इतिहास काळी
ब्राह्मणांनी चुका केल्या असतीलही, पण त्याची शिक्षा आताच्या ब्राह्मण
समाजाला का देता? असा प्रश्न ब्राह्मणच नव्हे तर अनेक बहुजनही उपस्थित करीत
असतात. हा युक्तिवाद अत्यंत लंगडा आणि दिशाभूल करणारा आहे.
भूत-भविष्य-वर्तमान अशा कोणत्याही काळातील ब्राह्मण माणू आणि ब्राह्मण समाज
हा एकाच जातीय विचाराने काम करीत असतो. इतिहास काळापेक्षाही सध्याचा
ब्राह्मण समाज मनाने किडलेला आणि नासलेला आहे. आपल्या जातीचा अभिमान आणि
इतर जातींविषयी पराकोटीचा द्वेष असे एकमेव सूत्र घेऊन हा समाज जगत आला आहे,
आजही जगत आहे. फेसबुकसारख्या आधुनिक माध्यमाचा वापरही ही जमात याच
सूत्राच्या आधारे करीत आहे.
महाराष्ट्रातील ब्राह्मण फेसबुकवर आपण सगळे ब्राह्मण या नावाने एक
क्लोज्ड ग्रुप चालवतात. या ग्रुपवर केवळ ब्राह्मणांनाच सदस्य करून घेतले
जाते. महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले विचारवंत, पत्रकार, लेखक मंडळी या
ग्रुपचे सदस्य आहेत. जुन २०१२ च्या मध्यापर्यंत या ग्रुपची सदस्य संख्या
१२,८०० च्या वर पोहोचलेली आहे. हा ग्रुप इतर जातींच्या विरोधात सातत्याने
कटकारस्थाने करीत आहे. ही कारस्थाने गुन्हेगारी स्वरूपाची आहेत.
ब्राह्मणेतर जातीतील महापुरुषांबद्दल अत्यंत गलिच्छ प्रचार येथे केला
जातो.
या ग्रुपवरील कारवाया अशा आहेत की, ब्राह्मण ही जात जगातील सर्वाधिक
जात्यंध जात आहे, हे याची खात्री पटल्यावाचून राहत नाही. ६
महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून मी या ग्रुपच्या कारवायांवर लक्ष ठेऊन
आहे. त्यांच्या सर्व कारवायांवर लिहायचे म्हटले तर हजारो पाने लिहावे
लागतील. केवळ एकच आणि ताजे उदाहरण येथे देते. केंद्रातील संयुक्त पुरोगामी
आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी यांच्या नावाची
घोषणा कालच झाली. त्यावर साधक बाधक राजकीय चर्चा देशभर होत आहे. ती साहजिकच
आहे. ‘आपण सगळे ब्राह्मण' गूपवर मात्र राजकीय चर्चा न होता, मुखर्जी
यांच्या जातीची चर्चा केली जात आहे. मुखर्जी जातीने ब्राह्मण असल्यामुळे
त्यांचे राष्ट्रपती होणे ग्रुपवरच्या ब्राह्मणांना महत्त्वाचे वाटते!
आदिवासी नेते पी. ए. संगमा यांनी अपक्ष लढण्याची तयारी चालविली आहे.
त्यामुळे हा ग्रुप संगमांवर खार खात आहे. काही ब्राह्मणांना वेगळ्याच
प्रश्नाने घेरले आहे. 'मुखर्जी हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांचे स्वागत
करायचे की ते काँग्रेसचे उमेदवार आहेत, म्हणून विरोध करायचा?' असा पेच
त्यांच्यासमोर पडला आहे.
बहुजनांविरोधात गुन्हेगारी कारवाया
एक स्पष्टिकरण देते. क्लोज्ड ग्रुप चालविणे गुन्हा नाही. परंतु, अशा
ग्रुपवरून विखारी जातीयवादाचा प्रसार करणे नक्कीच गुन्हा आहे. बहुजन
समाजातील नेत्यांचे, महापुरुषांचे चारित्र्यहनन करणे, फेसबुकवरील
महापुरुषांच्या नावे उघडण्यात आलेले पेजेस बंद पाडण्यासाठी त्यांच्या
विरुद्ध सामुहिक ‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम राबविणे, बहुजन समाजाच्या
हितासाठी लिखाण करणा-या लोकांची फेसबुक खाती बंद पाडण्यासाठी सामुहित
‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम राबविणे, यांसारख्या अनेक प्रकारच्या गुन्हेगारी
कारवाया हा ग्रुप करीत आहे. अनेक लोकांची फेसबुक खाती यांनी बंद पाडली
आहेत. माझे स्वत:चे फेसबुक खातेही या लोकांनी बंद पाडले होते. मला ते
पोलिसांत जाऊन सुरू करून घ्यावे लागले. खेडेकर साहेबांच्या विरुद्ध येथे सतत गरळ ओकली जात आहे.
‘आपण सगळे ब्राह्मण' हा ग्रुप आठ जणांचा अॅडमीन ग्रुप चालवतो. या लोकांवर
कायदेशीर कारवाई व्हायला हवी. तुर्तास एवढेच. पुढील लेखांत या ग्रुपच्या
आणखी काही कारवायांवर प्रकाश टाकेन.
....................................................
‘आपण सगळे ब्राह्मण' या ग्रुपवरील
काही प्रातिनिधिक पोस्ट अशा :
...............................................................1

प्रणव
दा यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती होण्याचे जवळ जवळ नक्की झाले आहे , आता
कदाचित एखादे आश्चर्यकारक घटनाच हि गोष्ट होण्यापासून रोखू शकते
मग आता
प्रश्न हा पडतो कि एक ब्राम्हण म्हणून प्रणव मुखर्जी यांचे कौतुक करायचे
त्यांचा उदो उदो करायचे कि भारतीय राजकारणातील एक गालीच्च्छ राजकारणाद्वारे
( त्यांच्या निवडीसाठी जे काही केले जात आहे ते गलिच्छ राजकारण ) त्यांची
निवड होईल म्हणून त्याचा विरोध करायचा ??
--अनिता पाटील
सर्वांनी जरूर वाचवा असा ब्लॉग-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा