान तुम्ही तरी सावध रहा.. आपल्या शहाण्या लोकांच्या मागे उभे रहा..त्यांच्या कडून मार्गदर्शन घ्या..इतिहासाचा अभ्यास स्वतः करा....चुकीच्या अफवांना  सडेतोड उत्तरे द्या....आणि चुकीचा पसरवनाऱ्याच्या विरोधात उभे रहा.. संघटीत व्हा...)

1 टिप्पणी:

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.