सोमवार, २३ एप्रिल, २०१२

बहुजन समस्या

आज देशात समस्या कोणाला जर असतील त्या बहुजन समाजालाच ,
१. सेना गुप्ता आयोगाने दिलेल्या रिपोर्टनुसार या देशामध्ये ८३% लोक दारिद्र्य रेषेखाली जाणारे आहेत .दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच प्रति व्यक्ती प्रतिदिन सरकारी २० रुपयापेक्षा कमी खर्च करण्याची कुवत .
२. २६ करोड लोक भूकबळी रेषेजवळ आहेत .
३. १६ करोड लोक झोपडपट्टीत राहतात .
४. सरकारच्या खाजगीकरणामुळे बेशुमार बेरोजगारी आहेत .
५. लोकसंखेच्या बाबतीत भारताचा जगात २ नंबर आहे .तर निरक्षरतेच्या बाबतीत भारताचा जगात १ नंबर आहे .
६. ६.५ करोड बालक बालमजूर आहेत .
७. २ लाखहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे .
८. ५७ % बालके कुपोषित आहेत .
९. ३ करोड केसेस देशातील कोर्टात अनुत्तरीत आहेत .
१०. देशातील ३६,००० शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही . ६०,००० शाळांना इमारत नाही .१,७५,००० शाळांमध्ये एकच शिक्षक आहे . २ लाख गावात शाळाच नाहीत .
११. सरकारी शाळा दयनीय स्थितीत आहेत कारण शिक्षणासाठी सरकारचा बजेट ३ % पेक्षाही कमी आहे .
१२.देशाची ६० % संपत्ती केवळ ३६ भांडवलदारांकडे आहे .
१३.बहुजन असल्याची शेवटची निशाणी म्हणजे जमीन हि सेझच्या माध्यमातून हिसकावणे . हे एक भयंकर मोठे षड्यंत्र आहे .
१४. सरकारद्वारा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संपवणे व खाजगी शाळांना प्रोत्साहन देणे हे एक मोठे षड्यंत्र आहे .
१५.जतिअधरित जनगणना व ओबीसी ची जतिअधरित जनगणना न करणे हे सरकारचे बहुजनांच्या विरोधातील महाभयंकर षड्यंत्र आहे .
१६.मराठा कुणबी जातीच्या बांधवाना आरक्षण लागू न करणे हि एक भयंकर मोठी धोकेबाजी आहे .
१७.रेणके आयोग लागू न करणे हि एन.टी /डी.एन.टी / व्ही.आय.एन.टी. बंधावासोबत धोकेबाजी आहे .
१८. सच्चर कमिशन लागू न करणे हे बहुजन मुसलमानाच्या विरोधात महाभयंकर षड्यंत्र आहे .

आज देखील बहुजन विद्यार्थी ,युवक,कर्मचारी व समस्त बहुजन समाजासमोर लाखो समस्या निर्माण करण्यात आल्या आहेत .या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहेत .या समस्येंचे निर्माते कोण ?
* त्यांनी या समस्या निर्माण का केल्या ?
* समस्या निर्माण करणारे या समस्येचे समाधान करू शकतील काय ?
*आणि ते जर समाधान करणार नसतील तर मग या समस्या सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे ?
* आणि ती कोणत्या पद्धतीने पार पडायला हवी ?
या सर्व गोष्टींचा विचार आपण या बहुजन लोकांनी केला पाहिजे .
धन्यवाद ...!
जय भिम ...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.