मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!


लाल महालातले कुत्रे हुसकले !
आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !!
छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. शिवरायांच्या समाधी इतकी या कुत्र्याची उंची दाखवली आहे. हा कुत्रा शिवकालीन कागदपत्रांत कुठेच नाही. कुठेच उल्लेख नाही. लाल महालातले एक कुत्रे काढून उकिरड्यावर फेकले आता रायगडावरील हे कुत्रे खेचून उकिरड्यावर फेकून दिले पाहिजे..
कोल्हापूरवाघ्या कुत्र्याची कथा ही दंतकथा आहे. शिवचरित्रात तिला कुठलाही पुरावा नाही. शिव समाधीसमोरील हे स्मारक म्हणजे इतिहासाचा अपमान आहे. कथा, कादंबर्या नाटकांतून रंगवलेल्या वाघ्या कुत्र्याचा इतिहासाशी संबध नाही, अशा प्रतिक्रिया इतिहास संशोधक संघटनांच्या पदाधिकार्यांतून आज व्यक्त झाल्या. शिव समाधीसमोरील हे स्मारक हटविण्यासाठी पुरातत्त्व खात्याने तातडीने हालचाल करावी, अशी मागणी त्यांच्यातून व्यक्त झाली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावर साजर्या होणार्या शिवराज्याभिषेकाच्या तयारीसाठी तुळजाभवानी मंदिरात काल (ता. 17) बैठक झाली. त्यावेळी वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवावे, ही मागणी करण्यात आली. युवराज संभाजीराजे यांनी त्यासाठी राज्य शासनाने समिती नेमावी, अशी मागणी केली. यासंदर्भात आज इतिहास संशोधक, प्रेमींनी वाघ्या कुत्रा शिवचरित्राचा कोणताच संबंध नसल्याचीच भूमिका मांडली.
डॉ. जयसिंगराव पवार (ज्येष्ठ इतिहास संशोधक) : वाघ्या कुत्र्याचा कागदपत्रांत कुठेही उल्लेख आढळत नाही. शिवचरित्र वाघ्या कुत्रा यांचा काहीच संबंध नाही. वाघ्या कुत्रा ही तर एक दंतकथा आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला महत्त्व देणे चुकीचे आहे.
प्रमोद मांडे (इतिहास संशोधक) : शिवचरित्राच अभ्यासल्यास छत्रपती शिवराय हे काही कुत्री, मांजरे पाळणारे राजे नव्हते, हे दिसून येईल. कथा, कादंबर्या, नाटकांतून वाघ्या कुत्र्याचे पात्र रंगवले आहे. रायगडावर उभारलेले वाघ्याचे स्मारक हे तर विदेशी कुत्र्याचे आहे. ज्याचा शिवचरित्रात कोणताच उल्लेख आढळत नाही. महात्मा फुले यांनीही त्याचा कोठेच उल्लेख केलेला नाही. गैरसमजूतीतून हे स्मारक उभारले गेले आहे.
प्रा. डॉ. रमेश जाधव (इतिहास संशोधक) : नाटककार राम गणेश गडकरी यांच्याराजसंन्यास नाटकात वाघ्या कुत्र्याचे पात्र रंगवले आहे. या कुत्र्याविषयी इतिहासात ठोस पुरावाही सापडत नाही. त्यामुळे गडावरील हे स्मारक ग्राह्य मानणे चुकीचे आहे.
इंद्रजित सावंत (इतिहास संशोधक) : तुकोजी होळकर हे शिवप्रेमी बहुजनप्रेमी होते. त्यांनी शिवसमाधीकरिता मदत केली; मात्र त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभारले गेले आहे. ते हटविण्याची आवश्यकता आहे. शिवसमाधीसमोर हे स्मारक उभारण्यापूर्वी त्याठिकाणी दगडी चौथरा होता, असे इतिहासाचा अभ्यास करताना दिसते. त्यामुळे या चौथर्याचा शिवछत्रपतींच्या घराण्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तीचा संबंध असल्याचा निष्कर्ष निघतो.
प्रवीण गायकवाड (प्रदेशाध्यक्ष , संभाजी ब्रिगेड) : इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे, ही आमची मागणी आहे. इतिहासात कोणत्याना ना कोणत्या घटना, प्रसंग घुसडविल्याने इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे. वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे त्याचेच एक उदाहरण आहे. येत्या काही दिवसांत शासनाने हे स्मारक हटवावे अन्यथा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना यात लक्ष घालावे लागेल.
वसंत मुळीक (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ) : शिवसमाधीसमोरील कुत्र्याचे स्मारक हे उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे हे स्मारक हटविणे आवश्यक आहे.

1 टिप्पणी:

  1. अफजलखानचे अनधिकृत बांधकाम , शिवरायांच्या जवळ-जवळ सर्वज किल्ल्य्यांची होत चाललेली दुर्दशा सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे आणि सिंधुदुर्गाचे कोसळलेले बांधकाम असे विषय जाणीवपुर्वक बाजुला सारुन वाघ्या कुत्र्याला टार्गेट करण्यामागे शिवरायांप्रती प्रेम अथवा भक्ती असणे शक्यच नाही.

    http://jwalant-hindutw.blogspot.in/2012/08/blog-post.html

    उत्तर द्याहटवा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.