मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

नवीन कवी

  sandipraje 

on: January 30, 2012
नमन त्या मातेला आ आ आ .......आ आ आ आ......आ आ अ अ......आ आ आ आ.......अ
नमन भवानी मातेला
मराठी मुलखाला
धन्य त्या जिजावू मातेला
घातला जो पुत्र तिने जन्माला
उजळल्या दाही दिशा मुलखात
जीइइइ.......जी जी जी जी जी
कोरस : उजळल्या दाही दिशा मुलखात जीइइइ.......जी जी जी जी जी

लहानपणीच झाला जो थोर
तो शहाजीचा पोर
पडला शेरास सव्वाशेर
साथीला मावळा शीरजोर
झळकवती गडावर भगवा हो अ
अ जीइइइ.......जी जी जी जी जी
कोरस : झळकवती गडावर भगवा होअअ जीइइइ.......जी जी जी जी जी

तळपते त्याची तलवार
करी दृष्टांचा ती संहार
घाली छाताडावर वार
करी शत्रूला ती हो ठार
उडवुन देई हाहाकार जीइइइ.......जी जी जी जी जी
कोरस : उडवुन देई हाहाकार जीइइइ.......जी जी जी जी जी

राजा माझा हो गुणवान
राखिला स्त्रीचा त्यानं मान
नाही लाविला हो नाद
नाही झाला नशेत बर्बाद
लोक त्याचे गुण गाती होअअ जीइइइ.......जी जी जी जी जी
कोरस : लोक त्याचे गुण गाती होअअ जीइइइ.......जी जी जी जी जी

पाठीवर मायेची थाप
मी सोडलं आई बाप
राजाचं पिरेम हाई म्हाप
तरी लेकरांवर धाक
माझा मायबापच हाय तोअअ जीइइइ.......जी जी जी जी जी
कोरस : माझा मायबापच हाय तोअअ जीइइइ.......जी जी जी जी जी

गेला दिल्ली दरबारी
आग्र्याहून सुटली स्वारी
धूम ठोकली पेठारात
पडले मुग़ल पेचात
कसा निसटला शिवबा होअअ जीइइइ.......जी जी जी जी जी
कोरस : कसा निसटला शिवबा होअअ जीइइइ.......जी जी जी जी जी

किती गाउ राजाचं गुणगान
असा तो मोल्यवान
मनाचा होता त्यो धनवान
त्याला सूर्याचा हो मान
म्हणूनी झाला शिवछत्रपती होअअ जीइइइ.......जी जी जी जी जी
कोरस : म्हणूनी झाला शिवछत्रपती होअअ जीइइइ.......जी जी जी जी जी..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.