शिवराज्याभिषेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवराज्याभिषेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ जून, २०१२

चाभरा चाटू संजय राऊत



शिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभ-या पिलावळीने केले. छत्रपतींचा इतिहास पुसून टाकून ठाक-यांचा इतिहास रूढ करण्याच्या पापी हेतूने हे सगळे खेळ केले जात आहेत. 

तशीही शिवसेनेची स्थापना शिवरायांची बदनामी करण्याच्या छुप्या हेतूने झालेली होती. महाराजांची बदनामी करण्याची एकही शिवसेनेने गेल्या चार दशकांत सोडलेली नाही. जेम्स लेन प्रकरण घडविण्यामागे सेनेच्या इशा-यावर काम करणारी पिलावळ होती, हे आता लपून राहिलेले नाही. सेनेने या संपूर्ण प्रकरणात गप्प राहून महाराजांच्या बदनामीचा आनंद लुटला. संजय राऊत यांचे वर्णन तर नुसते +चाभरा+ या विशेषणाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी +चाभरा चाटू+ हे विस्तारित विशेषण अधिक उपयोगी ठरेल. 
दै. सामनामधून  वायफळ आग ओकण्याचे काम सातत्याने करणा-या चाटूसाहेबांची लेखणी लेन प्रकरणात लुळी पांगळी का झाली होती? आज थोरले ठाकरे विकल झाले आहेत, परंतु लेन प्रकरणाच्या काळात चाटूसाहेबांची लेखनी थोरल्या ठाक-यांपेक्षाही जास्त विकल झालेली होती. चाटूसाहेब, आपल्या लेखनीला तेव्हा अचानक असे घुर्रे का बरे आले? आज छत्रपती शिवाजी महाराज हयात असते, तर त्यांनी आधी या +चाभ-या चाटू+ला टकमक कड्यावरून फेकले असते. त्यानंतर ठाक-यांचाही बंदोबस्त केला असता. 


दोन शिवजयंत्या दोन राज्याभिषेक सोहळे घडविण्याच्या पापामागील कुजका मेंदू याच +चाभ-या चाटू+चा आहे. शिवसेनेचे कार्यकारी सध्या चाटूसाहेबांच्याच सल्ल्याने कारभार हाकत आहेत. शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक सोहळा तारखेऐवजी तिथीनुसार साजरा व्हावा, असा  युक्तीवाद चाटूसाहेब सामनामधून सातत्याने करीत आहेत. पण सर्व ठाक-यांचे वाढदिवस हा तारखेनुसार साजरे होतात. खूद्द +चाभ-या चाटू+चा वाढदिवसही तारखेनुसारच साजरा होतो. मग महाराजांची जयंती आणि राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार का हवा. याचे उत्तर चाटूसाहेबांकडे आहे का?

बाळ ठाकरे यांनी चार दशकांपेक्षाही जास्त काळ महाराष्ट्रात दादागिरी केली. ती केवळ मराठ्यांच्या बळावर. थोरल्या ठाक-यांना या उपकारांची जाणही होती. दोन्ही चाभरे कार्यकारी मात्र हे उपकार विसरले आहेत. राज्यकरत्यानी जनतेचे उपकार विसरायचे नसतात. कारण जनतेमुळेच राजकारण्यांना भाजी भाकरी मिळत असते. शेवटी शेतावर पाळलेले कुत्रेही खाल्ल्या भाकरीला जागते, एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.

अनिता पाटील 

शिवराज्याभिषेक सोहळा - ६ जून



उधळुन कौतुकाची फुले करू विजयी उत्सव साजरा
मराठ्यांचा खरा हाच दिवाळी दसरा....
गनिम आहे नजर रोखुन आता तरी हेवे देवे विसरा....
ज्या छत्रपतिंचा आम्हाला अभिमान आहे ....
तोच जगाचा सर्वशक्तीमान आहे....
ज्याचे हे भगवे निशाण आहे....
तो ३३ कोटी देवाचा एकटाच प्राण आहे....
जिजाऊंच्या संस्कारची शिवबाला जान आहे....
स्वराज्य ज्याचे खरी शान आहे....
असा तो रयतेचा जाणता राजा एकमेव महान आहे....
आपल्या सर्वांचे हेच खरे मानधन आहे....
तुमचा जर जिवंत आजही स्वाभिमान आहे....
तर तुम्हाला या स्वातंत्र्याची आन आहे....
आपल्या मोठ्या धन्याच्या राज्याभिषेक सोहळ्याला येण्याचे हे आमंत्रण आहे....
शिवराज्याभिषेक सोहळा    जून रायगडावर साजरा होणार !! उठा शिवछत्रपतीभक्तानो.....रायगड कडे कूच करा..........दाखवा...मराठ्याचे रक्त............शासनाचा "बाप" शिवरायांचा भक्त !!
चला रायगडाला !! चला रायगडाला !! चला रायगडाला !! चला रायगडाला !!

शिवराज्याभिषेक सोहळा २०१२ निमित्त रायगडावर होणारे कार्यक्रम !!!
दि. ५ जून सायं. ४:३० वा. गडपूजन आणि शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके. (स्थळ: नगारखाना, राजसभा)
सायं. ५:३० वा. शाहिरी कार्यक्रम. (स्थळ: राजसदर, रायगड.)
सायं. ६:३० वा. शिवदुर्गांची गाथा आणि व्यथा. (लघुपट)
सायं. ७:०० वा. शिव छत्रपतींच्या जीवनावरील विविध पुस्तकांचा प्रकाशन सोहळा
सायं. ७:३० वा. "महाराष्ट्राची लोकधारा" (महाराष्ट्राचे संपूर्ण सांस्कृतिक लोकदर्शन)
सायं. ८:०० वा. अन्नछ्त्राचे उदघाटन. (स्थळ: जिल्हा परिषद शेड, रायगड.)
सायं. ८:३० वा. गड देवता शिरकाई देवी व तुळजाभवानी देवीच्या गोंधळाचा पारंपारिक कार्यक्रम. (स्थळ: शिरकाई मंदिर)
रात्री ९ ते १२ वा. शाहिरी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम. (स्थळ: राजसदर, रायगड.)

दि. ६ जून सकाळी ५:३० वा. गडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगव्या ध्वजाचे आरोहण
सकाळी ६:०० वा. राजसदरेवरील कार्यक्रमास सुरुवात.
सकाळी ८:०० वा. राजसदर येथे शाहिरी मुजर्याचा कार्यक्रम.
सकाळी ९:३० वा. पारंपारिक वाघांच्या गजरात छत्रपती संभाजीराजे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे राजसदरेवर  आगमन .
सकाळी १०:०० वा. शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात छत्रपती संभाजीराजे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे यांचे हस्ते अभिषेक.
सकाळी १०:२० वा. मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत शिवरायांच्या मूर्तीस छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण सोहळा
सकाळी १०:३०  वा. प्रास्ताविक : इंद्रजित सावंत. छत्रपती संभाजीराजे यांचे उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन  आणि प्रमुख पाहुण्यांची भाषणे.
सकाळी ११:००  वा. पालखी मिरवणूक. (राजसदरेवरून जगदिश्वर मंदिराकडे)
दुपारी १२:००  वा. कार्यक्रमाची सांगता. (जगदिश्वर मंदिर, शिवछत्रपती समाधी येथे) 
|| छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा || उठा शिवछत्रपतीभक्तानो.....रायगड कडे कूच    करा ..........दाखवा...मराठ्याचे रक्त............शासनाचा "बाप" शिवरायांचा भक्त !! चला रायगड !!चला रायगड !! चला रायगड !!चला रायगड !!
Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.